10 वर्षाची वन्यजीव फोटोग्राफर श्रेयोवी मेहता

Shreyovi Mehta : नैसर्गिकरित्या हे अद्भूत क्षण आपल्या कॅमेरामध्ये अचूक टिपणे हे कॅमरामनचं कौशल्य असतं. हेच कौशल्य आत्मसात करत जागतिक पातळीवर नाव कमावलं आहे ते श्रेयोवी मेहता हिने. अवघ्या दहा वर्षाच्या श्रेयोवीने ‘वाइल्ड लाईफ फोटोग्राफर 2024’ चा पुरस्कार मिळवला आहे. 
[gspeech type=button]

अलीकडे सगळ्यांच्याच हातात कॅमेरा आहे. कॅमेरा काय काय किमया करु शकतो याची अनेक उदाहरणे आहेत. पण नैसर्गिकरित्या हे अद्भूत क्षण आपल्या कॅमेरामध्ये अचूक टिपणे हे कॅमरामनचं कौशल्य असतं. हेच कौशल्य आत्मसात करत जागतिक पातळीवर नाव कमावलं आहे ते श्रेयोवी मेहता हिने. अवघ्या दहा वर्षाच्या श्रेयोवीने ‘वाइल्ड लाईफ फोटोग्राफर 2024’ चा पुरस्कार मिळवला आहे. 

‘इन द स्पॉटलाइट’

श्रेयोवी मेहताच्या ‘इन द स्पॉटलाइट’ या फोटोला ‘वाइल्ड लाईफ फोटोग्राफर 2024’चा पुरस्कार मिळाला आहे. हा फोटो तिने राजस्थानमधल्या भरतपूर अभयारण्यातल्या केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यानामध्ये घेतलेला आहे. या फोटोमध्ये पहाटेचं दृश्य आहे. पहाटेच्यावेळी जंगलात सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये झाडांच्या कमानीच्या मध्यभागी उभे असलेले दोन मोर, असा हा सुंदर मनमोहक फोटो आहे. 

वाइल्ड लाईफ फोटोग्राफर 2024 पुरस्कार विजेता फोटो – ‘इन द स्पॉटलाइट’

जवळपास 117 देशातल्या 60 हजार फोटोमधून श्रेयोवीचा हा फोटो निवडण्यात आला आहे. यामध्ये सगळ्या वयोगटातल्या फोटोग्राफर्सच्या फोटोंचा समावेश होता.  

दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी लंडनमध्ये तिला 10 वर्षाखालील ‘वाइल्ड लाईफ फोटोग्राफर 2024’ चा पुरस्कार दिला. त्यानंतर तिने काढलेला हा फोटो नेचर हिस्ट्री म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी मांडण्यात आला आहे. दिनांक 11 ऑक्टोबर 2024 ते 29 जून 2025 पर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे. 

वाइल्ड लाईफची आवड

फोटोग्राफी करताना श्रेयोवी मेहता हिचा टिपलेला क्षण

फरिदाबादमध्ये राहणारी श्रेयोवी ही इयत्ता पाचवीत शिकते. तिला जंगल सफारी, प्राणी, पक्ष्यांना न्याहाळणे, सकाळी लवकर उठून जंगलात फिरायला खूप आवडते. निसर्गाशी तिची मैत्री करून दिली ती तिच्या पालकांनी. श्रेयोवी दोन वर्षाची होती तेव्हा ती पहिल्यांदा जंगल सफारीला गेली होती. त्यानंतर जंगल सफारी करणं हा तिचा छंदच बनला. आतापर्यंत तिने दहा राष्ट्रीय उद्यानांना भेटी दिल्या आहेत. या जंगल सफारीतून प्राण्यांना न्याहाळणं आणि त्यांना आपल्या कॅमेरामध्ये टिपणं हे कौशल्य तिला तिच्या वडिलांकडून मिळालं. तिचे वडील शिवंग मेहता हे वाइल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. त्यांनी तिला फोटोग्राफीचं प्रशिक्षण दिलं. तर तिची आई कविता मेहता या वाईल्ड लाईफ डेस्टीनेशन मॅनेजमेंट कंपनी नेचर वेंडरर्स या कंपनीच्या सह-संस्थापक आहे. 

दोन्ही पालक या क्षेत्रात कार्यरत असल्याचा फायदा श्रेयोवीला झाला आहे. यासोबतच इतक्या लहान वयात चिकाटीने शिकून घेण्यात श्रेयोवीचं कसब उत्तम आहे. 

संयम आणि शिस्त खूप महत्त्वाची

“वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होण्यासाठी शिस्त, संयम आणि सकाळी लवकर उठून जंगलात वा आजुबाजूला फिरण्याची आवड असणं खूप गरजेचं आहे. श्रेयोवी मध्ये हे गुण आहेत. अनेकदा एका फोटोसाठी, क्षणासाठी कित्येक तास तिला एकाच अवस्थेत बसून राहावं लागतं. जंगलात एखाद्या प्राण्याची पाणवठ्यावर वा अन्य ठिकाणी येण्याची वेळ माहीत असेल तर तो प्राणी तिकडे येण्यापूर्वी त्या स्थानावर हजर राहून फोटो काढण्यासाठी सज्ज राहावं लागतं. कधी प्राणी ठरल्यावेळी येतो, कधी उशीरा तर कधी येतच नाही. अशावेळी संयम बाळगावा लागतो.” असं श्रेयोवीची आई कविता मेहता सांगते. 

फोटोग्राफीबद्दल श्रेयोवीचे वडील तिला प्रशिक्षण देत असाताचा फोटो

राष्ट्रीय प्राण्यांच्या फोटोला पुरस्कार मिळवण्याचं स्वप्न

पुरस्कार मिळवल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेंशन ब्युरोने श्रेयोवीशी  संवाद साधला. यावेळी तिने तिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. आणि त्याच्या टिपलेल्या फोटोला पुरस्कार मिळाला. आज तो फोटो नेचर हिस्ट्री म्युझीयममध्ये आहे. राष्ट्रीय पक्षी मोर याला हा सन्मान मिळवून देता आला. त्याचप्रमाणे भविष्यात राष्ट्रीय प्राणी वाघ याचा असाच लक्षवेधी फोटो टिपून त्यासाठी पुरस्कार मिळवून त्यालाही भारताचा राष्ट्रीय प्राणी असल्याचा सन्मान मिळवून द्यायचं स्वप्न श्रेयोवीनं बोलून दाखवलं. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

golden year for Indian women athletes : या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत भारतीय महिला खेळाडूंनी जी जबरदस्त कामगिरी केली आहे.
A Decade of Digital India Reel Contest : डिजिटल इंडिया मिशनने गेल्या 10 वर्षात ऑनलाइन शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा, आर्थिक
Good news for central govt staff: आता केंद्र सरकारचे कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी वर्षभरात 30 दिवसांची सुट्टी घेऊ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ