सुनिता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान

अंतराळातून मतदान ही एक रोमांचक गोष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण कसे दूरवर असूनही आपले मतदान करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
[gspeech type=button]

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जून 2024 पासून स्टारलायनर यानातील बिघाडामुळं अंतराळात अडकून आहेत. येत्या 5 नोव्हेंबरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापदाकरता निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनिता आणि बुच हे दोघंही अंतराळातून मतदान करणार आहेत. अडकलेल्या दोन्ही अंतराळवीरांना फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर आणलं जाणार असल्याचं, नासानं सांगितलं आहे.

स्टारलायनर यान गेल्या आठवड्यात पृथ्वीवर परतलं. त्यानंतर आज या दोन्ही आंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी या दोघांनीही पत्रकारांशी विविध विषयांवर गप्पा मारल्या आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली. आमचं कुटुंब समजुतदार असून प्रत्येक जण आम्हांला परत येण्यासाठी धीर देत असल्याचं या सुनिता आणि बुच यांनी सांगितलं

अंतराळातून मतदान कसे?
हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, पण हो, अंतराळातून मतदान करणे शक्य आहे. टेक्सास विधानसभेने 1997 मध्ये एक कायदा मंजूर केला होता, या कायद्यानुसार अंतराळवीर अंतराळातून मतदान करू शकतात, यावेळी अंतराळवीरांना विशेष इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका दिली जाते, ज्याद्वारे ते आपले मत नोंदवू शकतात.

ही प्रक्रिया कशी सुरू होते?
मतदानाच्यावेळी अंतराळवीर कोणत्या निवडणुकीत मतदान करू शकतात याची माहिती दिली जाते. निवडणुकीच्या दिवशी एक एन्क्रिप्टेड इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका अंतराळवीरांना पाठवली जाते. त्यानंतर अंतराळवीर आपल्याला दिलेल्या विशेष ओळखपत्राचा वापर करून मतपत्रिका पाहू शकतात आणि त्यात आपले मत नोंदवू शकतात. मतदान झाल्यानंतर, मतपत्रिका पृथ्वीवर परत पाठवली जाते.

अंतराळातून मतदान करणारा पहिला अंतराळवीर

1997 मध्ये, नासाचा डेविड वुल्फ रशियन अंतराळ स्थानक मीरवर असताना अंतराळातून मतदान करणारा पहिला अमेरिकन होता. त्याच्या नंतर अनेक अंतराळवीरांनीही अंतराळातून मतदान केले आहे.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर काय म्हणतात?

सुनीता विल्यम्स म्हणाल्या, “नागरिक म्हणून आपले हे एक अतिशय महत्त्वाचे कर्तव्य आहे आणि आपण अंतराळातून मतदान करण्यास सक्षम आहोत, हे खूप छान आहे.”  तर, बुच विल्मोर म्हणाले, “मी आज मतपत्रिकेसाठी माझी विनंती पाठवली आहे.”

अंतराळातून मतदान ही एक रोमांचक गोष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण कसे दूरवर असूनही आपले मतदान करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Rain update: महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. विशेषतः कोकण आणि मुंबई परिसरात येत्या काही
Gujarat plane crash : गुजरातमधल्या अहमदाबादहून लंडन इथल्या गॅटवीक इथे जाणाऱ्या विमानाला 12 जून रोजी दुपारी साधारण दीडच्या सुमारास अपघात
Tatkal Tickets booking Rule : आधार कार्डनंबर शिवाय तिकीट आरक्षित करता येणार नसल्याचं रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे. याची अंमलबजावणी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ