तुम्हाला चंचल बनवणारा ‘ब्रेन फॉग’ हा आजार नेमका काय आहे?

Brain Fog : जेव्हा आपल्याला दैनंदिन जीवनातल्या गोष्टीसुद्धा ठळकपणे आठवत नाही, दैनंदिन जो ठरलेला क्रम आहे की सकाळी उठल्यापासून कुठे काय करायचं या क्रमांमध्ये सुद्धा आपण गोंधळतो, एखाद्या कामावर पूर्ण लक्ष देता येत नसेल तर याचा अर्थ तुमचा मेंदू हा पूर्ण थकलेला आहे हे स्पष्ट होतं. या स्थितीला ब्रेन फॉग असं म्हटलं जातं.

देशातला पहिला मासिक बेरोजगारीदर अहवाल प्रसिद्ध

Unemployment Rate : केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने गुरुवार, दिनांक 15 मे  2025 रोजी एप्रिल 2025 महिन्यातला मासिक बेरोजगारीदरा संदर्भात माहिती प्रसिद्ध केली. भारतात यापूर्वी तिमाही किंवा वार्षिक बेरोजगारी दर जाहीर केला जायचा. मात्र यंदा पहिल्यांदाच एप्रिल महिन्याचा बेरोजगारी दर केंद्र सरकारने स्वतंत्ररीत्या जाहीर केला आहे.

बुद्ध पौर्णिमा आणि वन्यप्राणी गणना काय आहे संबंध?

Wildlife Census: गेल्या काही वर्षांपासून वन्यप्राणी गणना करण्यासाठी ठसे मोजणे या पारंपरीक पद्धतीसोबतच नाईट व्हिजन आणि मुव्हमेंट सेन्सर असणाऱ्या कॅमेऱ्यांचाही उपयोग करण्यात येतो. वनकर्मचाऱ्यांसोबत वन आणि वन्यप्राणी संवर्धानावर काम करणाऱ्या प्राणीमित्रांनाही या कामामध्ये जोडून घेण्यात येतं.

सिंधूचा प्रवाह रोखणं भारताला महागात पडेल का?

India Pakistan : भारताने पाकिस्तानला जाणारं सिंधू नदीचं पाणी अडवून 9 मे 2025 ला 17 दिवस झाले. पाणी अडवून पाकिस्तानला धडा शिकवणं ही अल्पकाळासाठी चांगली रणनिती होऊ शकते. पण वाहत्या पाण्याचा प्रवाह रोखणं हे भारताला दीर्घकाळासाठी शक्य आहे का? भारत त्या अनुषंगाने पूर्ण सज्ज आहे का? भारताप्रमाणे चीनने ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी अडवलं तर मग काय? चला समजून घेऊयात..

देशात जातनिहाय जनगणना होणार, म्हणजे नेमकं काय?

Caste Wise Census : जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा आला की सत्तेत असलेले पक्ष चालढकल करायचे तर विरोधात बसलेले पक्ष आग्रही भूमिका मांडायचे. मात्र, केंद्र सरकारने बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी देशभरात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जातनिहाय आरक्षण नेमकं काय असतं, त्यामुळे कोणते आणि काय फायदे होणार आहेत हे आपण समजून घेऊया.

यूपीआय पेमेंट प्रणाली सर्व्हर वारंवार डाऊन का होतो?

UPI: मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जवळपास तीन वेळा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे जी पे (GPay), फोन पे आणि पेटीएमवरुन पेमेंट करणाऱ्या वापरकर्त्यांना अडचणी आल्या. या सर्व्हर डाऊनचं एक कारण होतं की, मार्च अखेरीस आर्थिक वर्ष संपण्याच्या या कालावधीत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी जोडलेल्या सगळ्या बँका या ट्रान्झॅक्शन तपासण्याचं काम करत होत्या.  

उन्हाळ्यात कोणता कपडा जास्त चांगला – कॉटन की लिनेन? जाणून घ्या दोघांमधला फरक!

Cotton or linen : कॉटन आणि लिनेन हे दोन वेगळ्या प्रकारचे कापड आहेत. लिनेन हे फ्लेक्स नावाच्या एका खास प्रकारच्या वनस्पतीपासून तयार होतं. तर, कॉटन हे आपण नेहमी पाहतो त्या कापसाच्या झाडापासून मिळतं.  लिनेन तयार करण्याची प्रक्रिया ही कॉटनच्या तुलनेत जास्त वेळखाऊ आणि मेहनतीची असते.

रोमन कॅथॉलिक समुदायाच्या नवीन पोप निवडीची प्रक्रिया नेमकी कशी असते?

Pope Election Process : रोमन कॅथॉलिक समुदायाचे पोप फ्रान्सिस यांचे भारतीय वेळेप्रमाणे सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी निधन झालं. 2013 पासून पोप फ्रान्सिस यांनी रोमन कॅथॉलिक समुदायाच्या सर्वोच्च पदाची धुरा सांभाळली होती. आता त्यांच्या पश्चात ही जबाबदारी कोणावर सोपवली जाणार आहे? कार्डिनल्स कॉन्क्लेव्ह म्हणजे काय? नवीन पोपची नियुक्ती कशी केली जाते? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असणार.  तर जाणून घेऊयात रोम मधल्या व्हॅटिकन सिटीमध्ये अगदी नियोजनबद्ध पद्धतीने नवीन पोपची निवड प्रक्रिया कशी केली जाते.  

कलाक्षेत्रातील एआय वापरामुळे सर्जनशीलतेला धोका; महाराष्ट्र सायबर विभागाची मार्गदर्शक तत्वे जाहीर

Cyber Guidelines for using AI in Art : सायबर सुरक्षितता, कला जोपासण्या सबंधातली नैतिकता आणि बौध्दिक मालमत्ता हक्क-अधिकार जोपासण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने कलाक्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी मार्गदर्शक तत्वे जाहिर केली आहेत.

चीनमध्ये प्राण्यांच्या क्लोनिंगची मागणी का वाढतेय? 

Pet Cloning Market in china : क्लोनिंगचे एवढे प्रचंड दर असूनही चीनमध्ये आपल्या पाळीव प्राण्याचं क्लोनिंग करण्याचं प्रमाण अधिक आहे. यामागे ट्रेंड फॉलो करणे या कारणापेक्षा भावनिक कारण हे जास्त आहे. समजून घेऊयात चीनमधली पाळिव प्राण्यांची काळजी घेण्याचं आमि क्लोनिंग क्षेत्र कशापद्धतीने विकसीत होत आहे.

‘कांचा गाचीबोवली’ वादाचं कारण काय?

Kancha Gachibowli : सरकारला गरज पडली की सरकारी जमिनींचा लिलाव करायचा हा अघोषित, अलिखित कायदाच बनला. तेलंगणा सरकारनेही सरकारी तिजोरी भरण्यासाठी हीच पद्धत अवलंबली आहे. तेलंगणा सरकारने आता थेट वन्यजीव प्राण्यांचा अधिवास असलेल्या कांचा गोचीबोवली जमिनीचाच लिलाव करण्याची घोषणा करुन नव्या वादाला सुरुवात केली आहे.

आरोग्य खर्चात सरकारी अर्थसाहाय्य…

Government Medical Schemes : योग्य आरोग्य सुविधा आणि उपचार मिळणे हा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व अन्य नागरिकांसाठी विविध आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. अनेकदा या योजनांचीच माहिती नसल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. जागतिक आरोग्य दिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊयात सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा योजना कोणत्या आहेत व त्याचा लाभ कसा घ्यावा.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ