वक्फ दुरूस्ती विधेयक नेमकं काय आहे?

Waqf Board Amendment Bill : दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी केंद्रिय मंत्री किरण रिजिजू यांनी सादर केलेलं वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत रात्री 2 वाजता मतदान प्रक्रियेनंतर 288 मतांनी पास झालं. दिनांक 3 एप्रिल रोजी हे विधेयक राज्यसभेत सादर केलं. राज्यसभेत जवळपास 14 तास या विधेयकावर चर्चा झाली. त्यानंतर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास मतदान प्रक्रिया सुरू झाली. यावेळी विधेयकाच्या बाजुने 128 मतं आणि विरोधात 95 मतं पडली. अशा पद्धतीने वक्फ दुरूस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पास झालं. तर जाणून घेऊयात वक्फ दुरूस्ती विधेयक नेमकं काय आहे.
जीएसटी ई – इनव्हॉईस म्हणजे काय?

GST E-Invoice : जीएसटी कौन्सिलच्या मंजुरीनंतर देशभरात बिझनेस टू बिझनेस ई – इनव्हॉईस वा इलेक्ट्रानिक इनव्हॉईस ही जीएसटी पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. दिनांक 1 एप्रिल 2025 पासून या नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात ही ई – इनव्हॉईस वा इलेक्ट्रानिक इनव्हॉईस नेमकी काय व कशी असणार आहे आणि नियमात काय बदल होणार आहेत.
भारतातून क्षयरोगाचं निर्मूलन होईल का? काय सांगतो जागतिक आरोग्य संघटनेचा वार्षिक अहवाल

Global Tuberculosis Report : 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेचा 2023 सालचा अहवाल पाहता… जगभरातल्या 82 लाख नवीन रुग्णांमध्ये निम्म्याहून अधिक रुग्ण हे भारतातले आहेत. जवळपास 28 लाख क्षयरोगाचे रुग्ण हे भारतातून आहेत. जागतिक टक्केवारीनुसार 26 टक्के रुग्ण हे भारतातले आहेत.
‘वनतारा’ प्राणी पुनर्वसन केंद्र प्रकल्प नेमकं काय आणि कसा बनला आहे?

Vantara : वनतारा हा जगातला सगळ्यात मोठा प्राणी बचाव प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. या प्रकल्पात 25 हजार हून अधिक प्राण्यांची काळजी घेतली जात आहे. तसंच या प्रकल्पात 48 हून जास्त दूर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या जातींचं संवर्धन केलं जात आहे.
काय आहे केंद्र सरकारची सार्वत्रिक पेन्शन योजना?

UPS : केंद्र सरकार नवीन सार्वत्रिक पेन्शन योजना लागू करणार असल्याचं विचाराधीन असल्याबाबत चर्चा सुरू आहेत. खासगी, असंघटित, स्वयंरोजगार क्षेत्रातल्या अधिकाधिक लोकांना या पेन्शन योजनेच्या माध्यमातून निवृत्तीकाळात आर्थिक साहाय्य मिळावं म्हणून ही योजना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.
भारताने का सुरू केली स्थूलतेविरोधात जनजागृती मोहिम

Obesity Awareness : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय पातळीवर स्थूलता म्हणजे ओबेसिटी विरोधात मोहिम सुरू करत असल्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा गायिका श्रेया घोषाल यासह देशातील इतर प्रसिद्ध दहा व्यक्तिंना ब्राण्ड अम्बेसॅडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांच्या विरोधात दाखल केलेला विशेषाधिकार प्रस्ताव ! काय असतो विशेषाधिकार प्रस्ताव ?

Privilege Motion : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या ‘पुअर थिंग’ या टिप्पणीमुळे भाजपा खासदारांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात राज्यसभेत विशेषाधिकार प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावामध्ये सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती पदाचा आणि आदिवासी समुदायाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
वेगवेगळ्या एआय असिस्टंट ॲपमधलं वैविध्य

AI assistant app : आता चर्चा होतेय ती वेगवेगळ्या एआय असिस्टंट ॲपच्या वापराबद्दल. या ॲपचे दर, ते कसे काम करतात, ते हाताळताना काय अडचणी आहेत, कोणत्या ॲपची काय वैशिष्ट्य आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
प्लास्टिक इतकेच कागदी कप आणि प्लेट्सही धोकादायक

Paper Disposable Things : प्लास्टिकच्या वस्तुमध्ये गरम अन्नपदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे आपण प्लास्टिक पिशव्या, पॅकेजिंग किंवा प्लास्टिक कपांमधून चहा पिण्याचं टाळतो. या प्लास्टिक कपांना पर्याय म्हणून आपण पटकन कागदी कपांतून चहा मागतो. पण हे कागदी कपही प्लास्टिक कपांइतकेच हानीकारक आहेत. हे कागदी कप आणि प्लेटस् आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही हानीकारक आहेत.
अमेरिका आणि चीन मध्ये ‘एआय’ वॉर

Deepseek : चीनमधल्या डीपसीक या स्टार्टअप कंपनीने शब्दश: अमेरिकेतल्या सिलीकॉन व्हॅलीला हादरवलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी सत्तेची सूत्रे हातात घेताच चीनच्या उत्पादनावर 100 टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर चीनचं एआय असिस्टंट ॲप डीपसीक अमेरिकेसाठी मोठा सेट बॅक ठरला आहे.
7.25 लाख भारतीय अमेरिकेतून परतणार?

America Birthright Citizenship : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वासह अमेरिकेत अनधिकृतरित्या स्थलांतरण करणाऱ्यांवरही कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, अमेरिकेत स्थलांतरितांचे लोंढे थोपवण्यासाठी थेट जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदाच रद्द करण्याचा निर्णय धक्कादायक आहे.
दर 10 मिनिटांनी शरीरात होतात बदल!

Human body : जगातील सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे माणसाचे शरीर स्वतःला सतत पुनर्निर्मित करत असते. आपल्या शरीरात दर 5 ते 10 मिनिटांनी नवीन पेशी तयार होतात आणि जुन्या पेशी नष्ट होतात. तुम्हांला आश्चर्य वाटेल पण दर 7 ते 10 वर्षांनी आपल्याला पूर्णपणे नवीन शरीर मिळते.