कांदा निर्यात धोरण: धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं!

Policy on Onion Export : 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द केलं. शेतकरी संघटनांनी मात्र, सरकारने वारंवार असे तात्पुरते उपाय करत राहण्यापेक्षा, कांदा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कांदा निर्यातीचे दीर्घकालीन धोरण अंमलात आणावे, अशी मागणी केली आहे. कांदा निर्यात धोरण आणि त्यामध्ये शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताची सांगड घालण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याविषयी या लेखातून जाणून घेता येईल.

पोकरा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

POCRA Project : पोकरा (POCRA – Project on Climate Resilient Agriculture) ही महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाची एक महत्त्वाची योजना आहे. लहान लहान शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी व त्यांची शेती आर्थिक दृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी ही महत्त्वकांक्षी योजना राबवली जाते.

प्रोटीन घेण्याच्या चुकीच्या सवयी आणि त्यांचे परिणाम

Whey protein : प्रोटीन हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, पण अनेक जण अज्ञानामुळे किंवा चुकीच्या सवयींमुळे त्याचा उलटा परिणाम करून घेतात. योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचे प्रोटीन घेतले नाही, तर त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

इंदूरमधील मराठी समाज

Marathi Community in Indore – होळकर आणि इंदूरमधील मराठी समाज महाराष्ट्राला काही नवीन नाही. महाराष्ट्राबाहेर असूनही मराठी संस्कृतीशी आणि भाषेशी अगदी घट्ट जुळलेली माणसं म्हणजे इंदूरमधली मराठी माणसं! या लेखात त्यांच्याविषयीच काही माहिती जाणून घेणार आहोत.

मराठी कलाकारांचं बॉलीवूडमधलं अस्तित्व

Bollywood Industry : मनोरंजन, संगीत, कलाकार यांना भाषेचं बंधन नसतं हे आपण सगळेच मान्य करतो. कारण, कोणतीही कला ही मनापासून व्यक्त होत असते आणि मनापर्यंत पोहोचत असते. आपले मराठी कलाकार अगदी सहजगत्या हिंदी वा अन्य चित्रपटसृष्टीत वावरत असतात. पण एकच खंत आहे की, स्वभावाने भिडस्त असलेल्या आपल्या मराठी कलाकारांना बॉलीवूडने मागच्या काही वर्षांत मात्र आयटी मध्ये बसवतात तसं ‘बेंचवर’ बसवलं आहे.  

‘शालिवाहन शक’ म्हणजे नक्की काय?

Shalivahana Shaka : चांद्रवाहीन कालगणनेचा पहिला दिवस मराठी भाषिक गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. परंपरेप्रमाणे मराठी घराघरांत गुढी उभारली जाणार. पंचागाची पूजा होणार. वर्षफलाचे वाचन होणार. शालिवाहन शके 1947 ला सुरुवात होणार. हे ‘शालिवाहन शक’ म्हणजे नक्की काय? याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

ॲडेनोमायोसिस : एक वेदनादायी आजार!

Adenomyosis pain : प्रत्येकीचा मासिक पाळीचा अनुभव वेगळा असतो. काहींसाठी तो अगदी सहज असतो तर काहींसाठी पाळीची भीती वाटेल एवढा त्रासदायक असतो. बर्‍याच महिलांना मासिक पाळी दरम्यान किंवा नंतरही तीव्र वेदना, जडपणा किंवा असह्य थकवा जाणवतो. बऱ्याचजणी हा त्रास अंगावर काढत राहतात मात्र काहीजणींचा हा त्रास इतका वाढतो की दैनंदिन कामं करणंही कठीण होतं. जर तुम्हालाही अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील, तर त्याची विविध कारणे असू शकतात.  त्यामध्ये ‘ॲडेनोमायोसिस’ हे एक संभाव्य कारण असू शकते. पण नक्की हे काय आहे? चला, समजून घेऊया!

फरिदा लांबे यांचं शिक्षणाशी जुळलेलं समीकरण!

Damini : 1992च्या दंगलीनंतर एकट्या मुंबईत सुमारे दोन लाख मुलं शाळाबाह्य होती. सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून 1995 साली डॉ. माधव चव्हाण आणि फरिदा लांबे यांनी ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. प्राथमिक शिक्षण, बालकामगारमुक्तता, कौशल्यविकास, सेकंड चान्स अशा अनेक उपक्रमांद्वारे फरिदा लांबे भारताच्या कित्येक पिढ्यांना दिशा देण्याचं काम गेली 50 वर्ष करत आहेत.

बी-बियाणे उद्योग – भाग 4

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या अकराव्या भागात आपण भारतीय बियाणे उद्योग क्षेत्रात बियाण्यांची मागणी व पुरवठा, विक्री व वितरण व्यवस्था यांची माहिती घेणार आहोत.

आरोग्य संवर्धन आणि निसर्ग शेती

Organic Farming : शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी शेतीला न्हाऊ घालण्याची जणू जीवघेणी स्पर्धा लागलेली आहे. उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी आरोग्याच्या नव्या नव्या समस्येला आपणास रोज सामोरे जावे लागते. माणसाच्या रोजच्या आहारातील अन्नधान्य ,फळे, भाजीपाला तरी रसायनमुक्त, विषमुक्त असावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. जाणून घेऊया ही निसर्ग शेती करायची कशी?

व्हे प्रोटीनचे पर्याय आणि नैसर्गिक प्रोटीन स्रोत

Whey protein : व्हे प्रोटीन जरी प्रभावी असले तरी काही लोकांना ते पचत नाही, काहींना त्यावर अवलंबून राहायचे नसते, तर काही जण नैसर्गिक आहारातूनच प्रोटीन मिळवण्यास प्राधान्य देतात. काही वेळेला आर्थिक दृष्ट्या सुद्धा महागडे प्रोटीन डबे घेणे शक्य नसते त्यामुळेच, शाकाहारी आहारातून भरपूर प्रोटीन कसे मिळवायचे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

क्षयरोगाचा धोका कोणाला असू शकतो? 

Tuberculosis (TB) disease : 24 मार्च 2025, जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने. क्षयरोग म्हणजे टीबी. हा आजार अनेक शतकांपासून मृत्यूचे कारण ठरत आहे. वेदांमध्येही या आजाराचा उल्लेख सापडतो एवढा प्राचीन हा आजार आहे. माधवराव पेशव्यांचा अकाली मृत्यू हा क्षयरोगामुळे झाला. हा आजार रावापासून रंकापर्यंत कोणालाही होऊ शकतो.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ