अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा: आसनव्यवस्थेत भारताला पहिल्या रांगेत स्थान

India-US protocol upgrade : अमेरिकेच्या राजकिय परंपरेनुसार सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असून ही त्यांची दुसरी टर्म असणार आहे. वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटल रोटुंडा येथे या शपथविधी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यासाठी जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी उपस्थिती लावली होती.  
[gspeech type=button]

अमेरिकेच्या राजकिय परंपरेनुसार सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असून ही त्यांची दुसरी टर्म असणार आहे. वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटल रोटुंडा येथे या शपथविधी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यासाठी जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी उपस्थिती लावली होती.  

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नव्हते. मात्र त्यांचे दूत म्हणून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे या सोहळ्यासाठी उपस्थित होते. कोणत्याही सार्वजनिक मोठ्या कार्यक्रमामध्ये देशांच्या पत नुसार आसनव्यवस्थेचं नियोजन केलं जातं. या महत्त्वपुर्ण कार्यक्रमामध्ये भारताला पहिल्या रांगेत स्थान दिलं होत.  तर जपानच्या प्रतनिधींना तिसऱ्या रांगेत स्थान दिलं होतं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्स प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांना शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली आहे. ” माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा.” असं ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. 

एस जयशंकर यांचं ट्विट

एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं पत्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दिलं. याविषयी त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, “आज वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेच्या 47 व्या अध्यक्षांच्या शपथविधीच्या समारंभात पंतप्रधान मोदींचा विशेष दूत आणि भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मला मिळाला”.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतील कॅपिटल रोटुंडा हॉलमधला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया आणि जपानचे परराष्ट्रमंत्री आहेत.  या भेटीमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या ‘क्वाड’ गटाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली.

तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ते भारतीय  वंशांचे उद्योजक विवेक रामस्वामी यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत.  रामस्वामी यांनी ओहयो राज्यातील राज्यपालपदाची निवडणूक लढण्यासाठी ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधीनंतर काही तासांमध्येच सरकारी कार्यक्षमता विभागातून  (DOGE) राजीनामा दिला आहे.

प्रार्थनाविधीत सहभाग

अमेरिकेच्या पद्धतीनुसार शपथविधीपूर्वी प्रार्थनाविधीचं आयोजन केलं जातं. त्यानुसार सेंट जॉन चर्चमध्ये झालेल्या प्रार्थनाविधीमध्येही एस जयशंकर यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर कॅपिटल रोटुंडा हॉलमध्ये मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी ट्रम्प यांना शपथ दिली. 

यावेळी, त्यांनी कुटुंबातील बायबल आणि ऐतिहासिक राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या बायबलचा वापर केला. उपाध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांनी न्यायमूर्ती ब्रेट कावानॉघ यांच्या उपस्थितीत त्यांच्या कुटुंबियांचं बायबल हातात घेऊन शपथ घेतली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ