अक्षता ते उदरभरण

Rice : तांदूळ हा आपला मुख्य, कर्बोदके देणारा पदार्थ आहे. “वरण – भात – तूप – मीठ – लिंबू” या आहारात, क्रमान्वये प्रथिने, कर्बोदके + तंतुमय पदार्थ (हातसडीचा तांदूळ असेल तर) + स्निग्ध पदार्थ + क्षार + जीवनसत्त्वे, अशी शरीराला लागणारी सर्व घटक द्रव्ये सामावली आहेत.  लहान मुलांच्या वाढीसाठी हा अत्यंत पोषक आणि महत्त्वाचा आहार आहे.

सेल्फ ग्रूमिंग

Self Grooming : सेल्फ-ग्रूमिंग हा फक्त दिसण्याचा विषय नाही, तर हा आपल्या आत्मसन्मानाचा आणि यशस्वी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या इमेजला, शरीराच्या आकाराला, त्वचेच्या प्रकाराला आणि नोकरीच्या प्रोफाइलला सुसंगत असे सादरीकरण करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कपडे, केस, पादत्राणे, परफ्यूम आणि मेकअप यांमध्ये केलेली प्रत्येक निवड आपल्याला आत्मविश्वासाने वावरायला मदत करते आणि आपली प्रतिमा अधिक प्रगल्भ बनवते.

माया डोळस : दाऊदच्या सावलीत वाढलेला मुंबईचा बादशाह

Maya Dolas : आयटीआयचं शिक्षण घेऊनही केवळ भरपूर पैसा कमवायचा आहे म्हणून 16 वर्षी गुन्हेगारीत उतरणारा माया डोळस. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊतचा पंटर म्हणून ओळख मिळवलेल्या महेंद्र उर्फ माया डोळसचं मुंबई एटीएसने 16 नोव्हेंबर 1991 च्या दुपारी एन्काऊंटर केलं. माया डोळसचं एन्काऊंटर हे मुंबई पोलिसांचं सर्वात मोठं आणि रक्तरंजित एन्काऊंटर आहे.

सेक्सटॉर्शन हा काय प्रकार आहे?

Internet Sextortion : सेक्सटॉर्शनमध्ये विविध प्रकार मोडतात. पण सगळ्यात एक धागा सारखा असतो तो म्हणजे लैंगिक संबंध किंवा प्रेमाची नाती. 2022 या वर्षभरात एकट्या पुण्यामधून1445 सेक्सटॉर्शनच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. या ‘नोंदवल्या’ गेलेल्या केसेस आहेत. याच्या पाचपट तरी केसेस प्रत्यक्षात घडत असतील असा अंदाज बांधला जातो. सेक्सटॉर्शनच्या घटना कुणाही बरोबर घडू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याबरोबर असं काहीही होऊ नये, यासाठी काळजी घेत सजग राहिलं पाहिजे.  

चिकनगुनिया बदलतोय का?

Chikungunya : चिकनगुनिया हा विषाणू सर्वप्रथम आफ्रिकेमध्ये सापडलेला असल्याने तेथील माकुंडे भाषेतील त्याचे नाव ‘चिकनगुनिया’ (Chikungunya) असं आहे. त्याचा अर्थ “वेदनेने वाकडे करणारा” आजार असा आहे. महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 1500-2000 चिकनगुनियाचे रुग्ण सापडतात.

देखणी पाखुर्डी

Painted Sandgrouse : वाळवंट आणि कोरड्या गवताळ प्रदेशातला रंगीत पाखुर्डी पक्षी खरंच मनाला आणि डोळ्यांना सुखावणारा असतो. पिवळट राखी रंगांच्या या पक्ष्याच्या अंगावर असलेले सुंदर नक्षी खूप आकर्षक असतात.

जमीन आणि हवामान

Permaculture : प्रत्येक पर्माकल्चर प्रोजेक्ट हा युनिक असतो. तो कोणत्या ठिकाणी आहे, त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या गरजा काय आहेत, त्यावर पर्माकल्चरची मूल्ये आणि तत्वे कशी वापरली जातील हे ठरतं. त्यासाठी सर्वात आधी आपली जागा कुठं आहे, तिथलं हवामान, ऊन-वाऱ्याची दिशा, पाणी, इतर नैसर्गिक गोष्टींचा अभ्यास म्हणजेच योग्य पद्धतीने मूल्यमापन करता येणं गरजेचं ठरतं. जागेचं मूल्यमापन (Site Analysis) महत्त्वाचं का?

GRE बद्दलचे समज – गैरसमज

Foreign Education : जीआरई एक्झाम देताना त्यादिवशी तुम्ही किती ‘टेन्शन फ्री’ आहात हे जास्त महत्वाचे असते. अभ्यास तर प्रत्येकाने भरपूर केलेला असतो. पण एखादेवेळी परीक्षा मनाप्रमाणे जात नाही आणि कमी स्कोर येतो. मग बरेच जण दुसऱ्यांदा परीक्षा देत नाहीत. कारण त्यांना वाटते की, दोन्ही परीक्षेचे सरासरी गुण धरले जातात

बांधकाम परवाना आणि गावाचे उत्पन्न

Gram Panchayat : ग्रामपंचायतचे स्वतःचे उत्पन्न जितके जास्त तितका ग्रामपंचायतीला गावाचा विकास करता येतो. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडून ग्रामपंचायतीला मिळणारा निधी हा योजनांच्या अंमलबजावणीसाठी मिळतो. प्रशासकीय खर्च पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीला स्वतःचे उत्पन्नच वाढवावे लागते. हे उत्पन्न वाढवण्याचा मुख्य स्रोत आपल्याला गावातच उपलब्ध असतात. यातला एक महत्त्वाचा स्रोत  म्हणजे परवाना.

भटकत्या आत्म्यांचं अम्युझमेण्ट पार्क

जेआरडी टाटांसोबतही ‘एक डाव भुताचा’ रंगला होता. पुण्यातच टेल्कोचा बंगला त्यासाठी कारणी’भूत’ झाला. या बंगल्यामध्ये त्यांना भुताटकीचा अनुभव आल्याचं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं. पुण्यात मोठा गदारोळ उडाला. अर्थात त्यावेळी महाराष्ट्रात ‘भटकती आत्मा’ नव्हती. आत्म्याला स्त्रीलिंगी संबोधन हिंदी भाषेच्या प्रभावातून आहे याची नोंद घ्यावी.

शेवटी मार्केट पडलं…

Share Market : शेअर बाजार म्हणजे भीती (fear) आणि लोभ (greed) याचा सगळ्यात मोठा खेळ. 12% च्या अपेक्षेने सुरू केलेली गुंतवणूक – 22% मिळत असले – तरी 25% हवेत हा लोभ आणि खरं म्हणजे मार्केट खाली असताना नवीन गुंतवणूक करायच्या ऐवजी मार्केट अजून खाली जाईल ही भीती, अशी परिस्थिती नेहमीच बघायला मिळते.

भारतीय कायदे व्यवस्थेतील तीन नवीन कायदे

New Acts : पूर्वीच्या कायद्यातील गुन्हेगारी तरतुदींमध्ये विविध मोठे आणि लहान बदल करण्यात आले आहेत. हे सगळे बदल करण्यात आल्यावर त्यामागची कारणे, त्याचे फायदे, अंमलबजावणीमधील अडचणी, सुकरता याचा परामर्ष घेणे आवश्यक आहे. 

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ