रेल्वेने एसी क्लाससाठी प्रतिक्षा यादीची मर्यादा 60 टक्क्यांपर्यंत वाढवली!

Indian Railway : रेल्वेने एसी डब्याची मर्यादा 25 टक्क्यावरुन 60 टक्के केली आहे. तर नॉन - एसी डब्यातली प्रतिक्षा यादीची मर्यादा 30 टक्के केली आहे. यासंदर्भातले सुधारित आदेश रेल्वेने दिनांक 28 जून 2025 रोजी काढले. याशिवाय आरक्षित जागांची यादी ही गाडी सुटायच्या 8 तास आधी प्रसिद्ध केली जाणार आहे. 
[gspeech type=button]

रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांमध्ये सर्व वर्गवारीतल्या प्रतिक्षा यादींची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार एसी डब्याची मर्यादा 25 टक्क्यावरुन 60 टक्के केली आहे. तर नॉन – एसी डब्यातली प्रतिक्षा यादीची मर्यादा 30 टक्के केली आहे. यासंदर्भातले सुधारित आदेश रेल्वेने दिनांक 28 जून 2025 रोजी काढले. याशिवाय आरक्षित जागांची यादी ही गाडी सुटायच्या 8 तास आधी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

रेल्वे प्रतिक्षा यादीचा सुधारित आदेश

यापूर्वी 17 एप्रिल 2025  रोजी सर्वच डब्यासाठी प्रतिक्षा यादीमध्ये 25 टक्क्यांने वाढ करण्याचा आदेश रेल्वेने काढला होता.  त्यानुसार 16 जूनपासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. पण, प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे रेल्वेने सर्वच डब्यासाठी  25 टक्के प्रतीक्षा यादीची मर्यादेमध्ये बदल करत सुधारीत आदेश काढला आहे. या सुधारीत आदेशानुसार एसी डब्याची मर्यादा 60 टक्के असेल तर सामान्य डब्याच्या  प्रतीक्षा यादीची मर्यादा 30 टक्के असणार आहे. 

ही सुविधा रिमोट एरियातून आणि तात्काळ तिकीट आरक्षणा अंतर्गत तिकीट आरक्षित करणाऱ्यांनासुद्धा लागू होणार आहे. मात्र, सवलतीच्या दरात आणि वॉरंटवर  तिकीट घेणाऱ्यांचा समावेश या प्रतीक्षा यादीत केला जात नाही. 

आरक्षित जागांची यादी 8 तास आधी देणार

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये आरक्षित जागांची यादी ही पूर्वी गाडी सुटायच्या चार तास आधी दिली जायची. यामुळे प्रवाशांचा गोंधळ होत असे. गाडी पकडण्यासाठी दूरवरुन येणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडायची. त्यामुळे ही आरक्षित जागांची यादी आता 8 तास आधी दिली जाणार आहे. म्हणजे दुपारी 2 च्या सुमारास किंवा त्या आधी ट्रेन सुटणार असेल तर आदल्या दिवशी रात्री 9 च्या सुमारास ही यादी रेल्वेच्या साईटवर जाहीर केली जाईल.  जेणेकरुन ज्या प्रवाशांचं तिकीट प्रतिक्षा यादीमध्ये आहे ते आरक्षित झालं आहे की नाही याची माहिती त्यांना 8 तास आधी समजू शकते. जेणेकरुन त्यांना त्यानुसार व्यवस्था करता येईल. 

तिकीट बुकिंगसाठी नवीन प्रणाली

तिकीट बुकिंग प्रक्रिया ही जास्त वेगवान आणि पारदर्शी असली पाहिजे म्हणून रेल्वे मंत्रालय आता पीआरएस प्रणाली सुरु करणार आहे. डिसेंबर 2025 पासून पीआरएस प्रणाली अंतर्गत तिकीट बुक करता येणार आहे. यापूर्वी CRIS प्रणाली वापरली जायची.  या प्रणाली अतंर्गत एका मिनिटाला 32 हजार तिकीटं बुक केली जातात. मात्र, पीआरएस या नवीन प्रणाली अंतर्गत एका मिनिटाका 1.5 लाख तिकीटं बुक करता येणार आहेत. तर मिनिटाला 40 लाख चौकश्या करता येतील इतकी ही प्रणाली वेगवान असणार आहे. याशिवाय या प्रणालीमध्ये प्रवाशांना वेगवेगळ्या भाषएत माहिती दिली जाणार आहे. ते वापरण्यासाठी जास्त सोपं असेल तसेच यामध्ये प्रवासी आपलं आवडतं सीट – जागा निवडू शकतात. यामध्ये तिकीट दरही दिले जाणार आहेत. यावरुन कोणत्या दिवशी दर कमी आहेत हेही पाहता येईल. शिवाय अपंग बांधवासाठी सुद्धा विशेष सुविधा दिल्या जाणार आहेत.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार
साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ