पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केली. यामुळे विरोधकांकडून मोदींवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पनादास चंद्रचूड यांनी त्यांच्या निवासस्थानी मोदींचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांनी पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाख परिधान करून गणपतीची आरती केली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मोदी यांनी स्वतःही एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गणपती पूजेचा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओनंतर विरोधकांनी न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र भाजपनं या घटनेला आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून समर्थन केलं आहे.
विरोधकांकडून आक्षेप
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उबाठा गट) नेते संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, “संविधानाच्या घरालाच आग लागली आहे.” यावेळी राऊत यांनी न्यायव्यवस्थेतील कार्यक्षमतेवर आणि विविध प्रकरणांवरील निर्णय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
#WATCH | On PM Modi visiting CJI DY Chandrachud's residence for Ganpati Poojan, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, " Ganpathi festival is going on, people visit each other's houses. I don't have info regarding how many houses PM visited so far…but PM went to CJI's house… pic.twitter.com/AVp26wl7Yz
— ANI (@ANI) September 12, 2024
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही यावर नापसंती दर्शवली. पंतप्रधानांना खासगी निवासस्थानी बोलावणे धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यात अंतर असणे आवश्यक आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
भाजपचे समर्थन
दुसरीकडे, भाजपने या घटनेला समर्थन देत म्हटले की, “गणपतीची आरती करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळं पंतप्रधानांनी न्यायव्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही.”