वाघवीरामधील मातीच्या गणपतींचा डंका सातासमुद्रापार!

रायगडमधील पेणसोबतच गेल्या काही वर्षांपासून वाघवीरा (waghawira) हे गावंही गणपती मूर्तींसाठी ओळखलं जाऊ लागलं आहे. गेली चार दशके प्रदीप चिंतामण ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र केतन ठाकूर हे या गावात गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार करतात.  त्यांच्या या कलेमुळे वाघवीरा गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातही पोहोचले आहे.
[gspeech type=button]

रायगडमधील पेणसोबतच गेल्या काही वर्षांपासून वाघवीरा हे गावंही गणपती मूर्तींसाठी ओळखलं जाऊ लागलं आहे.

अलिबाग तालुक्यात वाघवीरा हे छोटंसं गाव आहे. गेली चार दशके प्रदीप चिंतामण ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र केतन ठाकूर हे या गावात गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार करतात.  त्यांच्या या कलेमुळे वाघवीरा गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातही पोहोचले आहे.

मातीची कला परदेशात

ठाकूर कुटुंबाने मातीच्या मूर्तींचे महत्त्व ओळखलं. त्यांच्या कलाकुसरीतून मातीला जीवदान दिले. या वर्षीही त्यांनी विविध आकारातील आणि सजावटीच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती केली आहे. बालगणपतीपासून ते विविध रुपकांसह गणपती अशा वेगवेगळ्या कल्पनांमध्ये ते गणपती साकारतात. गणपतीच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय बोलके असतात. पुणे, सातारा, सांगली, मुंबई, पनवेलमध्ये ठाकूर यांच्या कारखान्यातून गणपती मागवले जातात. इथंच नाही तर सिंगापूर, थायलंडमध्येही या गावातून गणपती पाठवले जातात. 

कापड आणि दागिन्यांची नवी जोड

या वर्षी ठाकूर कुटुंबाने गणपती मूर्ती अधिक आकर्षक करण्यासाठी विविध प्रकारचे कपडे आणि कृत्रिम दागिने वापरले आहेत. या नवीन प्रयोगाने भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

गावाची एकता

या सर्व कामासाठी वाघवीराचे ग्रामस्थ एकत्र येतात आणि मूर्ती सजावटीत सहभागी होतात. यामुळे गावात एकता आणि उत्साह वाढतो.

पेणला जातात मूर्तींचे मॉडेल

गणपती बाप्पांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेणमधील काही कारखान्यात ठाकूर कुटुंबांकडून मूर्तींचे साचे घेतात. 

सर्वसामान्य माणसाच्या बजेटमध्ये गणपती

ठाकुर कुटुंब त्यांच्या मूर्तींचे दर परवडण्याजोगे ठेवतात, ज्यामुळे सर्वसामान्य माणूसही बाप्पाची मूर्ती घेऊ शकतो. मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम लक्षात घेता ठाकूर कुटुंबीय दरवर्षी गणपतीच्या  200 मूर्तीच तयार करतात. यामुळेच त्यांच्या कामातला दर्जा राखला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वारंवर चालणारी क्रीया म्हणजे वारी. या वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. साक्षात भगवान शंकर हे पहिले वारकरी मानले जातात. पण
Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Vedh Shivkalacha : काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारताने सिंधु करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानची वेगळ्या प्रकारे नाकाबंदी केली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ