अशी ही ‘टोल वा टोलवी’

Toll Free Entry to Mumbai : पुलंनी मुंबईकरांबद्दल लिहिलं, तेव्हा टोलनाके नव्हते. पण आज जर पुलं असते तर त्यांनी टोलवरच्या खोळंब्याची मुंबईकरांची दुसरी बाजू सांगितली असती. टोलने मुंबईकरांना वाहतुकीच्या टप्प्यातला अनवट ठेहराव कसा दिला होता हे सांगितलं असतं. मुंबईच्या टोलनाक्यावरच्या बाउन्सर्सना पुलंच्या स्टाइलने आपण ‘टोलभैरव’ म्हटलं असतं.

मेळाव्यातील दर्दी, गर्दी आणि हमदर्दी

Dasshera Melava : गर्दीचं मानसशास्त्र झुंडशाहीच्या टीकेसोबत रसिकाग्रहणाचा किंवा अभिरुचीचे वेगळे अंतरंग दाखवते. गर्दीच्या मनाला शिस्त लावण्याचे प्रयोग संस्कृतीत वेगवेगळ्या वळणावर घडत आलेत. शिवतीर्थावरच्या मेळाव्यातल्या श्रोत्यांचं मन आता तसं एकजीव होत नाही. कारण या दर्दीतला हमदर्दी रसिक प्रेक्षकच हरवलाय.

रतन टाटा नावाचा आधुनिक कर्ण

Ratan Tata : रतन टाटांमधल्या उद्योगपतींपेक्षाही त्यांच्यातला कर्ण मोठा होता. पण त्या दानाचा त्यांनी कधी उत्सवी सोहळा होऊ दिला नाही. रतन टाटा नामक कर्णाच्या रथाचं चाक कधी कुठे रुतलं नाही. कारण रतन टाटांनी मानवतेच्या चाकावर उद्यमशीलतेचं रांजण उभं केलं.

हरियाणाची जिलेबी आणि नंदनवनातले ध्रुवीकरण

Haryana and Jammu-Kashmir Assembly Election Results- हरियाणाच्या निवडणूक निकालानंतर जिलेबी पुन्हा चर्चेत आली. हरियाणा प्रचारात राहुल गांधींनीच जिलेब्यांचा मुद्दा पुढे आणला होता. पण हरियाणात सत्ताबदल न झाल्याने याच जिलेब्या काँग्रेससाठी अगोड होऊन गेल्यात. जातीच्या राजकारणाच्या तुलनेत धर्माचं राजकारण टिकून आहे, असा दिलासा सत्तापक्षाला मिळाला. पण नंदनवनातही त्यामुळेच ध्रुवीकरण झालं, हे नाकारता येणार नाही.

रसिकांच्या प्राणांमधला ‘मिठुन’

Mithun Chakraborty : थोडक्या नृत्यशैलीतही आपल्या भावना सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहचवणारा हा बॉलिवुडचा चक्रवर्ती आजही आमच्या हृदयात ग्रेसफुल बिजली बनून चमकतो. बहुजनांचा हा नायक अभिजनांच्या प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार या सर्वोच्च सन्मानाचा मानकरी होतो, याचं कोण अप्रूप आम्हा सगळ्यांना आहे.

रामाची गंगा स्वच्छतेसाठी रॉकीच्या प्रतीक्षेत

रॉकी क्रास्टो आता वयोमानामुळे थकलेत. बाणगंगेच्या तलावाजवळच ते राहतात. पण बाणगंगेच्या तलावात सर्वपितरी अमावस्येला सर्व मासे तडफडून मेले की तीन बत्ती, मलबार हिल परिसरातील सगळे लोक रॉकी क्रास्टोंची आठवण काढतात. कारण गेली कित्येक वर्षे बाणगंगा तलाव वेळेत स्वच्छ करून माशांचे प्राण वाचवायचं काम रॉकी क्रास्टो करायचे.

मेरे दोस्त, मेरे दुश्मन, मेरे हमसाए

बंदुक साफ करताना नृत्यनिपुण असलेल्या हीरोच्या हातून गोळी सुटते आणि ती पायात घुसते. पोक्सो गुन्ह्यातला आरोपी पोलिसाचं पिस्तुल हिसकावतो. त्याची गोळी मात्र पोलिसाच्या; मांडीत घुसते.
घुस के मारेंगे. असं नेते उगा म्हणत राहतात. काहींचा निर्देश प्रार्थनास्थळांकडे, तर काहींचा पाकिस्तानकडे.

इहलोक SAD पण परलोक OMG

senior citizen : घरातल्या वयोवृद्धांना एकाकी टाकलं जातं. मात्र हीच वृद्ध व्यक्ती परलोकवासी होते, त्याक्षणी स्टेटस बदलतं. चंदनाचा हार तसबिरीला लागतो. गंधपूजा होत राहते. श्राद्ध, पिंडदान यथासांग केलं जातं. प्रॉपर्टी नियोजनानिमित्त आठवण तर रोज निघते. एकदा संपत्तीचं वाटप झालं की मग पितृपक्षातच आठवण निघते. इहलोकापेक्षा परलोक जास्त सुखाचा का असतो?

ना राम भरोसे, ना मुख्यमंत्री भरोसे मुंबई तरली यांच्या आधारे

Mumbai Rain – कालच्या पावसात रस्त्यात अडकून पडलेल्या लोकांना पालिकेचा, पोलिसांचा किंवा मुख्यमंत्र्याचा आधार वाटावा अशी परिस्थिती नव्हती. पण तरीही काही अज्ञान मुलं अचानक धावून आली. मुंबईकर स्पिरिट म्हणजे काय हे या मुलांमुळं वारंवार कळतं. पण त्यांना थँक्यू म्हणायचं का राहून गेलं?

भटक्या कुत्र्यांचं एन्काउंटर शक्य आहे ?

stray dogs encounter : भटक्या कुत्र्यांना पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेण्याचं ट्रेनिंग दिलं तर पोलिस भटक्या कुत्र्यांचं एन्काउंटर करून टाकतील. नीच भटक्या श्वानाधमांना गोळ्या घालाव्यात अशी शहरातल्या अनेक सर्वसामान्यांची भावना आहे. श्वानफोबियाग्रस्त मोठं पॉप्युलेशन पोलिसांकडे आशेने पाहात आहे.

फास्टट्रॅक न्याय बंदुकीचा!

Badlapur encounter incident : मीडिया ट्रायलला दूषणं देता देता आता पोलिस ट्रायल प्रस्थापित झालं. आरोपीवरील आरोप सिद्ध होऊन न्यायप्रक्रियेतून त्याला दंडविधान सुनावणीसाठी थांबण्यासाठी पेशन्स राहिलेला नाही. जलदगती न्याय आता पोलिसांच्या न्यायबाह्य बंदुकीच्या गोळीतून मिळतो. आणि लोक त्याचा आनंद व्यक्त करतात. ज्या घटनेचा शेवट गोड, त्याचं सारंच गोड याची अनुभूती सध्या महाराष्ट्र घेतो आहे.

खाईन वनस्पती तुपाशी नाही तर उपाशी

Tirupati Laddu row : प्रसादाच्या लाडवात जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा अंश सापडला. दोष लाडवात नाही तर हे लाडू ज्यात वळले त्या तुपात आहे. साहजिकच तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर अर्थात बालाजी मंदिरात (Balaji Temple) आणि त्यांच्या जगभर पसरलेल्या भक्तसंप्रदायात मोठा गहजब उडाला.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ