इंटरनेटवरील ‘ट्रॅड विमेन’!

Trad Women : आपल्या कुटुंब व घराची काळजी घेणं यात चुकीचं काहीचं नाही. पण ही जबाबदारी घरातली स्त्रीच कशी उत्तमपणे पार पाडत आहे, हे सोशल मिडियामधील अनेक रील्स, व्हिडियोजमधून पाहायला मिळतं. छान नटूनथटून या ‘ट्रॅड विमेन’ सोशलमिडियातून पैसे कमवण्याच्या नादात कळत-नकळतपणे समाजामधील मोठ्या गटावर आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून पारंपरिक श्रमविभागणीचा प्रभाव पाडत आहेत.
महिलांच्या प्रगतीत भात आणि चपातीचं योगदान किती?

Rice or Roti: प्रसिद्ध लेखक आणि पौराणिककथा अभ्यासक देवदत्त पटनायक यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण आणि उत्तर प्रांतातील महिलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आहारशैलीशी संबंध जोडला. त्यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं केलं की, “भात पटकन शिजतो. त्यामुळं महिलांना शिकण्यासाठी आणि इतर कामांसाठी मिळतो. तर चपाती, रोटी तयार करायला लागणाऱ्या वेळामुळं महिलांचा बराचसा वेळ हा स्वयंपाकघरातच जातो”. खरंतर ही एप्रिलमधली पोस्ट आहे. पण सोशलमिडियावर सध्या यावरून खूप चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय. पण खरंच भात आणि पोळी किंवा तांदूळ आणि गव्हाचा महिलांच्या प्रगतीशी संबंध आहे का?
देश स्वातंत्र्यात, पोट पारतंत्र्यात!

Meat sale ban on Independence day : कडोंमपानं स्वातंत्र्यदिनी कोंबडी, शेळी, मेंढर कापण्याची थोडक्यात मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश काढलाय. नागपूर, अमरावती आणि मालेगावमध्ये ही मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. कित्येक लोकांना हा आदेश रुचलेला नाही. पण यात एक गोची अशी झालीय, नेमकी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गोकुळअष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्मदिन आल्यानं याला हिंदू धर्मियांकडून फारसा विरोध होत नाहीये. कोणी कोणत्या दिवशी काय खावं या स्वातंत्र्यासोबतचं यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या रोजीरोटिचाही हा प्रश्न आहे. खड्ड्यांतील रस्त्यांसाठी प्रसिद्ध महापालिकेनं लोकांच्या ताटात एवढं लक्ष द्यावं का?
आरोग्य, न्यायालय आणि अहिंसाप्रिय समुदाय!

अहिंसाप्रिय समुदाय आता सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयालाही जुमानत नसल्याचं दिसत आहे. मानवी व प्राणी या दोघांच्याही आरोग्य व हिताला न्यायालयानं प्राधान्य दिलं असताना, कबुतर आणि महादेवी हत्ती या विषयावर याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवणं सुरू आहे. आपल्या संकुचित विचारांच्या समाजाला जे हवं तेच पदरी पाडून घेण्याचं काम हा समाज करतोय
रेबीजमुळं होणाऱ्या वाढत्या मृत्यूंची घेतली सुप्रीम कोर्टानं दखल!

एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात चार वर्षात 25 लाख लोकांना कुत्रे चावले. एकट्या दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रोज कुत्रा चावण्याच्या किमान शंभर केसेस तरी नोंदवल्या जात आहेत. कुत्र्याने चावा घेतलेल्या व्यक्तींना रेबीजचा संसर्ग होत आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. यामुळंच सुओ मोटो दाखल करत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
संयम आणि पापक्षालनाच्या कावडयात्रेचं बदलतं रूप!

मनाला लोभ, माया, अहंकार, क्रोध यासारख्या षड्रीपुंवर विजय मिळवण्याचा मार्ग म्हणजे कावड यात्रा आहे. पापातून मुक्त होण्यासाठी ही कावडयात्रा करतात अशीही काही भाविकांची भावना आहे.
निवडणुकांची वर्दी घेऊन आलेला ‘मोफत चिकन’चा आखाड!

संक्रातींचं वाण, मार्गशीर्ष गुरुवार फळवाटपानंतर आता आखाडालाही राजकीय नेत्यांनी आपल्या कब्ज्यात घेतलं आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आखाडानिमित्त मोफत चिकन वाटप’ करत आहेत. निवडणुका जाहीर होण्याच्या आधी मतदारांना लालूच दाखवून आपल्या मागे किती ताकद आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून होत आहे.
कृषिमंत्री साहेब, तुम्ही ‘ओसाड गावची पाटीलकी’ सोडाच!

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात मोबाइलवर चक्क ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.
मुख्याध्यापिकेला पाळीचा टॅब्यू की माथेफिरूपणा!

शिक्षकांनी त्यांच्या वागण्यानं विद्यार्थ्यांना गोडी लावायची की विद्यार्थांना शाळेपासून दूर करायचं, असा प्रश्न शहाडमधील शाळेतील शिक्षिकांमुळे निर्माण झाला आहे. 8 जुलै रोजी शहाडमधील आर. एस. दमानी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बाथरुममधील रक्ताच्या थेंबांवरून कोणत्या मुलींना पाळी आली आहे, हे तपासण्यासाठी मुलींना त्यांची अंतर्वस्त्र काढायला लावली आणि हातांचे ठसे घेतले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना याचा तीव्र मानसिक धक्का बसला आहे. यामुळं काही विद्यार्थिनींनी शाळेत जायला नकार दिला आहे.
हिंदी भाषासक्ती विरोधाला हिंदूविरोधाचा मुलामा!

Politics on Language : दीपक पवार गेली कित्येक वर्ष प्रामाणिकपणे मराठीकरता काम करत आहेत. पण काही लोकप्रतिनिधी मूळ विषयांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी किंवा राजकीय फायदा उचलण्यासाठी हिंदी भाषा सक्ती विरोधाला धार्मिक रंग देऊ लागले आहेत. तर मुंबईत काम करणारे परभाषिय अभिनेते मूळ विषय माहीत नसताना उगीचच आपल्या तोंडाचा पट्टा चालवत आहेत.
‘आवाज मराठीचा’ नांदी ठाकरेंच्या पुनर्मिलनाची!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मराठी माणसाने जी एकजूट दाखवली ती आता सर्वांनी दाखवावी. सर्व पक्षातील मराठी भाषिकांनी एकत्र यावं, असं आवाहन दोन्ही ठाकरे बंधुंनी मुंबईतल्या हिंदी भाषा सक्ती अध्यादेश मागे घेतल्याच्या विजयी सभेत केलं. या सभेत राज ठाकरे यांच्या भाषणाचा भर मराठी भाषा अभिमान, भाषा सक्तीला विरोध असा होता. पण उद्धव ठाकरेंनी या सभेचं व्यासपीठ मराठी भाषेपेक्षा स्वतःच्या राजकीय आकांक्षा आणि भाजपवर टीका करण्यासाठीच वापरला. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधु आता ‘म’ मराठीसोबत ‘म’ महापालिकेचाही गिरवणार असं दिसलं.
‘हिंदी सक्ती’ ठाकरे बंधूंचं राजकीय मनोमिलन करणार का?

महाराष्ट्राच्या 65 वर्षांच्या इतिहासात ‘ठाकरे’ हे आडनाव वर्चस्व गाजवत राहिलं. ठाकरेंच्या दोन्ही पक्षांची स्थापना ‘मराठी’च्या मुद्द्यावरून झाली. पण मधल्या काळात दोन्ही पक्षांना उतरती कळा लागली आहे. आपापल्या पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे ‘मराठी’ला जवळ करत ‘जवळ’ येत आहेत का? की महाराष्ट्राच्या राजकारणातून ‘ठाकरे’ हा ब्रँड संपणार नाही, ‘खेल अभी बाकी हैं’ हे भासवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? या सगळ्यासाठीच 5 जुलैला एकीच्या बळाचं प्रदर्शन केलं जाणार आहे का?