‘मेळघाटची राखी’

Rakshabandhan: मेळघाटातील महिलांनी तयार केलेल्या या राख्या फक्त एक धागा नाहीत, तर त्यांची कलाकृती आहे. बांबूच्या अतिशय बारीक काड्या आणि सालीपासून या राख्या तयार होतात. त्यावर सुंदर नक्षीकाम केलं जातं, ज्यामुळे त्या खूप आकर्षक दिसतात.

कोकण रेल्वेची ‘रो-रो’ कार सेवा अखेर सुरू, पण चाकरमान्यांना याचा कितपत फायदा होणार?

Konkan Railway’s ‘Ro-Ro’ car service : कोकण रेल्वेने 1999 सालापासून मोठ्या ट्रक्ससाठी ‘रो-रो’ सेवा सुरू केली होती. यामध्ये मोठे ट्रक थेट ट्रेनमध्ये चढवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जायचे.आता हीच खास सेवा खासगी गाडीमालकांसाठी सुद्धा सुरू करण्यात आली आहे

कोल्हापूर चपलांची निर्मिती पाहण्यासाठी प्राडाची टीम थेट कोल्हापूरात दाखल

Kolhapuri Chappals : प्राडा कंपनीच्या तांत्रिक विभागातील चार सदस्यीय टीम 15 – 16 जुलै असा दोन दिवसीय दौरा करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरमधल्या वेगवेगळ्या कारखानदाऱ्यांना आणि कारागिरांना भेटून कोल्हापूर चपलां विषयीची माहिती, त्याच्याशी संबंधित असलेली संस्कृती आणि कोणत्याही मशिनचा वापर न करता संपूर्णरित्या हाताने या चपला कशा तयार केल्या जातात ही प्रक्रिया समजून घेतली आहे. 

‘मुंबई-गोवा महामार्ग: आता मुदतवाढ नाही, काम वेळेत पूर्ण झालं नाही तर कारवाई करणार’; गडकरींचा ठेकेदारांना इशारा

Mumbai – Goa Highway : मुंबई – गोवा महामार्ग मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली आहे. केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदारांना जर महामार्गाचं काम विहीत वेळेत पूर्ण केलं नाही तर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा आता ‘स्मार्ट जिल्हा’; एआय (AI) प्रणाली वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा!

Sindhudurg a smart district : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा पहिला जिल्हा ठरला आहे. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सिंधुदुर्गमध्ये एआय प्रणाली सुरू करण्यात आली. 

कृष्णाकाठच्या प्रगतशील महिला शेतकरी नूतन मोहिते

Nutan Mohite : शेती करायला हल्ली कोणी सहजासहजी तयार होत नाही. कितीही विकास होत असला तरी शेतीशिवाय कशालाच पर्याय नाही. नोकरी-व्यवसाय हे कायमस्वरूपी नसतात, हे आपल्याला कोरोना काळात लक्षात आलं. शेती मात्र तुमचा उदारनिर्वाह व्यवस्थित होण्यासाठी शाश्वत पर्याय असल्याचंही आपल्या लक्षात आलं. नूतन मोहिते यांना हे 1983 मध्येच लक्षात आलं.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत समज गैरसमज

Annasaheb Patil Economic Development Corporation : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील तरुण-तरुणींना व्याज परतावा देण्याची योजना आहे. मात्र याच महामंडळासंबाबत काही गैरसमज आहेत. लाभार्थ्यांना हे कर्ज कसं मिळतं त्यासाठी लाभार्थ्यांनी काय करावं, त्याची प्रोसेस कशी आहे याबाबत काही संभ्रम आहेत.

कोकणातील मिरग!

Kokan : मे महिन्याचा शेवट आला की, कोकणातील प्रत्येक गावात मिरगाच्या कामांची जोरदार तयारी सुरू होते. पिढ्यानपिढ्या कोकणातील लोक पावसाचं स्वागत एका खास, पारंपरिक पद्धतीने करतात.

शहापूरची वेताळेश्वर जत्रा

Shahapur Vetaleshwar Jatra : वर्षभर गावाचं रक्षण करणाऱ्या वेताळ दैवाचे आभार मानण्यासाठी विविध ठिकाणी वेताळस्वामिंच्या जत्रांना आता सुरुवात होत आहे. शहापूरची वेताळेश्वर जत्रेला 8 मार्च रोजी सुरुवात होत आहे. या जत्रेविषयी थोडक्यात माहिती.

मंत्र्याच्या रुसलेल्या मुलासाठी कायदे झुकवले, पण अमेरिकेत मृत्यूशी झुंजणाऱ्या कराडमधल्या तरुणीच्या पालकांची मेडिकल इमरजन्सी व्हिसासाठी वणवण

Nilam Shinde : साताऱ्यातील कराड तालुक्यातल्या उंब्रज गावातल्या तरुणीचा अमेरिकेमध्ये गंभीर अपघात झाला आहे. तिथल्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. भारतातील अमेरिकन व्हिसा कार्यालायाकडून तरुणींच्या पालकांच्या व्हिसाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी राज्य केंद्र सरकारने मदत करावी, अशी विनंती ‘श्रेष्ठ महाराष्ट्रा’तर्फे करत आहोत. 

बारामतीत एकाच खोडाला वांग आणि टोमॅटो!

Baramati – Bromoto Farming : बारामतीमध्ये नेदरलँडच्या धर्तीवर ब्रोमोटो तंत्रज्ञानावर आधारित शेतीचा प्रयोग केला. यामध्ये एकाच खोडाला टॉमेटो आणि वांग्याचं पीक घेतलं आहे.

जळगावच्या भरीत भाकरीची पार्टी घालतेय खवय्यांना भुरळ

jalgaon Bharit Bhakri : थंडीचा जोर वाढताच जळगावमध्ये खास झणझणीत भरीत पार्ट्यांचे आयोजन अनेक ठिकाणी केलं जातं.जळगाव जिल्ह्यातील अनेक नागरिक परदेशात असले, तरी भरीताचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली तर ती कधीच सोडत नाही.  जगाच्या पाठीवर कुठेही असले तरीही भरीत भाकरीवर ताव मारण्यासाठी थेट जळगाव गाठतात.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ