भारत 25 ऑगस्टपासून अमेरिकेत जाणारी सर्व पार्सल सेवा करणार बंद, ट्रम्प टॅरिफचा परिणाम!

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल सेवा बंद करणार आहे.
शुक्रवारपर्यंत अतिवृष्टी कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज!

बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर जनसुनवाई दरम्यान हल्ला!

साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईसह राज्यात पावसाचा हाहाकार !

Rain Updates : हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि कोकणाला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून, गरज असल्यास घराबाहेर पडा, अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत. मराठवाडा भागातही मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.
कबुतरखान्यांवरील बंदी कायम ! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Kabutar Kahana Banned : कबुतरखान्याकडून पक्षांना खाद्य घालण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने कोर्टात दिली. या मागणीनुसार पालिका सकाळी 6 ते 8 या वेळेत पक्षांना खाद्य घालण्यासाठी परवानगी देण्याचा विचार करत असल्याचं कोर्टाला सांगितलं. यावेळी कोर्टाने मात्र, सार्वजनिक आरोग्याचा विचार करता मुंबई हायकोर्टाने कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवली. तसेच पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही, हेही स्पष्ट केलं.
मुंबईतही करा रोप वेने प्रवास! आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटी दरम्यान रोप वे!

Ropeway project: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) लवकरच आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटीपर्यंत एक खास रोप-वे सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे रोज कामासाठी फिल्म सिटीमध्ये जाणाऱ्या हजारो लोकांना आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.
माथेरानमधील हातरिक्षांवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी !

hand-pulled rickshaws : सर्वोच्च न्यायालयाने हात रिक्षा चालवण्यावर बंदी घातली आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाला ओढत नेणे हे ‘अमानवी’ आहे असं स्पष्ट करत न्यायालयाने या हातरिक्षांवर बंदी घातली आहे
कोर्ट मुख्यमंत्री साहाय्यता निधीची चौकशी करणार नाही; माहिती अधिकारा अंतर्गत सामान्य माणसांनी या निधीची माहिती मिळवावी

CM Relief Fund : मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच मुख्यमंत्री साहाय्यता निधी (CMRF) संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने या निधीच्या कामात थेट हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
राज्यातल्या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू

Revised Reservation in Maharashtra : महाराष्ट्र सरकारने आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये जिल्हा पातळीवर गट क आणि गट ड पदांसाठी सुधारित आरक्षण धोरण आणि रोस्टर लागू केलं आहे.
महाराष्ट्रात 42 हजारहून अधिक बांग्लादेशींना बनवाट जन्म प्रमाणपत्रे दिल्याचं उघडकीस

Fake birth certificates to bangladeshis : महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 42 हजारहून अधिक बांग्लादेशींना दिलेली ‘बनावट’ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
मालेगाव स्फोटातील सातही आरोपी पुराव्याअभावी निर्दोष, 17 वर्षानंतर एनआयए विशेष कोर्टाचा निकाल

Malegaon Blast : मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या (NIA Court) विशेष कोर्टाने तब्बल 17 वर्षानंतर हा निकाल दिलेला आहे.
काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानचीच भाषा, लोकसभेत सिंदूर चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी गरजले!

पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही जागतिक नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही. मोदी यांनी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल महत्त्वाची बाब मांडली की, काँग्रेस पक्ष अनेक आठवड्यांपासून पहलगाम दहशतवाद्यांबद्दल विचारत होता.
त्यानंतर, काल, जेव्हा भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव दरम्यान दहशतवाद्यांना ठार मारले तेव्हा त्यांनी विचारले की श्रावणी सोमवारीच असे का घडले?