वाघांचा रस्ता अडवणाऱ्या जीप्सी चालकांसह, पर्यटकांवर कारवाई

Tiger Sanctuary Incident : जंगल सफारी दरम्यान, वनविभागाच्या सफारी वाहनांनी वाघाच्या आणि तिच्या पिल्लांच्या मार्गात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी, मुंबई हायकोर्टाने कठोर पाऊले उचलली आहेत. याप्रकरणी नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत घडलेल्या घटनेवर उत्तर मागितले आहे. तर वनविभागाच्या संबंधित वाहनाच्या चालकावर आणि पर्यटकांवरही कोर्टाने कारवाईचे आदेश दिले आहेत.

जळगावसह महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमधील भूजल प्रदूषित ; आरोग्याला धोका

Groundwater : केंद्रीय भूजल मंडळाच्या (CGWB) वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगावसह महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या भूजलात विषारी घटक मिसळले असल्याचं उघड झालं आहे. हे घटक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.

मराठवाड्‌यातील अनोखा सण ‘वेळा अमावास्या’!

Darshvela Amavasya: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागात विशेषतः लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात येते. या अमावस्येला ‘दर्शवेळा अमावस्या’ या नावानं ओळखण्यात येतं.

ख्रिसमसमधील ‘28 डिसेंबर’ निष्पाप बालकांच्या आठवणींकरता!

Feast of the holy innocents : येशु ख्रिस्ताच्या जन्मानंतर इस्त्रायलचे तत्कालीन राजे हेरोद यांनी बेथलेहेममधल्या नवजात बालकांची हत्या केली. या निष्पाप बालकांच्या स्मरणार्थ ख्रिसमसदरम्यान 28 डिसेंबर रोजी ‘फिस्ट ऑफ द होली इंनोसंटस्’ हा विशेष दिवस साजरा केला जातो. 

नक्षलवाद विरोधात जनसुरक्षा विधेयक

Maharashtra Jan Sureksha Bill – 2024 : महाराष्ट्र नक्षल विरोधी पथकाने अधोरेखित केलेल्या गरजेनुसार नक्षलवादाला आळा घालण्यासाठी, शहरी अर्बन नक्षल अड्डे बंद करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक – 2024 सादर करण्यात आलं आहे.

चंद्रपूरच्या जि.प. शाळेतील विद्यार्थी गिरवत आहेत मोडी लिपीचा धडा

modi lipi : चंद्रपूरमधील गाँडपिपरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील काही वि‌द्यार्थी मराठी भाषेच्या देवनागरी लिपीतल्या उताऱ्यांचं मोडी लिपीत रुपांतर करत आहेत. मोडी लिपीचे हे धडे गिरवणे हे त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग नाहीये. तरी हे विद्यार्थी हौसेनं मोडी लिपी शिकत आहेत.

निसर्गाचं देणं आदिवासीचं तारपा वाद्य

Tarpa : निसर्गपूजक आदिवासी समुदायाच्या विशिष्ट कार्यक्रमांपुरत मर्यादित असणारी पारंपरीक वाद्ये आता त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहेत. तारपा, घंगाळी, ताडफा ही आदिवासी समुदायाची काही खास वाद्ये आहेत. तारपा हे वाद्य भोपळ्यापासून तयार करतात. ताडपानाची गुंडाळी की हरणाचं शिंगांनं त्यात हवा घालणार यावरून त्याचं वैशिष्ट्य ठरतं.

सांगलीतल्या शाळगाव एमआयडीसीत वायूगळती, दोन महिलांचा मृत्यू; नऊ जणांवर उपचार सुरू

Sangli MIDC Gas Leakage : सांगली येथील कडेगाव तालुक्यातील एमआयडीसीमध्ये वायूगळती झाली असून उपचारा दरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य रूग्णावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

झारखंड विधानसभा निवडणूक 2024: मतदान 13 आणि 20 नोव्हेंबरला, निकाल 23 नोव्हेंबरला

Jharkhand election: झारखंडमध्ये 2024 च्या विधानसभा निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. झारखंड राज्यातील एकूण 81 जागांसाठी मतदान होणार आहे.

चूल, मूल आणि कूळ जपणारी सिंधू आक्का

Sindhu Akka : दौंडच्या पारगाव मध्ये 75 वर्षाच्या सिंधूआक्का सायकलचं पैडल मारत, रेडिओवर गाणी ऐकत रूबाबात शेतात जातात.. 44 वर्षांपूर्वी सिंधूआक्कांनी पाव विकण्यासाठी पहिल्यांदा सायकलचं पैडल मारलं. सायकल बरोबरची गट्टी सिंधू आक्कांनी अजूनही सोडली नाहीये.  सिंधू आक्का अशा सायकलवरून जातात हे आता लोकांच्या सवयीचं झालं आहे. पण 40 वर्षापूर्वी परिस्थिती अशी नव्हती.

माता कुंती आणि भीम यांची भेट घडवणारा उंब्रजचा अनोखा उत्सव

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील उंब्रज इथं भीम-कुंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या या उत्सवाबाबत स्थानिकांच्या मनात विशेष श्रद्धा आहे. त्यामुळंच या उत्सवातून सर्वधर्मसमभाव आणि ऐक्याची परंपरा जोपासली जातेय.

गडचिरोलीतील ‘थंगालान’ : हिऱ्याच्या खाणीसाठी इंग्रजांशी भिडला आदिवासी समाज 

निसर्ग पूजक असलेले वैरागडचे गौंड समाजातील हे बांधव त्या भूप्रदेशात असलेल्या खनिज संपत्तीचे संरक्षण करायचे. खनिज संपत्तीचे संरक्षण करताना इथल्या आदिवासी बांधवांच्या रक्ताने ही भूमी लाल झाल्याचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या  इतिहासाला समृद्ध करणाऱ्या इथल्या निसर्गपूजकांच्या गाथा आहेत. पण या वीरगाथांना इतिहासात स्थान मिळू शकलं नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ