पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजा उत्सव

नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोलकाता शहराचे रूपच बदलून जातं. सजावट, उत्सव आणि आनंदाचे वातावरण सर्वत्र पसरलेले असते.

बंगालमध्ये नवरात्रीत देवी कालीची दुर्गारूपात विशेष पूजा केली जाते. दुर्गा पूजा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, संपूर्ण वर्षाचे दुःख विसरून आनंद साजरा करण्याचा उत्सव आहे.

गंगा नदीच्या तटावरील काली मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी होते. दिवसाच्या पूजेनंतर दुपारी देवीला विशेष नैवेद्य दाखवला जातो.

काली मंदिरात बकऱ्याचे मांस, मासे, तांदूळ, पुलाव इ. पदार्थ विशेष नैवेद्य म्हणून दाखवले जातात.

दसऱ्याच्या दिवशी काली मंदिरात महिलांचा सिंदूर खेला होतो. हा पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात.

बंगालमध्ये कुमारिकांना देवीप्रमाणे पुजले जाते. नवरात्रीचे 9 दिवस घराघरात कुमारिकांची पूजा केली जाते. स्वामी विवेकानंद यांनी बेलूर मठात कुमारी पूजा प्रथा सुरू केली होती.

इतर बातम्या

Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ