आता आधार कार्ड नेहमी सोबत फिरवण्याची गरज नाही! 

Aadhaar card:केंद्र सरकारकडून 'Aadhaar App' लाँच करण्यात आले आहे. हे ॲप वापरण्यास खूप सोपे आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन ॲप बद्दल माहिती दिली.
[gspeech type=button]

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, प्रत्येक भारतीयांसाठी ‘आधार कार्ड’ हे महत्त्वाचं ओळखपत्र आहे. शाळेत, बँकेत, प्रवासात, अगदी हॉटेलमध्ये चेक-इन करताना देखील आधार कार्डची गरज लागतेच. पण आधार कार्ड नेहमी सोबत घेऊन फिरणं किंवा त्याची प्रत (कॉपी) काढत बसणं कंटाळवाणं काम होतं, नाही का?

पण आता ही सगळी अडचण दूर होणार आहे. केंद्र सरकारकडून ‘Aadhaar App’ लाँच करण्यात आले आहे. हे ॲप वापरण्यास खूप सोपे आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन ॲप बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, “आधार व्हेरिफिकेशन हे आता UPI पेमेंट इतकं सोपं होणार आहे.”

या नव्या आधार ॲपमध्ये काय खास आहे?

तुम्ही एखादी वस्तू खरेदी केल्यावर दुकानदाराला ऑनलाईन पैसे देण्यासाठी तुमच्या फोनमधून QR कोड स्कॅन करता, तसंच या ॲपचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनमधून QR कोड स्कॅन करून आपली ओळख पटवू शकता. या ॲपमुळे आधार कार्ड वापरणं खूप सोपं आणि सुरक्षित होणार आहे. सध्या हे ॲप बीटा टेस्टिंग फेजमध्ये आहे. या ॲपवरील काही चाचण्या अजून सुरू आहेत. पण लवकरच हे ॲप सर्वांसाठी उपलब्ध होईल.

हे ॲप UIDAI सोबत मिळून तयार करण्यात आलं आहे. आणि यामध्ये दोन महत्त्वाचे फीचर्स आहेत.

चेहरा ओळखणे (Face ID):

आता तुम्ही फक्त तुमचा चेहरा दाखवून तुमची ओळख पटवू शकता. या ॲपमध्ये Artificial Intelligence तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे तुमच्या चेहऱ्याचं स्कॅनिंग करून लगेच तुमची ओळख पटवली जाईल. त्यामुळे आधार कार्ड सोबत असण्याची किंवा त्याची झेरॉक्स काढण्याची आता गरज नाही.

QR कोड 

जसं UPI पेमेंट्ससाठी आपल्याला QR कोडचा वापर करावा लागतो, तसेच आता आधारच्या ओळखीसाठीही QR कोडचा वापर होईल. तुम्ही ॲपमध्ये QR कोड स्कॅन करताच तुमची ओळख व्हेरिफाय होईल. त्यामुळे आधार कार्ड दाखवण्यासाठी आता फिजिकल डॉक्युमेंट जवळ ठेवण्याची गरज नाही.

या ॲपमुळे होणारे फायदे

आता तुम्हाला दररोज आधार कार्ड आणि त्याची कॉपी सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. फिजिकल आधार कार्ड हवे असले तरी तेही या नवीन मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध असेल.

आधार ॲपवर तुमची माहिती फक्त तुमच्या परवानगीनेच शेअर केली जाईल. केंद्र सरकारने या ॲपमधील डेटा सुरक्षिततेबाबद अधिक लक्ष दिलं आहे. त्यामुळे तुमची माहिती दुसऱ्या कोणाशीही तुमच्या परवानगीशिवाय शेअर केली जाणार नाही.

हेही वाचा : आयटीआर भरायचा आहे.. पण फॉर्म 16 घेतला का?

जसे UPI पेमेंट्सचे व्यवहार सोपे झाले आहेत. तसंच आता आधार व्हेरिफिकेशन सुद्धा खूप सोपं होईल. यामुळे तुम्हाला तुमचा आधार कार्ड प्रत्येक वेळी शोधण्याची आवश्यकता नाही.

आधार ॲपची लाँचिंग ही डिजिटल भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल असणार आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. पण त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. काही लोकांचे आधारकार्ड वरील फोटो मॅच होतं नव्हते तर काहींचे हाताचे ठसे मॅच नाही व्हायचे.मात्र आता आधार ॲपच्या मदतीने त्या अडचणी कमी होतील आणि नागरिकांना अधिक सुलभपणे सेवा मिळतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

government schemes : गेल्या 11 वर्षांपासून देशात मोदी सरकार सत्तेत आहे. या काळात त्यांनी ग्रामीण भागासाठी आणि विशेषतः महिलांसाठी खूप
Kerala : केरळमधले जवळपास 941 गावं आहेत, त्यापैकी 273 गावांमध्ये जंगली प्राण्यांचा त्रास खूप वाढला आहे. हे प्राणी म्हणजे कोण?
Finance : आर्थिक वर्ष 2024 - 2025 चा इन्कम टॅक्स भरण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म्स इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेले

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ