कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर आढळले सूक्ष्म प्लास्टिकचे कण! केरळ जहाज दुर्घटनेचा परिणाम

Micro Plastic At Kanyakumari : हायड्रोकार्बन प्रकल्पामुळे कन्याकुमारी समुद्र किनाऱ्यावरील अधिवास संपुष्टात येईल अशी चिंता स्थानिक मच्छिमारांनी आणि पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. या चिंतेत आणखीन भर टाकली आहे ती केरळ इथे झालेल्या जहाज दुर्घटनेने. या दुर्घटनेमुळे कन्याकुमारी समुद्रकिनाऱ्यावर सूक्ष्म प्लास्टिकचे कण आढळले आहेत.
[gspeech type=button]

प्रस्तावित हायड्रोकार्बन प्रकल्पामुळे कन्याकुमारी समुद्र किनाऱ्यावरील अधिवास संपुष्टात येईल अशी चिंता स्थानिक मच्छिमारांनी आणि पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. या चिंतेत आणखीन भर टाकली आहे ती केरळ इथे झालेल्या जहाज दुर्घटनेने. या दुर्घटनेमुळे कन्याकुमारी समुद्रकिनाऱ्यावर सूक्ष्म प्लास्टिकचे कण आढळले आहेत. 

केरळ जहाज दुर्घटना

दिनांक 25 मे 2025 रोजी कोची जवळ लायबेरियन मालवाहतूक जहाज उलटल्याने अपघात घडला. या मालवाहतूक जहाजांमध्ये 640 कंटेनर होते. त्यापैकी 13 कंटेनरमध्ये धोकादायक माल होता तर 12 कंटेनर मध्ये कार्बाइड होते. 84.44 मेट्रिक टन डिझेल आणि 367.1 मेट्रिक टन फर्नेस ऑइल होतं. हे जहाज झुकल्यामुळे यातले सगळे कंटेनर खाली पडले. त्यामुळे केरळ किनाऱ्यावर भितीचं वातावरण पसरलं होतं. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तात्काळ नागरिकांना असर्ज जाहीर करत किनाऱ्यावर जाण्यास बंदी घातली.. तसंच पुढे हे कंटेनर किनाऱ्यावर वाहून आल्यावर त्यांना हात न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या दुर्घटनेनंतर कन्याकुमारीच्या किनारपट्टी भागात गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिकचे कण आढळून येत आहेत. यापूर्वी नीरोडीपासून कडियापट्टिनम भागातल्या किनाऱ्यावर हे प्लास्टिक कण आढळले होते. आता राजकमंगलमथुराईपर्यंत हे कण आढळत असल्याचं समोर आलं आहे.  

मालवाहतूक कंटेनरमधून वाहून किनाऱ्यावर येणारा हा कचरा – घटक हे धोकादायक नसल्याचं म्हटलं जातं. मात्र, हे प्लास्टिक सदृश्य घटक असल्याने हे पर्यावरणासाठी आणि समुद्रातल्या परिसंस्थेसाठी धोकादायक असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या कण माशांच्या पोटात गेल्यास अन्न-साखळीमध्ये त्यांचा सहजरित्या प्रवेश होऊ शकतो. त्यामुळे याचा प्रचंड धोका आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे असं मत स्थानिक पर्यावरणवाद्यांनी मांडलं आहे. 

हे ही वाचा : प्लॅस्टिक प्रदूषणाशी लढा देण्यासाठी विकसनशील देशांना मदत करण्यासाठी भारताकडून विशेष निधीचा प्रस्ताव

केरळमध्ये मासे हे प्रमुख अन्न आहे. आतापर्यंत हे प्लास्टिकचे कण केरळहून कन्याकुमारीपर्यंत वाहून आलेले आहेत. पण एकदा का नैऋत्य मान्सून पाऊस पडायला सुरुवात झाली की, मग हे कण दूरवर पसरण्याची शक्यता कोलाचेल इथले जॉन्सन चार्ल्स यांनी व्यक्त केली आहे. 

या मालवाहतूक जहाजावर असलेल्या कंटेनरमध्ये कोणकोणत्या वस्तू होत्या याची पूर्ण माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे समुद्रजीवांना आणि अन्न-साखळीला याचा निश्चित धोका आहे. 

हे प्लास्टिक कण अतिसूक्ष्म असल्यामुळे सागरी जीव हे अन्न सहज  गिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्लास्टिक कण नदी पात्रात किंवा समुद्राच्या तळावर स्थिरावल्यावर त्याचा परिणाम खेकडे, शिंपले, बेंथिक वर्म्स यासारख्या जीवांवर होतो. 

प्लास्टिकच्या कणांशिवाय या कंटेनरमध्ये रसायने, आणि अन्य धोकादायक घटक असण्याची शक्यता आहे. या अपघातानंतर तेल गळती झाल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे या अपघाताच्या धोक्याची तीव्रता ही खूप जास्त असल्याचं स्पष्ट आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Oral Health : हिरड्यांचा त्रास, दात दुखणे, कीड लागणे अशा काही मौखिक समस्यांमुळे पचनसंस्था किंवा स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोग होण्याची शक्यता
Flood-affected areas : भारतामध्ये 600 दशलक्ष लोकं ही किनारी भागात किंवा पूर येणाऱ्या भागात राहतात. प्रचंड लोकसंख्या, राहण्यासाठी अपूरी जागा,
‘निसार’ हा अमेरिका आणि भारत यांनी संयुक्तपणे विकसित केलेला पहिला मोठा ‘पृथ्वी निरीक्षण उपग्रह’ आहे. भूकंप, भूस्खलन आणि ज्वालामुखीचा उद्रेक

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ