आयसीआयसीआय बँकेत नवीन बचत खाते उघडा आणि 50 हजार रुपये विसरा!

ICICI Bank : आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यात ठेवाव्या लागणाऱ्या मिनिमम बॅलन्स (Minimum Average Monthly Balance) मध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे तुम्हाला आता तुमच्या खात्यात जास्त पैसे ठेवावे लागतील. हा नियम खासगी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठा झटका आहे.
[gspeech type=button]

ICICI बँकेने नुकतेच काही नियम बदलले आहेत. हे बदल मुख्यत्वे करून मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आहेत. ज्यांना नवीन बचत खातं उघडायचं आहे, त्यांच्यासाठी हे बदल खूप महत्त्वाचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हे नवीन नियम.

बचत खात्याच्या नियमांमध्ये मोठे बदल

आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यात ठेवाव्या लागणाऱ्या मिनिमम बॅलन्स (Minimum Average Monthly Balance) मध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे तुम्हाला आता तुमच्या खात्यात जास्त पैसे ठेवावे लागतील. हा नियम खासगी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठा झटका आहे. या निर्णयावर सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरू आहे आणि अनेक ग्राहक याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

हा नियम 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडणाऱ्या खात्यांसाठी लागू असणार आहे. त्यामुळे, ज्यांची आधीच खाती आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही.

मिनिमम बॅलन्स किती वाढला?

नव्या नियमांनुसार, वेगवेगळ्या शहरांसाठी मिनिमम बॅलन्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

  • मेट्रो आणि शहरी भाग: आधी हा मिनिमम बॅलन्स 10 हजार रुपये होता, तो आता एकदम 50 हजार रुपये करण्यात आला आहे.

 

  • निम-शहरी भाग: मिनिमम बॅलन्स आधी 5 हजार रुपये होता, तो आता 25 हजार रुपये करण्यात आला आहे.

 

  • ग्रामीण भाग: मिनिमम बॅलन्स 5 हजार होता, तो आता 10 हजार करण्यात आला आहे.

तुम्हाला जर तुमच्या खात्यात इतके पैसे ठेवता आले नाहीत, तर बँक तुमच्याकडून दंड आकारेल. हा दंड  कमीत कमी रकमेच्या 6 टक्के किंवा 500 रुपये दंड म्हणून भरावा लागेल. जमा रकमेवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळेल. तसंच, ज्यांची आधीच ICICI मध्ये खाती आहेत त्यांना सध्या तरी जुनेच नियम लागू असतील.

एटीएम आणि इतर व्यवहारांचे नियमही बदलले

केवळ मिनिमम बॅलन्सच नाही, तर बँक आता एटीएम आणि इतर व्यवहारांवरही शुल्क आकारणार आहे. हे नियम मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी अधिक कडक आहेत.

1. एटीएम व्यवहारांवरील शुल्क

मेट्रो शहरांमध्ये तुम्ही ICICI बँक सोडून इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून महिन्याभरात 3 वेळा मोफत पैसे काढू शकता किंवा इतर व्यवहार करू शकता. यावर तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही. मात्र, या 3 व्यवहारांनंतर तुम्हाला प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 23 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारासाठी उदा. बॅलन्स चेक करणे यासाठी 8.5 रुपये द्यावे लागतील.यामुळे, मोठ्या शहरांतील ग्राहकांना आता ATM वापरताना जास्त पैसे द्यावे लागतील.

2. पैसे जमा करणे आणि काढणे यावरील चार्जेस

तुम्ही एका महिन्यात 3 वेळा मोफत पैसे जमा करू शकता आणि 3 वेळा काढू शकता. यापेक्षा जास्त वेळा व्यवहार केल्यास, तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये चार्ज लागेल. एका महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त 1 लाख रुपये जमा करू शकता. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या खात्यात पैसे जमा केल्यास, त्याची मर्यादा एकावेळी 25 हजार रुपयांपर्यंत असेल.

मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास, प्रत्येक 1 हजार रुपयांसाठी 3.5 रुपये किंवा 150 रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल, ती आकारली जाईल.

आरबीआयच्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याने आयसीआयसीआय बँकेला 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने काही तारण कर्जासाठी स्वतंत्र मूल्यांकाराकडून (व्हॅल्यूअर) संपत्तीचे मूल्यांकन केले नाही. तसेच काही नियमांचे उल्लंघनही बँकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : बँक आणि खातेदारांमध्ये दुवा साधणाऱ्या सीआयएफ क्रमांकाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?

ICICI बँकेकडून हे बदल का करण्यात आले?

बँकेच्या म्हणण्यानुसार, हे बदल ‘उत्कृष्ट सेवा आणि सुविधा’ देण्यासाठी करण्यात आले आहेत. मिनिमम बॅलन्स वाढवल्याने, बँक अधिक प्रगत डिजिटल सुविधा, चांगल्या सेवा आणि इतर फायदे देऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Government new rules for two-wheelers : तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं
Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ