माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन

[gspeech type=button]

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. येचुरी यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनासंबंधी एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शनमुळे त्रास होत होता. त्यामुळं 19 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी मद्रास इथं झाला. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर आई कल्पकम येचुरी सरकारी अधिकारी होत्या.

येचुरी यांचं शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठ इथं झालं. जिथं ते राजकारणात सक्रिय झाले.

जेएनयू विद्यार्थी संघाचे ते तीन वेळा अध्यक्ष राहिले होते. त्यांच्या नेतृत्वामुळं ते राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले. 1996 मध्ये त्यांनी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत संयुक्त आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. तसेच, 2004 मध्ये यूपीए सरकारच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मार्क्सवादी विचारधारा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे येचुरी यांची उणीव देशाच्या राजकीय पटलावर नेहमीच जाणवेल.

येचुरी यांच्या निधनाबद्दल अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केले आहेत.

 

राहुल गांधी यांची X वरील पोस्ट

“सीताराम येचुरीजी माझे मित्र होते.त्यांच्याकडे आपल्या देशाची सखोल समज होती आणि ते भारताच्या विचारसरणीचे रक्षक होते. आमच्यात होणाऱ्या दीर्घ चर्चांची मला नेहमीच उणीव जाणवेल. या दुःखाच्या क्षणी त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि समर्थकांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.”

ममता बॅनर्जी यांची X वरील पोस्ट

 

“सीताराम येचुरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. त्यांचं जाणं राष्ट्रीय राजकारणासाठी मोठी हानी आहे. मी त्यांचे कुटुंब, मित्र आणि सहकारी लोकांप्रती शोक व्यक्त करते”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची X वरील पोस्ट

 

“ज्येष्ठ माकप नेते कॉ. सीताराम येचुरी यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी जीवन समर्पित करणारे तत्वनिष्ठ नेते देशाने गमावले आहेत.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ