आरोग्यदायी महिला, आरोग्यदायी गाव

Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला उपस्थित राहत नाही. हे अनेक गावातील चित्र आहे. कुटुंबाची काळजी घ्यायची असेल तर महिलांनी स्वत:च्या शारिरीक, मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं अत्यावश्यक आहे. ही बाब महिलांच्या मनावर बिंबवून त्यांच्यामध्ये निरोगी स्वास्थ्याची जनजागृती करणे ही आजची गरज आहे.
उन्हाळ्यातील आहाराची काळजी

Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची पातळी राखायला मदत करणारी आणि थंडावा देणारी फळं उन्हाळ्यात येतात. तर अशी स्थानिक मौसमी फळं रोज आवर्जून खावीत.
मोठा स्टार नसतांनाही हिट झालेले सिनेमे

ज्या सिनेमाची कथा तुम्हाला सिनेमांत गुंतवून ठेवणारी आहे तो सिनेमा केवळ हिट होतो. मोठ्या पडद्यावर सलमान आहे की राजकुमार राव याने प्रेक्षकांना काही एक फरक पडत नाही. आश्चर्य म्हणजे हा ट्रेंड आजचा नसून खूप आधीपासून सुरू आहे.
शिव आणि विष्णू वैशिष्ट्याचं मिलन पंचमुखी हनुमान!

दक्षिण भारतात चोळ काळातील तमिळ कवी कंबरने त्यांच्या रामायणात राम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना अनुक्रमे विष्णू, लक्ष्मी, आदिशेष, शंख व चक्र यांचे रूप मानले आहे. ही देवत्वाकडे नेणारी प्रक्रिया मध्ययुगीन भक्ती चळवळीची उपज आहे. त्याच अनुषंगाने पुढे विजयनगर साम्राज्याच्या काळात हनुमानाचे वैष्णव संप्रदायामध्ये दैवत्व प्रस्थापित झालेले दिसते.
पार्किन्सन आजार – चेतासंस्थेचा अपक्षय विकार

11 एप्रिल हा दिवस जागतिक पार्किन्सन दिवस म्हणून पाळला जातो. मेंदूशी संबंधित या आजारामुळं शरीराच्या हालचाली, संतुलन, थरथर, आवाज आणि चेहऱ्यावरील हावभाव यावर परिणाम होतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार प्रामुख्यानं दिसून येतो. पाहुयात या आजाराची सुरुवात कशी होते, उपचार आणि कौटुंबिक साहाय्य..
ज्ञान चक्षूंनी दिलं बळ आणि आत्मनिर्भरता!

“हिला शिक्षण कसं देणार?” असा काहीसा विचार बोलून दाखवत शाळेनं हिला शिक्षण देणंच नाकारलं. पण ही मुलगी हारली नाही. सध्या कॅनरा बँकेची अधिकारी, ‘कवडसे’ या पुस्तकाची लेखिका आणि साहित्य जागर या खास अंधांसाठीच्या व्हॉटसअप ग्रुपची एक संस्थापिका- अनुजा संखे…
बी-बियाणे उद्योग – भाग 5

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या बाराव्या भागात आपण भारतीय बियाणे उद्योग क्षेत्रात बियाणे विक्रीसाठी अवलंबिल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची माहिती घेणार आहोत.
जिवंत सातबारा मोहीम

Saatbara Missio : मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी ‘जिवंत सातबारा’ मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय नुकताच 19 मार्च 2025 रोजी राज्य सरकारने घेतला आहे. संपूर्ण राज्यभर एक ते पाच एप्रिल या कालावधीत प्रत्येक गावातील तलाठी मृत खातेदारांची यादी तयार करेल. या मोहिमे अंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण करण्याला प्राधान्य असेल.
इंटरमिटंट फास्टिंग: प्राचीन पद्धती ते आधुनिक ट्रेंड

Intermittent fasting : आपल्या पूर्वजांनी उपवास हा फक्त धार्मिक कारणांसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही केला. आजच्या आधुनिक काळात यालाच ‘इंटरमिटंट फास्टिंग’ असे नाव देण्यात आले आहे. ही पद्धती सध्या जगभर चर्चेत आहे आणि अनेक लोक तिचा अवलंब करत आहेत. समजून घेऊयात ‘इंटरमिटंट फास्टिंग’ म्हणजे नेमकं काय? तो कसा करावा आणि त्याचे फायदे काय आहेत.
मराठी सिनेमांवर असलेली अदृश्य बंधनं

Marathi Entertainment Industry : एक उद्योग म्हणून मराठी चित्रपट उद्योगाला असलेल्या मर्यादा देखील आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम म्हणजे, मर्यादित बजेट आणि निर्माते. हिंदी सिनेमांमध्ये जितक्या सहजपणे कॉर्पोरेट गुंतवणूक होते आणि सिनेमाचा तांत्रिक दर्जा आणि एकूण निर्मिती मूल्य वाढवली जातात तितकी गुंतवणूक मराठी सिनेमांमध्ये सध्या तरी होत नाही. ‘जियो’ उद्योग समूहाने जेव्हा पासून मराठी सिनेमांमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे, तेव्हापासून हे चित्र बदलत आहे ही एक सकारात्मक बाब आहे.
लघुचित्रांद्वारे रामायण

Ramayan : मध्ययुगात भारतात विविध लघुचित्रांच्या विविध चित्रशाळा प्रसिध्द होत्या. त्या चित्रकारांनाही ही रामकथा भावली. परिणामी त्यांनी रामकथेवर आधारीत अनेक लघुचित्रे तयार केली. आज भारतातील विविध संग्रहालयांमध्ये ही लघु चित्रे जतन केलेली आहेत.
मेन्स्ट्रुअल कप – वापरावा की नाही?

Menstrual Cup : हा एक मेडिकल ग्रेड सिलिकॉन किंवा TPE (thermoplastic elastomer) पासून बनवलेला लवचिक आणि गळती न होणारा (leak-proof) कप आहे, जो योनीमध्ये ठेवला जातो आणि जो पाळीदरम्यानचे रक्त गोळा करतो. तो पॅड किंवा टॅम्पॉनपेक्षा वेगळा आहे, कारण तो रक्त शोषत नाही तर गोळा करतो.