तामिळनाडूतील नवरात्रीत ‘गोलू’ बाहुल्यांची परंपरा

तामिळनाडूत  नवरात्र परंपरेत संस्कृती, बारा बलुतेदार आणि रोजगार निर्मिती या सर्वांचा मेळ पाहायला मिळतो

नवरात्री उत्सवात तामिळनाडूमधील विशेष आकर्षण म्हणजे बाहुल्या. या बाहुल्या देवींचे प्रतीक मानल्या जातात. विशेष श्रद्धेने, पारंपरिक पद्धतीने त्या तयार करण्यात येतात

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या साच्यात तळ्यातील माती वापरून बनवलेल्या या आकर्षक बाहुल्यांना गोलू किंवा कोलू असे म्हणतात.

प्रत्येक गोलूला हाताने पारंपरिक पद्धतीने रंगवले जाते, त्यामुळे प्रत्येक गोलू एकमेकांपासून वेगळा आणि अनोखा असतो.

विविध देवतांच्या मातीच्या मूर्त्या, पौराणिक कथा, दैनंदिन आयुष्यातील प्रसंग ‘गोलू’च्या रुपात मांडल्या जातात.

गोलू’ मांडण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. भाद्रपद अमावस्येच्या दिवशी ‘गोलू’ची रचना किंवा आरास करतात. पायऱ्यांसारखी उतरण असणाऱ्या लाकडी स्टँडवर या गोलूंना मांडण्यात येते.

सरस्वती पूजा 9 व्या दिवशी असते, यावेळी  गोलूच्या  समोर पुस्तके, वाद्ये यासारखी ज्ञानाची प्रतीके ठेवली जातात आणि त्यांची पूजा केली जाते.

घरातील कन्येच्या स्वागतासाठी ही परंपरा सुरू झाली. दरवर्षी या गोलू संचात एका बाहुलीची भर घालायची असते. रोजगार निर्मितीचा संबंध इथं दिसतो.

इतर बातम्या

Thiruonam : महाबली हा मुळात असूर राजा. पण या राजाच्या काळात प्रजा अत्यंत सुखानं नांदत होती. गरीब-श्रीमंत भेद नव्हता, सुबत्ता
Ganeshotsav : गणपती बाप्पाला आपण सगळेच विघ्नहर्ता आणि कार्यारंभ करणारा देव मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाची फक्त एक
Ganeshotsav : गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्याने खूप चांगले बदल होतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ