गुगलवरुन नंबर घेताना सावधान! 

taking numbers from google : बऱ्याच लोकांना कुठलाही नंबर हवा असेल, तर गुगलवरुन तो शोधण्याची सवय असते. पण अनेकदा गुगलवरचे नंबरही खोटे असू शकतात, हे मात्र आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत नसतं. कॉल सेंटर फ्रॉड्स मोठ्या प्रमाणावर होतात. कारण अनेकदा गुगलवरचे नंबर्स एडिट केले जातात
[gspeech type=button]

बऱ्याच लोकांना कुठलाही नंबर हवा असेल, तर गुगलवरुन तो शोधण्याची सवय असते. पण अनेकदा गुगलवरचे नंबरही खोटे असू शकतात, हे मात्र आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत नसतं. कॉल सेंटर फ्रॉड्स मोठ्या प्रमाणावर होतात. कारण अनेकदा गुगलवरचे नंबर्स एडिट केले जातात. उदा. चाळिशीच्या सुमितने कुठलीशी लाईफ स्टाईल प्रोडक्टस खरेदी करण्यासाठी त्या कंपनीच्या नावाने गुगल सर्च केला. कॉल सेंटरचा जो नंबर गुगलने दाखवला, त्यावर सुमितने कॉल केला आणि प्रोडक्टसची खरेदी केली. पैसेही ट्रान्स्फर केले. पण आठ दिवस झाले तरी प्रोडक्टस काही त्याच्या घरी आली नाहीत. मग त्याने परत त्याच नंबरला कॉल केला तर, थोड्याच दिवसात प्रोडक्ट मिळेल असं त्याला सांगण्यात आलं. पण प्रोडक्ट काही आले नाहीत. परत सुमितने कॉल करण्याचा प्रयत्न केला तर नंबर लागेना, म्हणून मग तो त्या कंपनीच्या साईटवर गेला आणि तिथे जो कॉल सेंटरचा नंबर होता तो डायल केला. साईटवरचा नंबर वेगळा होता. कॉल लागला. सगळं बोलणं झाल्यावर सुमितच्या लक्षात आलं की त्याने ज्या नंबरवर आधी कॉल केला होता तो फ्रॉड नंबर होता. त्यामुळे त्याचे पैसे तर गेलेच पण त्याला प्रोडक्टस मिळाली नाहीत. 

इथे घडलं काय?

तर कस्टमर केअर नंबर जो सुमितने गुगल सर्च मध्ये शोधला तो खोटा होता. फेक होता. त्या नंबरवर त्याला उत्पादनांची माहिती सगळी मिळाली, पण तो नंबर गुन्हेगारांचा असल्याने जे पैसे त्याने ट्रांसफर केले, ते अर्थातच गुन्हेगारांच्या खात्यात गेले आणि सुमितला वस्तू मिळाल्याच नाहीत. 

असे कुठे कुठे घडू शकते?

कस्टमर केअर नंबरच्या बाबतीत अनेक प्रकारचे सायबर गुन्हे आज घडत आहेत. बँक, विविध उत्पादने विकणाऱ्या कंपन्या, विमानाची तिकिटे, खाद्यपदार्थ कंपन्या अशा अनेक ठिकाणी कस्टमर केअर नंबर फ्रॉड्स होतात. 

ग्राहक का फसतात?

गुगल पेजवर ‘suggest an edit’ असा पर्याय असतो. म्हणजे दिलेल्या माहितीत योग्य बदल करा. अनेक सायबर गुन्हेगार याचा फायदा घेतात. कस्टमर केअर नंबर बदलतात. आणि स्वतःचे नंबर त्यात टाकतात. 

काय करा, काय टाळा?

1) कुठल्याही कंपनीची कुठलीही सेवा हवी असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे जो कस्टमर केअर नंबर दिलेला असतो त्यावर नेहमी कॉल करावा. 

2) गुगल सर्च मध्ये येणारे नंबर फेक असू शकतात हे ध्यानात ठेवले पाहिजे. 

3) बँकांचे टोल फ्री नंबर डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या मागे दिलेले असतात. किंवा कार्डबरोबर जे पत्र येतं त्यातही दिलेले असतात. ते लिहून ठेवावेत. तसेच बँकांच्या अधिकृत साईट्सवरही ते असतात. तेच वापरावेत. 

4) गुगलवर माहिती सहज उपलब्ध असते, पण ती खरी असेलच असं नाही. त्या माहितीची पडताळणी झालेली असतेच असं नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Mirzapur: महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या नेरी मिर्जापुर या गावाने शाश्वत विकासाचे वेगवेगळे
Summer health care : उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेशी निगडित विकारांमध्ये फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे, आहारात
ज्ञान देणारी पुस्तकं ही आपली खरी संपत्ती असतात. काळ, काळानुसार आपण पुढे सरकत असतो. आपलं श्रीमंत साहित्य हे आजच्या सिनेमांसाठी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ