दुचाकी व्यवस्थित चालवली नाहीतर तुमचं लायसन्स होणार रद्द;1 जानेवारी 2026 पासून नवे नियम लागू!

Government new rules for two-wheelers : तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं आता बंधनकारक आहे. ही सिस्टीम 125 सीसी पेक्षा कमी किंवा जास्त इंजिन असलेल्या सर्व दुचाकी वाहनांसाठी आवश्यक आहे.
[gspeech type=button]

दुचाकी चालवणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गाडी चालवताना जप तुम्ही नियम पाळले नाहीत तर, 3 महिन्यांसाठी तुमचं लायसन्स रद्द होऊ शकतं किंवा मोठा दंड भरावा लागू शकतो. रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारने 1 जानेवारी 2026 पासून काही नवीन आणि महत्त्वाचे नियम लागू केले आहेत.

ABS सिस्टीम आता सगळ्या बाईक्ससाठी बंधनकारक

तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं आता बंधनकारक आहे. ही सिस्टीम 125 सीसी पेक्षा कमी किंवा जास्त इंजिन असलेल्या सर्व दुचाकी वाहनांसाठी आवश्यक आहे.

ABS म्हणजे काय? तर, जेव्हा तुम्ही अचानक बाईकचा ब्रेक लावता, तेव्हा बाईकचे चाक लॉक होऊन ती घसरते. पण ABS सिस्टीममुळे चाक लॉक होत नाही आणि तुमची बाईक घसरत नाही. यामुळे अपघात टाळता येतात आणि गाडीवर नियंत्रण राखता येते.

सरकारच्या आकडेवारीनुसार, 40% पेक्षा जास्त अपघात दुचाकी वाहनांमुळे होतात. यातील अनेक अपघात ब्रेक लावताना गाडी घसरल्यामुळे होतात. हे अपघात कमी करण्यासाठी सरकारने हा नवीन नियम आणला आहे.

या नियमामुळे 125 सीसी पेक्षा कमी इंजिन असलेल्या बाईकच्या किमतीत कमीतकमी 2 हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

बाईकवर दोघांनाही हेल्मेट घालणं आता सक्तीचं

हा नियम देखील 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. या नियमानुसार, बाईक चालवणारे आणि मागे बसलेले म्हणजेच पिलियन रायडर (pillion rider) या दोघांनाही हेल्मेट घालणं बंधनकारक आहे.

जर तुम्ही नियमाचं पालन केलं नाही तर तुम्हाला 2 हजार रुपये दंड किंवा 3 महिन्यांसाठी तुमचं लायसन्स रद्द केलं जाईल. हेल्मेट हे फक्त चालकासाठी नाही, तर मागे बसणाऱ्यासाठीही आवश्यक आहे. दुर्दैवाने, अनेक अपघातांमध्ये मागे बसलेल्या व्यक्तींना गंभीर दुखापत होते किंवा त्यांचा मृत्यू होतो कारण त्यांनी हेल्मेट घातलेलं नसतं.

त्यामुळे, आतापासून, तुम्ही जेव्हा नवीन बाईक खरेदी कराल, तेव्हा डिलरकडून तुम्हाला बाईकसोबत दोन बीआयएस (BIS) प्रमाणित हेल्मेट घेणे बंधनकारक आहे.

सरकारने हे नियम तुमची सुरक्षा लक्षात घेऊन बनवले आहेत. हेल्मेट आणि ABS सिस्टीममुळे बाईकमुळे होणारे अपघात आणि त्यात होणाऱ्या दुखापती कमी होतील. काही अभ्यासानुसार, ABS सिस्टीममुळे रस्ते अपघात 35% ते 40% कमी होऊ शकतात. त्यामुळे हे नियम कठोर केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर
Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ