जगातील अशी 10 ठिकाणे जिथे पर्यटक भेट देऊ शकत नाहीत.

नॉर्थ सेंटिनेल बेटामध्ये स्थानिक सेंटिनेलीज लोकांचे घर आहे. त्यांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने या बेटाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे.

अमेरिकेतील एरिया-51 हे अतिशय गुप्त ठिकाण असल्याचं सांगितलं जातं. एरिया-51 मध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून तिथे कोणत्याही व्यक्तीला प्रवेश किंवा बाहेर जाण्याची परवानगी नाही. याठिकाणी अमेरिकेने एलियन्सना कैद केलं असून त्यांच्यावर प्रयोग सुरू असल्याचं सांगितलं जातं. पण नक्की काय खरं हे माहीत नाही.

Svalbard Global Seed Vault हा व्हॉल्ट 2008 मध्ये सुरू झाला आणि त्यात आजवर जगातील अनेक देशांतील लाखो बियाणे साठवली गेली आहेत. हा व्हॉल्ट पृथ्वीच्या भूगर्भात खोलवर आहे आणि तिथले तापमान नेहमीच कमी असते. यामुळे बियाणे दीर्घकाळ टिकून राहतात. स्वालबार्ड ग्लोबल सीड व्हॉल्ट हा जगातील सर्वात मोठा आणि सुरक्षित बियाणे भांडार आहे.

क्युबातील काही क्षेत्र तसचं विशेषत: लष्करी क्षेत्रे आणि काही सरकारी इमारती राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांमुळे पर्यटकांना तिथे जाण्यास परवानगी नाही .

जपानच्या उजेताची शहरातील इसे ग्रँड श्राइन हा भाग सूर्य देवतेच्या उपासनेकरता प्रसिद्ध आहे. इथून सहा किलोमीटरवर पवित्र आरसा आहे. या ठिकाणी फक्त मुख्य धार्मिक पुजाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही जाता येत नाही.

चीनमधील निषिद्ध शहर हे एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे. यापैकी बहुतांश भाग आत्ता संग्रहालय म्हणून पर्यटकांसाठी खुला केला आहे, मात्र काही भाग जतन आणि सुरक्षेच्या कारणांमुळे बंद आहे. यात खासगी खोल्या आणि काही निर्बंधित क्षेत्र समाविष्ट आहेत.

व्हॅटिकन सिक्रेट आर्काइव्हजमध्ये इतिहासातील सर्वात मौल्यवान आणि संवेदनशील कागदपत्रे आहेत, यामध्ये प्राचीन पोप रेकॉर्ड्सचा समावेश आहे. म्हणून हे संग्रहालय पर्टकांसाठी खुले नाही.

रक्षा बेट हे भारतीय नौदलाद्वारे वापरले जाणारे सैन्य क्षेत्र आहे आणि सुरक्षा कारणांमुळे ते पर्यटकांसाठी बंद आहे.

Lascaux लेणी मध्ये इतिहासाच्या आधीच्या काळाशी प्रसिद्ध गुहा चित्रे आहेत. पण, पर्यटनामुळे झालेले नुकसान यामुळे मूळ लेण्यांमधील प्रवेश कठोर करण्यात करण्यात आले आहेत.

चेरनोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांट झोन 30-किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेले आहे. 1986 मध्ये चेर्नोबिल मध्ये अणुभट्टीत स्फोट झाला होता. या क्षेत्रातील काही भाग आता पर्यटकांसाठी खुले आहेत, परंतु अनेक भाग अजूनही निर्बंधित आहेत.

इतर बातम्या

Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.
Navy day: 4 डिसेंबर 1971 रोजी भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करत विजय मिळवला. 'मिशन ट्रायडंट' असं
Disabled Indians : या लोकांनी आपल्या अपंगत्वाला कधीही आयुष्यातील अडथळा बनू दिला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून ते देशांतर्गत स्पर्धा, चित्रकला, संगीत

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली