हवाई – इंद्रधनुष्याची राजधानी !

Rainbow Capital : जगात असं एक ठिकाण आहे, जिथे बऱ्याचदा तुम्हाला इंद्रधनुष्य पाहायला मिळेल. आणि ते ठिकाण आहे, अमेरिकेतलं हवाई आयलंड.या हवाई आयलंड वरची हवा स्वच्छ असते, पावसाच्या हलक्या सरी असतात. त्यामुळे तिथे अनेकदा इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. त्यामुळे हवाई विद्यापीठाचे प्राध्यापकांनी त्याला इंद्रधनुष्याची राजधानी असं नाव दिलं आहे.
नोकरीसाठी दररोज विमान प्रवास करणारी रेचल कौर!

Racheal Kaur : दररोजच्या नोकरीसाठी सहजा आपण बस, रिक्षा, लोकल ट्रेन, मेट्रो या साधनांचा वापर करतो. परराज्यात किंवा शहरात कामानिमित्ता जायचं असेल तरच विमान प्रवास केला जातो. पण मलेशियातल्या रेचल कौर या दररोजच नोकरीसाठी विमानाने प्रवास करतात.
जगातली सर्वात महाग गाय भारतीय वंशाची, 40 कोटी रुपयांना विक्री!

Viatina-19 : ब्राझीलमधील एका लिलावात ‘वियाटिना-19’ नावाची गाय तब्बल 40 कोटी रुपयांना विकली गेली आहे. ही गाय नेल्लोर (Nelore) जातीची असून ती आपल्या भारतीय वंशाची आहे. ब्राझीलमध्ये खूप गायी आहेत. पण ही गाय खूप स्पेशल आहे.
अमेरिकेत प्लास्टिक स्ट्रॉ वरची बंदी हटवली ! ट्रम्प सरकारचे नवीन आदेश

Donald Trump Order on Back to plastic : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पेपर स्ट्रॉ वापरायला चांगला वाटत नाही, म्हणून प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे सारं जग हे प्लास्टिक प्रदूषण आणि अन्य प्रदुषणाच्या विरोधात एकसमान धोरणं ठरवून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळेला अमेरिकेत या प्रदुषणाविरोधात एकसमान धोरणं नसणं, त्याउलट राजकारणासाठी त्याचा वापर करणं हे अनपेक्षित आहे.
‘ऑपरेशन डेविल हंट’ बांग्लादेशमध्ये अघोषित आणिबाणी?

Operation Devil hunt : बांगलादेशमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी ‘ऑपरेशन डेविल हंट’ राबवण्यास सुरुवात केली आहे. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत 1 हजार 300 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
ट्रम्प प्रभाव : ‘क्वाड’ला बसणार फटका !

Trump effect: डोनाल्ड ट्रम्प यांचे सत्तेतील पुनरागमन अपेक्षेपेक्षा अधिक वादळी ठरले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्या धोरणांचा फटका रशिया आणि चीनपेक्षा अमेरिकेच्या शेजारील आणि युरोपियन मित्रदेशांना जास्त बसला आहे.
अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेशाचा भयानक प्रवास!

Donkey route to America : अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करणारे स्थलांतरित हे जीवाशी खेळून सीमा ओलांडत असतात. “सीमा ओलांडताना होणारे लैगिंक अत्याचार आणि अनन्वित छळ हे जणू काही अमेरिकेत बेकायदेशीररित्या स्थिरस्थावर होण्यासाठी मोजावी लागणारी किंमत आहे” असा दृढ समज हा या अनधिकृत स्थलांतरितांचा असतो.
इन्कम टॅक्स न घेणारे देश!

Tax Free Country : काही देशांमध्ये ‘व्हॅट’ नावाचा टॅक्स असतो. म्हणजे, कोणतीही वस्तू विकत घेतली किंवा सेवा वापरली, तर त्यावर थोडा टॅक्स लागतो. जमीन आणि मालमत्तेवरही टॅक्स असतो. बाहेरून वस्तू मागवल्या तर त्यावर टॅक्स लागतो. काही देशांमध्ये, ‘कसिनो’सारख्या काही खास उद्योगांवर जास्त टॅक्स असतो.
अमेरिकेतून अनधिकृत स्थलांतरीत भारतात रवाना

Illegal migrants return to India – अमेरिकेच्या सी-17 एअरक्राफ्टमधून भारतातील अनधिकृत स्थलांतरितांना भारतात परत पाठवण्यात आलं आहे. अनधिकृत स्थलांतरितांसंबंधित अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाला भारताने पाठिंबा दिला असून जवळपास 18 हजार भारतीयांना या अंतर्गत मायदेशी परत आणलं जात आहे.
भारतावर ट्रम्प यांचे टॅरिफ्स लागू होणार का?

Trump’s tariffs list : डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवरील वस्तूंवर कर लावण्याचे आदेश दिल्यामुळे अमेरिकेच्या व्यापार भागीदार देशांना अडचण येऊ शकते. तसेच, यामुळे अमेरिकेच्या लोकांना काही आर्थिक समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं.
चंद्रिका टंडन यांना ‘त्रिवेणी’साठी ग्रॅमी पुरस्कार!

Chandrika Tandon : चंद्रिका टंडन यांच्या भारतीय मंत्रपठणाच्या जागतिक संगीतांशी मेळ घालणाऱ्या ‘त्रिवेणी’ या अल्बमला 67 वा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला आहे. चंद्रिका टंडन यांच्या या अल्बममध्ये सात सूरांचं मिलन आहे. ध्यानसाधना करत ‘इनर हिलींग’ करणारं हे संगीत आहे असं टंडन म्हणतात.
अमेरिका WHO मधून बाहेर पडणार का?

Donald Trump:अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रातील अनेक लोक नाराज आहेत आणि काहींनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर टीका केली आहे.