द ग्रेट इंडियन फुटबॉल सर्कस

The Great Indian Football Circus : इव्हेंट आयोजक फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्यातील मास्टर राइट्स कराराच्या नूतनीकरणाबाबत अनिश्चिततेमुळे इंडियन सुपर लीगचा 2025/26 हंगाम स्थगित करण्यात आला आहे

फिडे महिला विश्वचषक अंतिम सामना : हम्पीचा अनुभव विरुद्ध दिव्याची युवा प्रतिभा

कोनेरु हम्पीच्या वयाच्या अर्ध्या वयाची असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने या स्पर्धेत टॉप टेनमध्ये असलेल्या तीन बुद्धिबळपटूंना आधीच धक्का दिला आहे. तिन सर्वप्रथम चीनच्या दुसऱ्या मानांकित जिनर झूला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दिव्याने भारताच्याच हरिकाचं आव्हान मोडित काढत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. 19 वर्षीय नागपूरच्या दिव्याने उपांत्य फेरीत माजी महिला विश्वविजेत्या चीनच्या झोंगी टॅनला चेकमेट करत इतिहास रचला होता.

भारतीय महिला क्रिकेट संघात नवी ‘क्रांती’!

इंग्लंडमध्ये एका वनडे सामन्यात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारी क्रांती गौड ही दुसरी भारतीय महिला वेगवान गोलंदाज ठरली आहे. एकेकाळी शेजाऱ्यांकडून अन्न मागून पोट भरण्याची वेळी तिच्या कुटुंबीयांवर ओढवली होती. या हालाखीच्या परिस्थितीत आणि आजूबाजूला खेळाकरता अजिबात पोषक वातावरण नसताना तिच्या वडिलांनी तिच्यातील फास्ट बॉलर हेरला.

64 घरांचा राजा

D. Gukesh Chess Champion : वयाच्या सातव्या वर्षी बुद्धीबळ वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जी. गुकेश पाहिलं होतं. 2024 साली म्हणजे 18 व्या वर्षी त्याने बुद्धीबळ वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. या स्वप्नासोबत आणखीन एक स्वप्न गुकेशने पाहिलं होतं ते म्हणजे या बुद्धीबळपटाचा राजा असलेल्या कार्लसन मॅग्नस याच्याशी खेळण्याचा आणि त्याला चेकमेट करण्याचा. नॉर्वे इथल्या बुद्धीबळ स्पर्धेत हा योगही जुळून आला. गुकेश आणि कार्लसन मध्ये झालेल्या पहिल्या फेरीत गुकेशचा पराभव झाला. कार्लसनने अप्रत्यक्षरित्या गुकेशच्या पराभवाला डिवचलं. मात्र, गुकेशचा आत्मविश्वास डगमगला नाही. फायनलमध्ये त्यांने कार्लसनला त्याच्याच मातृभूमीत दणदणीत चेकमेट करत आपलं आणखीन एक स्वप्न पूर्ण केलं. 

मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांची प्रेरणादायी कहाणी

Sportsman Fauja Singh : ‘टर्बन टोर्नाडो’ म्हणून ओळख असणाऱ्या मूळच्या पंजाबमधील फौजा सिंग यांनी लंडनमधून मॅरेथॉन कारकिर्दीला सुरूवात केली. वयाच्या 89 व्या वर्षी आयुष्य मंदावतं, पण याच वयात फौजा सिंग यांनी मॅरेथॉन धावायला सुरुवात केली. खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या वयात मॅरेथॉनमध्ये धावायला सुरुवात करून अनेक विक्रम रचले.

भारतीय महिला फुटबॉल संघाची गगनभरारी 

The Indian women’s football team : भारतीय महिला फुटबॉल संघ 22 वर्षांत प्रथमच एएफसी महिला आशियाई कपसाठी पात्र ठरला आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे भारताच्या या महिला फुटबॉल संघाने पहिल्यांदाच एएफसी महिला आशियाई कप 2026 साठी पात्रता मिळवली

‘क्रिकेट महासत्ता भारत’, जागतिक क्रीडा महासत्ता बनणार का ?

भारतात क्रिकेट हा बहुतांश जणांचा धर्म आहे. मात्र भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मंजुरी दिली. तळागाळातून क्रीडा कामगिरी वाढविण्यासाठी क्रीडा विज्ञान, औषध आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे. प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांसह क्रीडा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे आणि विकसित करणे. या गोष्टींकरता सीएसआर निधीचा वापर करता येणार आहे.

ऑलिम्पिक खेळ आणि भारत

Olympic Games and India : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना आणि आधुनिक ऑलिंपिक खेळांच्या जन्माच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन’ साजरा केला जातो. सर्व वयोगटातील, पार्श्वभूमीच्या आणि क्षमता असलेल्या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी आणि ऑलिंपिक मूल्ये स्वीकारण्यासाठी हा दिवस खास मानला जातो.

‘पोल वोल्ट’चा राजा!

Mondo Pole Vault : 2024 च्या पॅरिस गेम्समध्ये ड्युपलेंटिसने 6 मीटर अंतर पार करून सुवर्णपदक मिळवले. पण ते त्याच्यासाठी पुरेसे नव्हते. तो स्वतःला आणखी पुढे नेऊ इच्छित होता. त्याने 6.25 मीटरची अविश्वसनीय उडी मारत काही महिन्यांपूर्वी त्याने स्वत:च प्रस्थापित केलेला जागतिक विक्रम मोडित काढला.

नवा भिडू, नवं राज्य

जो क्रिकेटपटू कसोटी संघात आपलं स्थान पटकांवण्यासाठी झगडत होता. तो या संघाचा कर्णधार कसा होऊ शकतो? असा सवाल काही माजी क्रिकेटपटूंनी उपस्थित केला आहे. शुभमन गिलने इंडियन प्रिमियर लीगमध्ये यशस्वीपणे नेतृत्व केलंय. त्यामुळे हा आयपीएलमधील अनुभव त्याच्या पथ्यावरच पडणार आहे. 

पिक्चर अभी बाकी है…

Neeraj Chopra : 16 मे 2025 रोजी दोहामध्ये पार पडलेल्या डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 90.23 मीटर भाला फेकत नव्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. ॲथलेटीक्सच्या मैदानावर त्यानं पहिल्यांदाच 90 मीटरपर्यंत भाला फेकला. आपल्या करिअरमधील त्याची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ