भारतीय खाद्यसंस्कृतीत पारंपरिक अन्नसंयोग

Food Combinations : आजच्या काळात “मॉडर्न डायट” आणि “फॅड डाएट्स”च्या प्रभावामुळे ही पारंपरिक अन्नसंयोग (food combinations) विसरले जात आहेत. मात्र, आरोग्यासाठी आणि पचनासाठी हे कॉम्बिनेशन पुन्हा स्वीकारणे गरजेचे आहे. चला काही महत्त्वाचे अन्नसंयोग आणि त्यांच्या मागील विज्ञान जाणून घेऊया.

न्यायदान प्रक्रियेत हस्तलेखन तज्ञांचे मत कितपत ग्राह्य?

Law : ज्ञानाचे व्यवस्थित किंवा पद्धतशीर अंग (सिस्टीमॅटाइझ्ड बॉडी ऑफ नॉलेज) या धर्तीवर हस्ताक्षर शास्त्राला ‘शास्त्र’ म्हणून मानण्यास तज्ज्ञांची हरकत नसते. पण म्हणून न्यायदान प्रक्रियेत पुरावा म्हणून हस्ताक्षर प्रणालीला प्रमाण किती मानावं हा जटिल प्रश्न आहे.

नाट्यगृहांच्या अवस्थेला सरकार जबाबदार की प्रेक्षक?

नाट्यगृहाची दुरावस्था : ‘पुरुष’ या नाटकाचा बीड इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकताच एक प्रयोग झाला. या प्रयोगानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी ही घोषणा केली की, “हा आमचा बीड मधील शेवटचा प्रयोग असेल. यापुढे आम्ही कधीच बीड येथे नाटकाचा प्रयोग करण्यासाठी येणार नाही. आमची इथे येण्याची इच्छाच संपली आहे.” 

वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्त 

womenhood : इसवी सनाच्या चौथ्या आणि पाचव्या शतकात वाकाटक युवराज रुद्रसेन द्वितीय यांच्या निधनानंतर वाकाटक साम्राज्याचा कार्यभार यशस्वपणे सांभाळणाऱ्या सम्राज्ञी प्रभावती गुप्त यांची प्रेरणादायी कथा.

उत्तम बी-बियाणे: शेतीची पहिली गरज

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेख मालिकेच्या पहिल्या 7 भागांमध्ये आपण भारतीय कृषी क्षेत्रासमोर असलेली आव्हाने, या आव्हानांना तोंड देण्यात कृषी निविष्ठा उद्योगांचे योगदान, या उद्योगांची वैशिष्ट्ये, त्यांचे व्यवस्थापन आणि त्यामधील युवकांसाठी असलेल्या संधी अशी विविधांगी माहिती करून घेत या उद्योगांची ओळख करून घेतली. यापुढील भागांमध्ये आपण बी-बियाणे, कृषी रसायने, खते आणि कृषी यांत्रिकी व अवजारे यासारख्या कृषी उद्योगांची सखोल माहिती घेणार आहोत. बी-बियाणे उद्योगापासून सुरुवात करत आहोत.

ग्रामदीप ठरलेली माणसं

Grampanchayat : आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे असतात जी इतरांचं भलं व्हावं म्हणून स्वतःच आयुष्य समर्पित करतात. आपल्या गावासाठी झपाटलेल्या अशा दोन व्यक्तींबद्दल या लेखात जाणून घेऊयात.  

महिलांच्या वयानुसार आहारातील बदल

Pharmacy to fitness : वयाच्या 13 ते 60  या टप्प्यांनुसार आहारात योग्य बदल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण घरच्या पदार्थांचाच यात कसा वापर करू शकतो आणि आपल्या शरीराची गरज कशी भागवू शकतो पाहुयात.   

मुंबई आणि बॉलीवूडचं कनेक्शन

Bollywood: बॉलीवूड’ नावाच्या उद्योगाची 1913 मध्ये सुरुवात झाली. ‘दादासाहेब फाळके’ नावाच्या एका मराठी माणसाने राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट तयार केला आणि तिथून आपल्यातील कलागुणांना वाव देणारी ही इंडस्ट्री सुरू झाली. 1931 मध्ये पहिला हिंदी बोलपट हा ‘आलम आरा’ प्रदर्शित झाला होता. हिमांशू रॉय या कलाकार, दिगदर्शक आणि निर्माता व्यक्तीला या सिनेमाचं आणि ‘बॉम्बे टॉकीज’ या मुंबईतील पहिल्या स्टुडिओच्या निर्मितीचं श्रेय दिलं जातं.

हसीना पारकर – मुंबई अंडरवर्ल्डची गॉडमदर

Haseena Parkar : हसीना, दाऊदची लाडकी लहाण बहिण. डोंगरीसारख्या भागात आणि दाऊद आणि साबिरसारख्या भावांच्या सहवासात राहुनही तिचं स्वप्न अगदी साधी होती. लग्न करायचं आणि सुखानं संसार करायचा. तिनं तसं केलंही, पण नियतीलाही ते कदाचित मान्य नसावं. सुखानं संसार करता करता तिच्या आयुष्यात अशा घटना घडल्या ज्यामुळं हसीना परकारची हसीना आपा झाली. 

कमजोर पेल्विक फ्लोअर आणि त्याचे परिणाम

Pelvic Bone Health : पेल्विक फ्लोअर म्हणजे दोन्ही मांड्यांच्या मधल्या भागात असणारी स्नायूंची रचना जी तुमच्या मूत्राशय- मूत्रनलिका, गर्भाशय- योनीमार्ग आणि गुदाशय गुदद्वार यांना आधार देते. पण जर हे स्नायू कमजोर झाले, तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. चला, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बडोद्याचे मराठी साम्राज्य – भाग 2

Maiboli : महाराष्ट्राच्या प्रादेशिक सीमा आता जरी बांधलेल्या असल्या तरी गेल्या 300 – 400 वर्षापासून भारताच्या विविध भागामध्ये मराठी भाषिक लोक सुखासमाधानाने नांदत आहेत. आपण आपल्या मायबोली सदरामधून देशातल्या विविध राज्यात जपल्या जाणाऱ्या मराठी भाषिक समुदायांचा, त्यांच्या संस्कृतीचा, भाषेचा मागोवा घेत आहोत. आज ‘मराठी भाषा दिना’निमित्त आपण बडोद्यातल्या मराठी समुदायांबद्दल जाणून घेणार आहोत.

गीर्रे‘बाज’

Baaj bird : शिकारी वर्गातले पक्षी हे दिसायला अतिशय कणखर, प्रभावी असतात. त्याची ऐटच काही निराळी असते. गिधाड, गरुड, घुबड, फाल्कन, हॉक्स, केस्ट्रेल यापक्षांसह बाज पक्षी सुद्धा शिकारी पक्ष्यांच्या वर्गातला पक्षी आहे. तर जाणून घेऊयात या बाज पक्षीबद्दल.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ