गायीच्या पोटातले काकरव

तंतुमय गवत, वैरण आणि वनस्पतींची पाने गाय खाऊ शकते. गायींना शिजवलेले अन्न, विशेषतः माणसांच्या सेवनासाठी तयार केलेले अन्न खाऊ घातल्यास त्यांच्या पचनावर परिणाम होऊ शकतो. यामुळं गायीच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. गायींना शिजवलेलं अन्न खायला देऊ नये. नैवेद्य म्हणून आपण गायीला पुरणपोळी किंवा शिजवलेलं आणि तळलेलं अन्न देतो, त्याचे अनेक दुष्परिणाम गायीवर होतात.

काफ्काच्या कथेतला उपोषण कलाकार

‘ए हंगर आर्टिस्ट’ ही लेखक फ्रान्ज काफ्का यांची मूळ कथा 1922 साली प्रकाशित झाली होती. या कथेचा स्वैर व त्रोटक अनुवाद इथे देत आहोत.
102 वर्षे जुनी ही जर्मन कथा आजही तितकीच प्रत्ययकारी आहे.

केवळ हिंदूंशीच व्यवहार किती व्यवहार्य?

सर्मधर्मसमभाव मानू नका… मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका… हिंदूंनी केवळ हिंदूंशीच व्यवहार करावा. हे सांगणारे नितेश राणे हे आमदार आहेत, महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी घटनात्मक पदाची शपथ घेतली आहे. मात्र त्या शपथेचं हल्ली कोणालाच काही वाटेनासं झालं आहे.

श्री गणेश, न्यायमूर्ती आणि उत्सवमूर्ती

मुख्य न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (DY Chandrachud) यांच्या घरी स्थापित असलेल्या श्री गणेशांकडून तर भारतमातेच्या न्यायसंकल्पांचे पावित्र्य जपण्यासाठी अधिक अपेक्षा. खरोखरच बाल गणेश तिथे अवतीर्ण झाले असते आणि त्यांना भारतमातेची न्यायव्यवस्था शूचिर्भूत होत असताना तिचं पावित्र्य राखण्याचं कार्य जर सोपवलं असतं, तर जशी त्यांनी भगवान शंकरांची वाट अडवली तशी माननीय पंतप्रधानांचीही वाट अडवली असतीच ना.

गुजराती वि. मराठी

गुजराती (Gujarati) विरुद्ध मराठी (Marathi) हा संघर्ष केवळ राजकीय हवाबाजीचा नाही. इतरांच्या बाबतीत होतो तसा या संघर्षाला स्थानिक विरुद्ध परके असा संदर्भही देता येत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी – गुजराती द्विभाषिक बॉम्बे प्रॉव्हिन्सच्या (Bombay Province) प्रस्तावानंतर ही ठिणगी पडली. बॉम्बेचं आर्थिक राजधानी असणं वरचढ ठरलं आणि तिच्या सोबत गुजरात आणि महाराष्ट्र हे प्रांत संघर्षात ओढले गेले. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ या मागणीपासून गुजरात आणि महाराष्ट्राच्या संबंधात कडुसं आलं.

अपहरणकर्त्यांची सांकेतिक नावं आणि भोळा भारतवासी

नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरील IC-814 या वेबसिरिजमधील अतिरेक्यांच्या हिंदू नावांवरून वादंग सुरू झाला, तेव्हा का कोणास ठाऊक जावेद अख्तर यांचं एक विधान आठवलं. मधल्या काळात एका ठिकाणी बोलताना जावेद साहेबांनी ‘शोले’ या चित्रपटामधल्या दृश्याची आठवण सांगितली. एका देवळात नायक वीरू नायिका बसंतीशी शंकराच्या मूर्तिमागून बोलतोय.  त्याच्या हातात एक कर्णा असतो. त्या कर्ण्यातून तो स्वतः शंकर भगवान बोलतोय, असं भासवतो. अशाप्रकारे बोलता बोलता बसंतीने वीरूशी लग्न करावं, असा शंकर भगवान यांचाच आदेश असल्याचं वीरू सांगतो. जावेद साहेब म्हणाले होते की, हे दृश्य ‘शोले’ चित्रपटात विनोदी प्रसंग म्हणून लोकांनी छान स्वीकारलं. त्यावर काहीच वादंग किंवा आपत्तीजनक घडलं नाही. पण आज अशा प्रकारचा प्रसंग

बाप्पा तूच रस्ता दाखव

श्री गणेशांना आपण बुद्धीदेवता मानतो. तरीही उत्सवातलं बुद्धीचं अधिष्ठान शोधावं लागतं, याची खंत वाटत राहते. परंपरा आणि उत्सवप्रियता आनंददायी असते. पण सर्वांना सामील होता येईल, असा आनंद कुठेतरी हरवला आहे.

गुरूवंदना!

शिक्षिका कुठल्याही क्षेत्रातल्या असल्या तरी त्या तन-मनाने आपल्या शिष्यांसाठी झटत असतात. आज शिक्षक दिनानिमित्त दीपाली देशपांडे आणि सुमा शिरुर या श्रेष्ठ शिक्षिकांना वंदन.
नेमबाज दीपाली देशपांडे आणि सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे अनेक ऑलिम्पियन नेमबाज घडले.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ