लघु उद्योग क्षेत्राला 20 कोटी रुपयापर्यंतचं टर्म कर्ज पुरवठा केला जाणार
देशात एकूण 5.7 कोटी लघु उद्योग; याद्वारे 7.5 कोटी रोजगार निर्मिती झाली आहे.
इंडिया पोस्ट महिला बँकेचं पुनरूज्जीवन करणार
आसाममध्ये युरिया उत्पादन कारखाना उभारणार
युरिया खत उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यावर लक्ष देणार
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रतीच्या कापूस उत्पादनासाठी विशेष उपक्रम राबवणार
देशातून या आर्थिक वर्षात 60 कोटी मत्स्यनिर्यात केली आहे.
बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना करणार असून मखाना उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची उत्पादकता वाढवणे आणि विपणन करण्यावर भर देणार
डाळींसाठी 6 वर्षाची आत्मनिर्भरता योजना
प्रधानमंत्री धन-धान्य योजना; 100 जिल्ह्यांचा समावेश असणार असून यामध्ये 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे
गरिब, तरुण, अन्नदाता आणि नारी या घटकांच्या विकासावर अधिक लक्ष देणार
भारतातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढच्या पाच वर्षात संधी निर्माण करणार