डोनाल्ड ट्रम्प जानेवारीमध्ये का स्वीकारणार राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार?

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेऊन कार्यभार हाती घेणार आहेत. मग निवडणूक नोव्हेंबर महिन्यामध्ये का घेतली हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर अमेरिकेत निवडणुकीचा जसा दिवस (नोव्हेंबर महिन्यातला पहिला मंगळवार) ठरलेला आहे. त्याप्रमाणे शपथविधीची तारीख (20 जानेवारी) ही कायद्यानुसार निश्चित केलेली आहे. यामागची कथाही रंजक आहे.
जेडी व्हॅन्स हे ट्रम्प यांचे उपाध्यक्ष असतील. भारताशी त्यांचा संबंध काय?

USA Election – डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केल्यावर, त्यांच्या भाषणात जे.डी. व्हान्स आणि त्यांची पत्नी उषा चिलुकुरी व्हान्स यांचं कौतुक केलं.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान

President Donald Trump : अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. 78 वर्षाचे ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्रध्यक्ष असतील. आणि राष्ट्राध्यक्ष पदाची त्यांची ही दुसरी टर्म असणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीनं तीन वेळा निवडणूक लढवून दोनदा विजयाची माळ गळ्यात घातली आहे.
अमेरिकेची पहिली निवडणूक कधी झाली आणि त्याचा परिणाम काय झाला?

US Election: 1788 मध्ये यूएस राज्यघटनेच्या मंजुरीनंतर एका वर्षानंतर 1789 मध्ये अमेरिकेची पहिली निवडणूक पार पडली. ज्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन सर्वमताने अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते
अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष केवळ नामधारी नाही! 5 नोव्हेंबर : अमेरिका निवडणूक

US Election: अमेरिकेचे उपाध्यक्षपद हे परंपरेनुसार राजकारणातील कमी महत्वाचे पद मानले जाते. अनेकांनी उपाध्यक्षाचे कार्य मुख्यत्वे अध्यक्षांना मानसिक आधार देणे आणि अंत्यसंस्कारांमध्ये उपस्थित राहणे एवढेच असल्याचे म्हटले आहे. मात्र, काळ बदलत असताना उपाध्यक्षपदाचे महत्त्व वाढले आहे.
भारत – कॅनडा सायबर वॉर? कॅनडा सरकारच्या सायबर हल्ल्याच्या आरोपाला भारताचे सडेतोड उत्तर

India – Canada Cyber War : भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधला वादात रोज काहीतरी भर पडतच आहे. शीख नेते निज्जर यांच्या हत्येच्या आरोपानंतर आता कॅनडा सरकारने भारतावर सायबर हेरगिरीचा आरोप केला आहे. कॅनडा सरकारच्या या आरोपाला भारत सरकारने सडेतोड उत्तर दिलं आहे. जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी कॅनडा सरकार प्रयत्न करत असून, हाही आरोप याच धोरणाचा भाग असल्याचं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
भारतविरोधी मुशफिक्वल फजल अन्सारे यांची बांग्लादेश सरकारकडून राजदूतपदी नेमणूक

Mushfiqul Fazal Ansarey : बांग्लादेश अंतरिम सरकारकडून पत्रकार मुशफिक्वल फजल अन्सारे यांची राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात उघडपणे टीका करणारे आणि भारतातल्या काही राजकीय घटनांवर पाश्चात्य देशांत जाऊन टीकाटिपण्णी करणारे भारत विरोधी पत्रकार अशी मुशफिक्वल फजल अन्सारे यांची मुख्य ओळख आहे.
24 ऑक्टोबर – संयुक्त राष्ट्र स्थापना दिवस

United Nations Day : दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी देशांनी एकत्र येण्याची गरज भासली. याच उद्देशाने 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली.
संरक्षण कंपनीवर हल्ल्यानंतर तुर्कस्तानचा इराक, सीरीयातील 32 कुर्दी दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक

Turkey : तुर्कस्थानची राजधानी अंकाराजवळील एका संरक्षण कंपनीवर बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात पाच जण ठार आणि 22 जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर बुधवारी रात्री तुर्कस्थानने इराक आणि सीरियामधील कुर्दिश दहशतवाद्यांच्या 32 ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
अमेरिकेमधील निवडणुका या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारीच का होतात?

USA : यूएस अध्यक्षीय निवडणुकांचा दिवस नेहमी नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी असतो. 2024 मध्ये, हा दिवस 5 नोव्हेंबर आहे, तर 2028 मध्ये 7 नोव्हेंबर आणि 2032 मध्ये 2 नोव्हेंबर असेल.
ब्रिक्स परिषदेच्या व्यासपीठावर भारत-चीन संबंध पुनर्स्थापित होतील का?

BRICS : ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिंगपिंग यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे. लडाख येथील गलवान संघर्षाच्या तब्बल चार वर्षानंतर भारत आणि चीन या दोन राष्ट्रांच्या प्रमुखांची जागतिक व्यासपीठावर चर्चा होणार आहे. त्यामुळे याकडे सगळ्याचंच लक्ष लागून राहिलं आहे.
22 ऑक्टोबर 1797 मानवाची ‘पहिली पॅराशूट उडी’

First parachute jump : आकाशात उडण्याचे स्वप्न मानवाने प्राचीन काळापासून पाहिलं आहे. या स्वप्नाला वास्तविकतेमध्ये उतरवण्यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले. यातलेच एक आंद्रे-जॅक गार्नेरिन