स्विगीने लाँच केले ‘Snacc’ ॲप; 10 मिनिटांत मिळणार फूड डिलिव्हरी

Swiggy Snacc app : स्विगीने एक नवीन 'Snacc' नावाचे ॲप लाँच केलं आहे. या ॲपद्वारे 10 ते 15 मिनिटांत ताजे आणि चविष्ट खाद्य पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत.
[gspeech type=button]

स्विगीने एक नवीन ‘Snacc’ नावाचे ॲप लाँच केलं आहे. या ॲपद्वारे 10 ते 15 मिनिटांत ताजे आणि चविष्ट खाद्य पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. स्विगीची ही नवीन Snacc सर्व्हिस फास्ट फूड, रेडी टू इट फूड विकते.

ग्राहकांच्या सोयीसाठी तयार केलेल्या या ॲपमुळे नाश्ता, चहाकॉफी, जेवण, स्वीट डिशेस, पास्ता, नूडल्स यांसारख्या अनेक पदार्थांची डिलिव्हरी फास्ट मिळणारं आहे.

स्विगीने नवीन ॲपच्या लाँचिंग बरोबरच काही ऑफर्सही दिल्या आहेत. या ॲपवरून पहिल्यांदा ऑर्डर केल्यावर ₹149 च्या किमान ऑर्डर व्हॅल्यूवर फ्री चॉकलेट कुकी आणि फ्री डिलिव्हरी या ऑफर्स मिळणार आहेत. ‘Snacc’ मुळे स्वस्तात,लवकर आणि फ्रेश फूड सेवा मिळू शकणार आहे.

कसे दिसते ॲप?

स्विगीकडून Snacc हे ॲप 7 जानेवारीला लाँच करण्यात आले. या ॲपच्या बॅकग्राऊंड रंग ब्राईट फ्लोरोसंट हिरव्या रंगाचा आहे आणि त्यावर गडद निळ्या रंगाची अक्षरं आहेत. तुम्ही हा ॲप गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकता.

स्विगीची सुरुवात

स्विगी कंपनीची सुरुवात 2014 साली झाली असून त्यांचे हेड ऑफिस बेंगळुरूमध्ये आहे. भारतातील सर्वात मोठ्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मपैकी स्विगी एक आहे. दिवसाला 1.5 ते 2 मिलियनपेक्षा जास्त ऑर्डर स्विगी पूर्ण करते. स्विगीने SNACC या नवीन ॲपची सुरुवातही बेंगळुरूमध्ये केली आहे आणि लवकरच देशात इतर ठिकाणी हे ॲप सुरु होणार आहे.

स्पर्धेतील इतर खेळाडू

स्विगीचे ‘Snacc’ लाँच केल्यामुळे झोमॅटोच्या ब्लिंकिट, बिस्ट्रो आणि झेप्टो कॅफेसोबत थेट स्पर्धा होणार आहे. अल्ट्राफास्ट फूड डिलिव्हरी सर्व्हिसची मार्केटमध्ये वेगाने वाढ होत असून, कंपन्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत नवे उपाय शोधत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Leather from coconut Water : नारळ पाण्यापासून चामडं तयार करण्याचं तंत्रज्ञानही विकसित झालंय. कल्पवृक्षाच्या आधुनिक वापराचं दारंही खुलं झालंय. हे
Kartavya Bhavan : दिल्लीमध्ये फिरताना ‘कर्तव्य पथ’ पाहण्याचा अनुभव खूपच खास असतो. आणि आता याच कर्तव्य पथावर एक नवीन, सुंदर
UPI Rises to Top : भारताची डिजिटल क्रांती संपुर्ण जगाला थक्क करत आहे. भारताची स्वदेशी पेमेंट सिस्टीम युपीआय (UPI -

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ