शेफ डोक्यावर ती लांब, पांढरी टोपी का घालतात?

chef’s hat : शेफ टोपीची सुरुवात फॅशन म्हणून झाली नव्हती. ती शेफच्या पदाचा, त्याच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा एक सन्मान म्हणून वापरली जायची. पूर्वी स्वयंपाकघरात कोण किती मोठा शेफ आहे हे त्याच्या टोपीच्या उंचीवरून ठरत होतं. ज्या शेफची टोपी जास्त उंच, तो तितका मोठा आणि अनुभवी शेफ समजला जायचा.

डासांच्या विनाशासाठी ‘चतुरां’ची मोठी मदत

Dragonfly : चतुर हे डासांचा बिमोड करण्यासाठी उत्तम शस्त्र आहे हे अभ्यासाअंती स्पष्ट झालं आहे. शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार, जर तुम्ही एका चतुरला मारलं तर तुम्हाला 100 डासांचे चावे सहन करायला लागतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

पाण्यात बोटं सुरकुततात? यामागचं खरं कारण काय?

Fingers wrinkle in water : आपल्याला वाटतं की, बोटांवर सुरकुत्या पडतात कारण पाणी त्वचेत मुरतं आणि त्वचा फुगते. पण विज्ञान मात्र वेगळंच सांगतं. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, बोटांवर पडणाऱ्या सुरकुत्यांमागे आपल्या शरीरातील नसा (Nerves) जबाबदार असतात. आपल्या शरीरात नकळतपणे घडणारी ही प्रक्रिया आहे.

आपल्या रोजच्या खाण्यातून पोटात जातंय प्लास्टिक! जाणून घ्या मायक्रोप्लास्टिकपासून कसा करायचा बचाव

Microplastic in food : आपल्याही नकळत आपण जे खातो-पितो त्या माध्यमातून अनेकदा मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जात असतं. मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचं विघटन होऊन झालेले बारीक कण. प्लास्टिकचे हे तुकडे 5 मिमीपेक्षा लहान असतात. आपल्या डोळ्यांना तर ते दिसतही नाही. हे तुकडे पाणी, मीठ, फळं आणि अगदी बाटलीबंद पाण्यातून आपल्या शरीरात प्रवेश करतात.

माणसांच्या अंगावरील केस कसे नाहिसे झाले?

Body Hairs : माणसाची उत्क्रांती ज्या सस्तन प्राण्यांपासून झाली, त्या प्राण्यांच्या अंगावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर केस पाहायला मिळतात. मात्र, माणसाच्या अंगावरच्या केसाच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. हा बदल कोणत्याही कॉस्मेटिक सर्जरीमुळे झाला नाही तर, मानव ज्या वातावरणात राहू लागला त्या वातावरणीय बदलामुळे हा बदल घडला आहे. जाणून घेऊयात हे कधी आणि कसं घडलं. 

कपडे ओले झाल्यावर त्यांचा रंग गडद का दिसतो ?

clothes appear darker : कपडे पाण्यात बुडवल्यावर पाणी त्या कपड्याच्या धाग्यांमध्ये आणि खडबडीत जागी शिरतं. यामुळे कपड्याचा तो खडबडीतपणा कमी होतो आणि त्याचा पृष्ठभाग थोडा गुळगुळीत होतो. आणि कपड्याचा खरा, मूळ रंग अधिक स्पष्टपणे दिसतो आणि म्हणूनच रंग आपल्याला अधिक गडद वाटतात.

सस्तन प्राण्यांप्रमाणे ‘हे’ तीन पक्षी आपल्या पिल्लांना पाजतात दूध!

Birds Crop Milk – तुम्हांला माहितीयत का दूध पाजणारे पक्षी? हो तुम्ही बरोबर वाचलत दूध पाजणारे पक्षी! आपण आतापर्यंत पाहत आलोत की सस्तन प्राणी आपल्या पिल्लांना दूध पाजतात. आणि पक्षी आपल्या पिल्लांना दाणे किंवा लहान कीटक भरवतात. पण जगात तीन पक्षी मात्र याला अपवाद आहेत. पाहुयात हे पक्षी कोणते आहेत?

लाईटशिवाय चालणारा ‘मातीचा फ्रिज’; उन्हाळ्यातील गावाकडचा थंडगार उपाय!

Mitticool fridge : आजच्या आधुनिक फ्रिजसारखाच, पण लाईटशिवाय चालणारा आणि नैसर्गिक थंडावा देणारा मातीचा फ्रिज म्हणजेच मिट्टीकूल फ्रिज. हा पारंपरिक फ्रिज पूर्णपणे मातीपासून बनवला जातो आणि त्याला कोणतीही वीज लागत नाही.

च्युइंग गम चघळताय ? मग हे वाचा – एका गममधून शरीरात जातात हजारो मायक्रोप्लास्टिकचे कण

Chewing gum : नवीन संशोधनात असं आढळलं आहे की, च्युइंग गम चघळताना त्यातून शेकडो छोटे प्लास्टिकचे कण आपल्या लाळेत मिसळतात. च्युइंग गम सिंथेटिक असो वा नैसर्गिक दोन्ही प्रकारच्या गममधून प्लास्टिक कण बाहेर पडतात.

आपल्या विचारांची गती किती?

Human brain: शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार आपले डोळे, कान आणि त्वचा एका सेकंदात अब्जावधी बिट्स माहिती गोळा करतात. मात्र आपला मेंदू एका सेकंदात फक्त 10 बिट्स इतकीच माहिती प्रोसेस करू शकतो. याचा अर्थ आपल्या विचारांची गती ही माहिती गोळा करण्याच्या गतीपेक्षा 10 कोटी पट कमी आहे

साखर खाणं बंदच केलं तर….

sugar : आपल्या शरीरात साखरेचा पुरवठा कमी झाला की, शरीरात ‘ग्लायकोजेनोलिसिस’ नावाची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत, शरीरात साठवलेले ‘ग्लायकोजेन’ साखरेत बदलतं.

सुवासिक मेणबत्तीमुळेही हवा प्रदूषण!

scented candles : अनेकांच्या घरात अगरबत्तीऐवजी सुवासिक मेणबत्त्यांचा वापर केला जातो. या मेणबत्त्या दिसायला अतिशय मनमोहक असतात. पण तितक्याच त्या घातक सुद्धा असतात. या मेणबत्त्यांमधून निघणारा धूर हा डिझेल इंजिनमधून निघणाऱ्या धूरापेक्षाही जास्त घातक असतो,असं अभ्यासातून समोर आलं आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ