तुम्हांला भारतीय पासपोर्टच्या पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगांचा अर्थ माहीत आहे का?

Indian Passport :परदेशात असताना आपण मूळ कोणत्या देशाचे नागरिक आहोत याची ओळख पासपोर्टद्वारे होते. देशाबाहेर आपलं ओळखपत्र म्हणून पासपोर्टचा वापर होतो. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट आहेत. आणि त्यांना ओळखण्यासाठी विशिष्ट रंग देण्यात आला आहे.
[gspeech type=button]

देशाबाहेर प्रवास करण्यासाठी पासपोर्ट म्हणजेच पारपत्र हे अत्यावश्यक दस्ताऐवज आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. देशाबाहेर जाण्यासाठी आणि येण्यासाठी पासपोर्ट हवा असतो. परदेशात असताना आपण मूळ कोणत्या देशाचे नागरिक आहोत याची ओळख पासपोर्टद्वारे होते. देशाबाहेर आपलं ओळखपत्र म्हणून पासपोर्टचा वापर होतो. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट आहेत. आणि त्यांना ओळखण्यासाठी विशिष्ट रंग देण्यात आला आहे. चला समजून घेऊयात, पासपोर्टच्या विविध रंगांचा अर्थ आणि असे पासपोर्ट कोणाला दिले जातात ते.

भारतीय पासपोर्टचे प्रकार

नेव्ही ब्लू पासपोर्ट

नेव्ही ब्लू पासपोर्ट हा भारतात सर्वसाधारण प्रकारचा पासपोर्ट आहे.  हा पासपोर्ट सामान्य प्रवासाकरता भारतीयांना देण्यात येतो. भारतातील बहुतांश जणांकडे खाजगी आणि व्यावसायिक परदेशी प्रवासाकरता या रंगाचा पासपोर्ट असतो.

केशरी पासपोर्ट

रोजगाराच्या उद्देशानं परदेशात इमिग्रेशन क्लिअरन्स सर्टिफिकेट आवश्यक असतं. ज्या भारतीयांना परदेशात इमिग्रेशन चेक करणं बंधनकारक आहे, अशा व्यक्तींना केशरी पासपोर्ट देण्यात येतो. इयत्ता 10 वी हून कमी शिक्षण झालेल्या व्यक्तिंकरता हा पासपोर्ट असतो. या पासपोर्टवर इमिग्रेशन चेक आवश्यक (ECNR) असे लिहिलेले असते. हा पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तिंना परदेशात जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. सौदी अरब, कुवैत, ओमान, लीबिया, सीरिया, येमेन, मलेशिया, इराक, जॉर्डन, ब्रुनेई आणि इंडोनेशिया या देशांमध्ये जाण्याकरता केशरी पासपोर्टधारकांना विशेष परवानगी घ्यावी लागते.

पांढरा पासपोर्ट

भारत सरकारचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून परदेशी जाणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट देण्यात येतो. यात आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांकरता हा पांढरा पासपोर्ट राखीव ठेवण्यात आला आहे. केवळ शासकीय कामांकरता परदेशी जाताना हा पासपोर्ट वापरण्यात येतो. पांढरा पासपोर्ट परदेशात अधिकार आणि जबाबदारीचं प्रतिनिधीत्व करतो. या पासपोर्टला अधिकाऱ्यांचा पासपोर्ट म्हणतात.

लाल पासपोर्ट

डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या वेष्टनाचा रंग लाल (मरून) असतो. राजदूत, राजनैतिक अधिकाऱ्यांना हा टाईप डी पासपोर्ट देण्यात येतो. या पासपोर्टला काही खास विशेषाधिकार आणि सवलती असतात. भारताचे इतर राष्ट्रांसोबत असणाऱ्या राजनैतिक संबंधांवर हे विशेषाधिकार आणि सवलती मिळतात.

हेही वाचा: परदेशात राहणाऱ्या भारतीयांना घरबसल्या मतदानाचा हक्क मिळणार का?

भारतीय पासपोर्टचे फायदे आणि वापर 

भारतीय पासपोर्ट असल्यानं जागतिक पातळीवर प्रवास, काम आणि शिक्षण याकरता अनेक संधी मिळतात. भारताचे इतर देशांसोबत कसे संबंध आहेत, त्यानुसार ह्या सवलती मिळतात.

विजामुक्त प्रवास – भारतीय पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तिंना विजाफ्री किंवा विजा ऑन अरायव्हल अशा सवलती देणाऱ्या देशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

आंतरराष्ट्रीय सवलती – परदेशात शिक्षण आणि रोजगाराकरता संधी मिळण्याकरता भारतीय पासपोर्टमुळे गोष्टी सुकर होतात. काही देशांसोबत झालेल्या करारांमुळं भारतीय पासपोर्टधारकांना त्या त्या देशात अभ्यास करणं, राहणं, व्यवसाय आणि काम करण्याकरता सवलती मिळतात.  

नागरिकत्वाचा पुरावा – विजासाठी अर्ज करणे आणि परदेशात शैक्षणिक कार्यक्रमांना प्रवेश मिळवण्याकरता भारतीय पासपोर्टचा वापर नागरिकत्वाचा पुरावा म्हणून होतो.

भारतात पुनर्प्रवेश – कोणत्याही प्रतिबंधांशिवाय भारतीय पासपोर्टधारकांना भारतात परतणं सोपं असतं.

भारतीय पासपोर्टकरता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 

भारतीय पासपोर्टकरता अर्ज दाखल करताना भारतीय पासपोर्टचे प्रकार आणि रंगाचा अर्थ नीट समजून त्यानुसार अर्ज दाखल करावा. भारतीय पासपोर्ट अर्ज प्रक्रियेत माहितीची अचूकता आणि सुरक्षितता यांना खूप महत्त्व आहे. ऑनलाईन पद्धतीनं पासपोर्टच्या अधिकृत पोर्टलवर पासपोर्टकरता अर्ज करावा लागतो. या अर्जात अर्जदाराला वैयक्तित माहिती, पत्ता आणि प्रवासाची माहिती द्यावी लागते. पासपोर्टकरता सरकारने ठरवलेली फी भरावी लागते.  

पासपोर्टकरता आवश्यक कागदपत्रे 

ओळखीचा पुरावा – आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड

पत्त्याचा पुरावा – भाडेकरारपत्र, लाईट बिल, गॅस बिल किंवा ड्रायविंग लायसन्स

जन्मतारखेचा पुरावा– शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला किंवा सरकारने दिलेले कोणतेही प्रमाणपत्र

पासपोर्ट साईझ फोटोग्राफ – नियमानुसार काढलेले पासपोर्ट साईझ फोटो.

ऑनलाईन अर्जासोबत ही कागदपत्रं जोडावी लागतात. ही कागदपत्रं काळजीपूर्वक आणि व्यवस्थित सादर करावीत.    

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Padmashri Awardee : कठपुतळी या कलाक्षेत्रातील योगदाना बद्दल 96 वर्षीय भीमव्वा शिल्लेक्यतारा यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
Sikkim world's first organic state : सिक्किममधील जवळपास 66,000 शेतजमिनी पूर्णपणे सेंद्रिय आहेत. इथे कोणतीही रासायनिक खते किंवा कृत्रिम कीटकनाशके
AI Technology : सुरुवातीला एआय तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचं वक्तव्य केलं जायचं. याला छेद देत एआय तंत्रज्ञानामुळे आपलं काम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ