फोन पे, जी पे, पेटीएम वरुन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून युपीआय व्यवहारामध्ये मोठे बदल होणार आहेत. हे बदल नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून करण्यात आले आहेत. 15 सप्टेंबरपासून या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. मात्र, हे नियम सामान्य व्यवहारांना लागू नसून ते व्यापारी, व्यावसायिक, संस्थां, दागिणे खरेदी, परकीय चलनातील व्यवहारांना लागू आहेत.
या नव्या नियमांनुसार, विमा कंपन्या, कॅपिटल मार्केट, ट्रॅव्हल एजन्सी, लोन – ईएमआय यासारखे आर्थिक व्यवहार करण्याची मर्यादा 10 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा फक्त वर उल्लेख केलेल्या व्यवहारांसाठीच वाढवलेली आहे. व्यक्ती ते व्यक्ती दरम्यान केल्या जाणाऱ्या (अव्यवसायिक) व्यवहारांची मर्यादा ही प्रति दिवस 1 लाख रुपयेच असणार आहे.
हे ही वाचा : युपीआय पेमेंटच्या नियमांत बदल, जाणून घ्या नविन नियम काय आहेत?
इश्यूरन्स कंपन्या आणि कॅपिटल मार्केटमध्ये दरदिवशी गुंतवणूकीसाठी युपीआयवरुन व्यवहार करताना यापूर्वी 2 लाखाची मर्यादा होती ती आता 5 लाख रुपये केली आहे. त्यामुळे एका दिवशी वेळेला तुम्ही 5 लाख रुपयाची गुंतवणूक करु शकता. तसेच 24 तासामध्ये 10 लाख रुपयापर्यंतचे व्यवहार करु शकता.
पर्यटन क्षेत्रामध्ये आता एकावेळेला 5 लाखापर्यंतचा व्यवहार करता येऊ सकतो. यापूर्वी ही मर्यादा 1 लाख रुपये होती. त्याचप्रमाणे सरकारी ई – मार्केटप्लेस वर कर आणि ईएमडी पेमेंट्स सुद्धा एकावेळेला पाच लाखापर्यंतचे व्यवहार करता येतील. तसेच दिवसाला 10 लाख रुपयापर्यंतचे व्यवहार करु शकता.
युपीआयवरुन आता 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्जाचे आणि ईएमआयचे हफ्ते भरता येतील. तसेच प्रति दिवस 10 लाखाची मर्यादा वाढवून दिलेली आहे. क्रेडिट कार्डे्स बिल पेमेंटमध्येही एकावेळेला तुम्ही 5 लाखाचंही बिल भरु शकता. तसेच प्रतिदिवसाची मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली आहे.
युपीआयवरुन दागिने खरेदी संबंधिचे व्यवहार करताना एकावेळेला 2 लाखापर्यंतचं बिल भरता येईल. तसेच दिवसाला दागिण्यांच्या खरेदी संबंधित 6 लाखापर्यंतचे व्यवहार करता येतील.
बँकेमध्ये टर्म डिपॉझिट करताना डिपोझिट ऑन-बोर्डिंगवर 5 लाखापर्यंतचे व्यवहार करता येऊ शकतात. परकीय चलनातील व्यवहारांची मर्यादाही 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. प्रत्येक ठिकाणी युपीआयच्या माध्यमातून व्यवहार केले जातात. अशावेळी मोठे, व्यावसायिक व्यवहारही या माध्यमातून सहज आणि जलदगतीने करता यावेत यासाठी हे अत्यावश्यक बदल करण्यात आले आहेत.



