पारधी समाजाचे भीषण वास्तव

Pardhi Samaj : काही चळवळीतील नेतृत्वांनीच पारधी समाजाच्या प्रश्नांचं भांडवल केलं आहे. आजही या समाजातील पुरुषांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवलं जातं. देश सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत आहे पण पारधी समाजाच्या भवितव्याचं काय? 

बाईला मिळालेली निसर्गदत्त देणगी नाकारण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

ऊसतोड महिला कामगार : बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी हंगामाला जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर सर्व कामगारांची आरोग्य तपासणी केली जाते. यंदा या तपासणीत तब्बल 843 महिलांचं गर्भाशय काढून टाकल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. यामध्ये 30 ते 35 वर्षे वयोगटातील महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. मागील अनेक वर्षांपासून ऊसतोड कामगार महिलांचं गर्भाशय काढण्याचे प्रकार समोर येत होते. त्यावर अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी आवाज उठवले. तरीही हे प्रकार सुरूच असल्याचं यावर्षीही समोर आलंय.

एपीएमसी मार्केटमध्ये बांग्लादेशी माथाडी कामगार!

Navi Mumbai APMC : मागील काही वर्षांपासून या एपीएमसी मार्केटमध्ये बांग्लादेशी कामगारांची घुसखोरी वाढल्याचा दावा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. हा सर्व प्रकार काय आहे या एपीएमसी मार्केटमध्ये या बांगलादेशी कामगारांना कोण कामाला ठेवतात, त्यांची ओळख कोण लपवताय आणि या सर्व गंभीर प्रश्नाकडे प्रशासन का दुर्लक्ष करते? हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे.

दक्ष भूमिकेतून संघ आता मध्यममार्गी?

संघ परिवारातील विविध संघटनांतील लोकांची वक्तव्ये आता अंतर्विरोध दाखवू लागली आहेत. संरसंघचालक मोहन भागवत तर अतिवाद सोडून संयमित धर्माचरणाकडे निर्देश करू लागले आहेत. शताब्दीकडे जाताना संघाच्या टोपीखाली नेमकी कोणती साखरपेरणी सुरू आहे?

कांदा उत्पादकाची मूर्च्छा आणि नाकाला राजकीय कांदे

Onion market: नाशिकचे ज्येष्ठ नेते सध्या नाकाने कांदे सोलतायत. राज्यातील सन्माननीय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाच्या मानापमान नाट्यात ‘दिल की चैन’ शोधतायत. पण लासलगांवच्या बाजार समितीत मात्र लिलाव बंद पाडले गेलेत आणि शेतकऱ्यांच्या नाकाला कांदा हुंगवण्याची वेळ आली आहे.

समतेचा आर्मस्ट्रॉन्ग की सत्तेचा?

महाराष्ट्र विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना 77 व्या वर्षी पुन्हा समतेचा सूर सापडलाय का? आव्हानात्मक काळात सारेच भुजबळांची मदत घेतात, पण स्थैर्याच्या काळात भुजबळांच्या भुजांमधलं बळ काढून घेतलं जातं हा इतिहास आहे. या इतिहासातून भुजबळ बरंच काही शिकलेत. ते आता समता परिषदेचा आर्मस्ट्रॉन्ग म्हणून पुढे येतील की तह करून सत्तेच्या भुजा सांभाळतील?

अजितदादांनी रेशीमबागेत जायला काय हरकत आहे?

अजित पवार रेशीमबागेत जाणं टाळतात. कारण दादांचं रेशीमबागेत जाणं एक वेगळं दृश्यमानक प्रस्थापित करेल. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांपासून ते ब्रिगेडी पाइकांपर्यंत अनेक लोक नाउमेद होतील. पण रेशीमबागेत जाण्यासाठी एक दिलासा नक्की आहे…

लग्नगाठ ते फाशीची गाठ

बेंगलुरूच्या एका अभियंत्याने आत्महत्या केली. आत्महत्येआधी कौटुंबिक कारणं सांगतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर माध्यमांमध्ये मोठीच चर्चा झाली. स्त्रियांसाठीचे कायदे पुरुषांना त्रासदायक ठरतात. इतके की आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. असा एक सूर निघाला.

रस्त्यांवर गाडलेली मुंबईची चलती

Mumbai citizen’s life : बसचालकांची, कचरागाड्यांची, स्कूलबसची, शेअर टॅक्सीवाल्यांची मुजोरी सहन करत मुंबईकर रोज जीव मुठीत धरून रस्त्यावर चालत असतो. ‘चलती का नाम गाडी’ असं म्हणतात. पण जी रस्त्यांवरच्या ट्रॅफिकमध्ये गाडलेली आहे, अशा मुंबईची अजूनही चलती कशी?

अडीच वर्षांचा फॉर्म्युला आणि अडीच घरांचा घोडा

अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याने 2019 साली सत्तेच्या पटावरचे फासे उलटले होते. आता पुन्हा अडीच वर्षांचा फॉर्म्युला चर्चेत आहे. सत्तेच्या सारीपटावर अडीच घरांचा घोडा उंटाची तिरकी चाल खेळून वजिराला मात देऊ शकतो.

गुलाबी थंडीची शीतलहर

भगव्या नोव्हेंबरनंतर आता थंडीही लाडक्या बहिणींची गुलाबीच. पण यंदा थंडी कडाक्याची पडणार हा अंदाज वर्तवला गेला होता. थंडीचं स्वागत होतं. पण हिवाळ्याचा ऋतू फारसा टिकून राहात नाही. हवामान बदलाच्या या काळात हिवाळ्याचं कवतिक करताना थोडीफार हुडहुडी भरणारच.

आंबेडकरी राजकारणातला सैराट

सैराट हा सिनेमा मार्केटिंगमध्येही शिकवला जातो. ज्या वर्षी महाराष्ट्रात मोठा दुष्काळ होता त्या कालखंडात ग्रामीण महाराष्ट्रातून या सिनेमाने शंभर कोटी रुपये उभे केले. पैशाचं मोजमाप यशासाठी. मात्र सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हा सिनेमा मैलाचा दगड. नागनाथ मंजुळेंचं दिग्दर्शक म्हणून कौतुक अशासाठी की मूळ आंबेडकरी विचाराचे नवे धुमारे त्याने एका लोकप्रिय माध्यमातून अतिशय दणदणाटात दिले.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ