खते: एक महत्त्वाची कृषी निविष्ठा

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेत आतापर्यंत आपण कृषी निविष्ठा, त्यांच्यावर आधारित उद्योग, आणि बियाणे उद्योग यांची सविस्तर माहिती करून घेतली. यापुढील भागांमध्ये खत निर्मिती उद्योगाची माहिती मिळेल.
सर्वसमावेशक पंचायत व्यवस्था

24 April Panchayatraj Din: आदिवासी हा घटक मुख्य प्रवाहापासून वेगळा आहे. त्यांचं वास्तव्य, राहणीमान हे इतर घटकांपेक्षा वेगळ्या आहेत. जंगल हा त्यांचे अधिवासाचे आणि रोजी-रोटीचेही साधन आहे. साहजिकच त्यांना सरसकट कायदेव्यवस्था लावून चालणार नाही. कारण त्यांच्या गरजाच वेगळ्या आहेत. त्यांच्या गरजाही पूर्ण व्हाव्यात, संरक्षणही व्हावं आणि जीवनमानही सुधारावं याकरता पेसा कायदा अंमलात आला आहे. पंचायतराज आणि पेसा एकमेकांच्या सोबत इथं काम करतात.
ऋषी आणि कृषी सत्संग!

‘सत्संग’ हा अध्यात्म, धार्मिकतेशी जवळीकता निर्माण करणारा शब्द. याच सत्संगचा वापर करून गावविकास आणि युवाविकास साधता येतो. काही गावांमध्ये हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. ऋषी सत्संगाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून करिअर गाईडन्स आणि कृषी क्षेत्रातील तज्ञांकडून कृषी सत्संगाचं आयोजन करण्यात येत आहे. हे सत्संग नेमके काय आहेत पाहुयात या लेखात..
घटनात्मक स्थानिक शासनव्यवस्था

24 April Panchayatraj Din: 1993 ला 73 वी घटनादुरुस्ती लागू झाली आणि पंचायतराजला बळ मिळालं. अवाढव्य भारतात ग्रामस्तरावर सरसकट एकच पद्धत लावणं शक्य नसल्यानं राज्याच्या गरजेनुसार पंचायतराजची त्रिस्तरीय किंवा द्विस्तरीय पद्धत लागू झाली आहे. पंचायतराज दिनाच्या निमित्तानं आपण आढावा घेतोय पंचायतराज पद्धतीचा. या लेखात तिसऱ्या शासनव्यवस्थेबद्दल जाणून घेऊयात
मराठी भाषिक ज्यूंचा एक अल्प-ज्ञात समुदाय, बेने-इस्रायल

इस्रायलमध्ये राहणारे काही बेने इस्रायल त्यांच्या इस्रायली मुलांसह ज्यू मराठी देखील बोलतात. परंतु हिब्रू ही त्या समुदायांची प्राथमिक भाषा आहे. ज्यू मराठीचे फारसे कागदोपत्री पुरावे उपलब्ध नाहीत. या भाषेचा बारकाईने अभ्यास केल्यास गेल्या तीन शतकांमधील बेने इस्रायल समुदायाच्या उत्पत्ती आणि सांस्कृतिक संपर्कांवर प्रकाश टाकण्यास मदत होऊ शकते.
भारतीय पंचायत व्यवस्थेचा इतिहास

24 April Panchayatraj Din: भारतीय संविधानाच्या 40 व्या भागात राज्य शासनाची नैतिक जबाबदारी म्हणून पंचायतव्यवस्था निर्माण झाली. यामुळे अधिकार नियंत्रित व कर्तव्य जबाबदारीत रुपांतर झाले. लोक पंचायत व्यवस्थेला आपली व्यवस्था न मानता सरकारी व्यवस्था मानू लागले. यामुळे लोकांचा सहभाग कमी झाला. प्रशासकीय हस्तक्षेप वाढला.
उन्हाळ्यातील आरोग्याची काळजी , आजार- भाग दोन

Summer health care : उन्हाळा ऋतूमध्ये शरीरामध्ये उष्णता खूप वाढते, त्यामुळे योग्य आहार-विहार घेतला नाही तर त्वचाविकार, डोळ्यांचे त्रास, उष्माघात आणि पचनाचे विकार सहज होऊ शकतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारा आणि शुद्ध ठेवणारा आहार अत्यंत महत्त्वाचा असतो.
‘द अकॅडमी म्युझियम’ नुसार भारताचे 12 सर्वोत्तम सिनेमे

‘द अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स’ ही लॉसएंजेलिस स्थित संस्था जगभरातील सिनेमाचा इतिहास आणि सिनेमामुळे समाज मनावर होणारा परिणाम यावर अभ्यास करत असते. 2021 मध्ये सुरू झालेल्या संस्थेने भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजवर निर्मिती झालेल्या 12 सिनेमांची यादी नुकतीच प्रकाशित केली आणि त्यांचं प्रदर्शन ‘द अकॅडमी’ मध्ये आयोजित केलं होतं. कोणते आहेत हे 12 भारतीय चित्रपट ? आणि त्यांची काय वैशिष्ट्य आहेत ? जाणून घेऊयात.
ख्रिस्तपुराण – बायबलमधील कथानकाचे मराठीतील पुनर्कथन

जेझुइट थॉमस स्टीफन्स जेव्हा भारतात आले तेव्हा पुराणांना स्थानिक हिंदु धर्मात असलेले महत्व त्यांच्या लक्षात आले. पुराणे मुख्यत्वेकरून धर्माच्या अनुषंगाने इतिहास, पूजापध्द्ती, आचार, विचार, मिथककथा यावर भाष्य करतात हे त्यांनी जाणले. त्याकाळात अनेक पारंपरिक संस्कृत पुराणांचे प्रादेशिक भाषांत भाषांतर झाले होते. ख्र्तिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी या प्रस्थापित भारतीय परंपरेचा स्वीकार करण्याचे ठरवले. पुढील काळात त्यांनी येशू ख्रिस्ताची कथा पुराणाच्या स्वरूपात आणली.
सायबर फसवणूक आणि सुरक्षा

पुण्यातील एका व्यावसायिकाला 11 एप्रिल 2025 ला स्वस्तात कच्चा माल मिळेल असा ईमेल आला. त्या ईमेलवर भाळून हे व्यावसायिक 14 एप्रिलला बिहारमध्ये गेले. तिथं दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला. त्यांच्या खात्यातील 90 हजार रुपये काढले होते. फिशिंगमध्ये माणसांच्या भावनांना हात घातला जातो हे लक्षात घेतलं पाहिजे. यात तीनच भावना हल्लेखोरांच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. एक भीती, दोन लालूच/मोह/ आकर्षण आणि तीन असुरक्षितता.
गर्भावस्थेत रक्तस्त्राव का होतो?

Antepartum Haemorrhage : गर्भधारणा म्हणजे आयुष्यातील सगळ्यात सुंदर प्रवास… पण काही वेळा या प्रवासात काही अडथळे येऊ शकतात, त्यापैकी एक म्हणजे अॅन्टीपार्टम हिमरेज (Antepartum Hemorrhage) म्हणजे गर्भावस्थेतील रक्तस्त्राव. याला ‘प्रसूतीपूर्व रक्तस्त्राव’ असेही म्हणता येईल.
कृषीक्षेत्राला जैव-तंत्रज्ञानाची जोड

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी यांची माहिती मिळेल.