1 सप्टेंबरपासून 8 नियमांमध्ये होणार बदल

1 September Rules Changes : 1 सप्टेंबरपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये आयटीआर फाइलिंगच्या तारखेपासून आधारकार्डशी संबंधित बाबींचा समावेश आहे. 
[gspeech type=button]

1 सप्टेंबरपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये आयटीआर फाइलिंगच्या तारखेपासून आधारकार्डशी संबंधित बाबींचा समावेश आहे. 

आयटीआर फाइलिंगची शेवटची तारीख 

आयटीआर फाइलिंगची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर आहे. या तारखेपर्यंत आयटीआर फाईल करणं अनिर्वाय आहे. जर वेळेत आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला दंडात्मक रक्कम भरावी लागेल. 

आधार कार्ड अपडेट

UIDAI  ने आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 सप्टेंबर 2025 दिली आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड मोफत अपडेट करुन मिळेल. जर यानंतर तुम्ही आधारकार्ड अपडेट करायला गेलात तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील. त्यामुळे जर का तुमच्या आधारकार्डमध्ये जन्मतारिख, वर्षे, मोबाईल क्रमांक वा पत्त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर 14 तारखेपर्यंत हे काम पूर्ण करुन घ्या. 

NPS किंवा UPS पैकी एक पर्याय निवडा

सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) पैकी एक पर्याय निवडण्याचा आदेश दिला आहे. याची अंतिम मुदत 30  सप्टेंबर आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना UPS हा पर्याय निवडायचा आहे त्यांना त्यासाठी विशेष फॉर्म 30 सप्टेंबरपर्यंत भरायचा आहे. 

चांदी खरेदीसाठी नवीन नियम

1 सप्टेंबरपासून चांदीच्या खरेदीसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. ग्राहकांकडे आता चांदी खरेदी करताना दोन पर्याय असणार आहेत. एकतर ग्राहकांना हॉलमार्क असलेलं चांदी खरेदी करता येईल किंवा हॉलमार्क नसलेले चांदिचे दागिणेही खरेदी करता येऊ शकतात. 

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (BIS) चांदिचे दागिणेही हॉलमार्क प्रमाणित करण्यास सुरूवात केली आहे. सध्या हा हॉलमार्क चांदीचं खरेदी करण्याचं बंधन नाही. ग्राहकांना जी चांदी खरेदी करायची आहे ते ती खरेदी करू शकतात. 

फिक्स्ड डिपॉझिट नियमांमध्ये बदल

सध्या अनेक बँका या विशेष फिक्स्ड डिपॉझिट योजना राबवत आहेत. सप्टेंबर 2025 पर्यंत या योजनांमध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येईल. त्यामुळे ज्यांना या विशेष फिक्स्ड डिपॉझिट योजनांमध्ये गुंतवणूक करुन चांगलं व्याज मिळवायचं आहे त्यांना या महिना अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

SBI क्रेडिट कार्डात होणार बदल

1 सप्टेंबरपासून एसबीआय क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्स व्यवस्थेत बदल होणार आहेत. आता प्रत्येक ग्राहकांना सगळ्याच खरेदीवर रिवार्ड पॉइंड्स मिळणार नाहीत. यामध्ये डिजिटल गेम्स, सरकारी वेबसाईट आणि काही ठरावीक वेबसाईटवरून केलेल्या खरेदीचा समावेश आहे. याचा परिणाम एसबीआयच्या अनेक ग्राहकांवर होणार आहे. कारण यापूर्वी एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्या जाणाऱ्या प्रत्येक खरेदीवर रिवार्ड पॉइंट्स मिळत होते. 

इंडिया पोस्टशी संबंधित नवे नियम

इंडिया पोस्ट व्यवस्थेमध्ये आजपासून नवीन बदल होत आहेत. इंडिया पोस्टची रजिस्टर्ड पोस्ट सेवा ही स्पीड पोस्टमध्ये समाविष्ट केली आहे. त्यामुळे रजिस्टर्ड पोस्ट अशी वेगळी सेवा आता इंडिया पोस्टमध्ये नसणार. यामुळे सर्व पोस्ट या स्पीड पोस्टनी पाठवल्या जातील. त्यामुळे या डिलिव्हरी सेवेला गती प्राप्त होईल.  तसेच ग्राहकांना वेगवेगळी पोस्ट सेवा न वापरता एकाच स्पीड पोस्ट अंतर्गत आपली पत्रं, कागदपत्रं पाठवता येतील.

स्वयंपाकघरातील गॅस किंमतीवर परिणाम होणार

स्वयंपाकघरातील  एलपीजी LPG गॅसच्या किंमती या दर महिन्याचा पहिल्या तारखेला बदलत असतात. त्यानुसार आजही या किंमती कमी किंवा जास्त होऊ शकतात. हे बदल जागतिक बाजारपेठवर अवलंबून असतील. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

submarine deals : हिंदी महासागरात चीनची जहाजे आणि पाणबुड्या खूप जास्त प्रमाणात दिसू लागल्या आहेत. याचा आपल्या देशाच्या सुरक्षिततेला धोका
Women in Supreme court : सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायाधीश आहेत. या संपूर्ण न्यायाधीश बेंचमध्ये न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना या
Gen Z Finance : जेन झी ही पिढी वेगळ्या पद्धतीने खर्च करते. त्यामुळे आजच्या व्यवसायिकांना उत्पादनांच्या पलीकडे विचार करण्याची गरज

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ