आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी डॉ. पूनम गुप्ता यांची नियुक्ती

RBI Deputy Governor : रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर डॉ. पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2025 पासून पुनम गुप्ता यांनी कार्यभार हाती घेतला आहे. त्यांची नियुक्ती ही पुढच्या तीन वर्षासाठी राहणार आहे. यापूर्वी त्या नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाईड इकोनॉमिक्स रिसर्च संस्थेच्या महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. 
[gspeech type=button]

रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर डॉ. पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2025 पासून पुनम गुप्ता यांनी कार्यभार हाती घेतला आहे. त्यांची नियुक्ती ही पुढच्या तीन वर्षासाठी राहणार आहे. यापूर्वी त्या नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाईड इकोनॉमिक्स रिसर्च संस्थेच्या महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. 

वैविध्यपूर्ण कामाचा अनुभव

डॉ. पूनम गुप्ता यांनी आतापर्यंत राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तसंस्था विषयामध्ये काम केलं आहे. आंतरराष्ट्रीय फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये मायक्रो आणि मार्केट रिसर्च संस्थेत प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. यासह आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि वर्ल्ड बँक मध्ये त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ काम केलं आहे.

अनेक सरकारी – निमसरकारी संस्थेच्या थिंकटँक समित्यामध्ये त्यांचा सहभाग होता. तसंच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समिती आणि 16 व्या वित्त आयोगाच्या समितीच्या त्या सदस्या होत्या. 

हे ही वाचा : तनुष्का सिंग भारतीय हवाई दलाच्या जग्वार स्क्वॉड्रनच्या पहिल्या महिला पायलट

उच्चशिक्षित आणि सर्वसमावेशक कामाचा अनुभव 

डॉ. पूनम गुप्ता यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून अर्थशास्त्रातून पदव्यूत्तर पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या युनिर्व्हसिटी ऑफ मेरिलँड मधून पुन्हा पदव्यूत्तर पदवी घेत अर्थशास्त्रातील पीएचडी घेत शिक्षण पूर्ण केलं.  

पुढे भारतात परतल्यावर त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्सिट्युटमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून काम केलं आहे. याशिवाय राष्ट्रीय सार्वजनिक वित्त आणि धोरण निर्मिती संस्था आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकोनॉमिक्स रिलेशन संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. 

‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ या विषयातल्या त्यांच्या पीएचडीसाठी त्यांना  1998 साली  EXIM बँक पुरस्काराने गौरविलं आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ