भारत शेजारील राष्ट्रांशी रुपयामध्ये व्यवहार करणार; आरबीआयचा निर्णय

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, भारत आता नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशांसोबत रुपयामधून व्यवहार करणार आहे. त्यामुळे भारताची आणि त्यांच्या शेजारील राष्ट्रांची डॉलरवरील अवलंबित्व कमी होईल.
युपीआय, रेल्वे प्रवासाशी संबंधित ‘या’ नियमांत आजपासून होणार बदल

आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात. त्यामुळे जाणून घेऊयात आजपासून तुम्हाला काय काय बदल घडणार आहेत.
NASA च्या नव्या तुकडीत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त

NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच ‘एस्ट्रोनॉट क्लास’ ची घोषणा केली आहे. ही निवड NASA च्या 60 वर्षांहून अधिकच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी ऐतिहासिक ठरली आहे, कारण या तुकडीत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. अंतराळ संशोधनात महिलांना समान संधी देण्याच्या दिशेने नासाचे हे मोठं पाऊल आहे.
पर्यटनासाठी भारतातील लोकांची पसंती कोणत्या देशाला?

Foreign Travel : 2024 साली सगळ्यात जास्त भारतीयांनी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये प्रवास केला आहे. पश्चिम आशियाई देशानंतर सौदी अरेबिया, अमेरिका, थायलंड, सिंगापूर, युनायटेड किंग्डम, कतार, कॅनडा, कुवेत आणि ओमानचा क्रमांक लागतो. एकत्रितपणे, या टॉप टेन देशांमध्ये भारतातून होणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी सुमारे 71.1 टक्के प्रवासी होते. म्हणजे परदेशात फिरायला जाणाऱ्यांपैकी साधारण तीन चतुर्थांश लोकांनी या दहापैकी एका ठिकाणाला भेट दिली आहे.
‘स्मार्ट सिटी’चं स्वप्न नव्हे, तर ‘डेटा-विक्री’चं मार्केट!

smart cities plan : स्मार्ट सिटी मिशनने सर्वात मोठी गोष्ट कोणती केली असेल, तर ती म्हणजे सरकारी पैशातून आपला ‘डेटा’ मोठ्या प्रमाणात गोळा केला. शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक, ट्रॅफिक आणि कचरा गोळा करण्याची अत्यंत बारिक माहिती गोळा केली.
करुर इथल्या चेंगराचेंगरीला कोण कारणीभूत आहेत पोलिस यंत्रणा की टीव्हीके नेता विजय?

Karur Stampede : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी अभिनेता विजय यांच्या करूर इथल्या राजकीय रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी संदर्भात न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांना चौकशीचे दिले आहेत.
‘कोचिंग क्लास’: भारतातील शिक्षण खर्चाचे बदलते चित्र

coaching classes: कोचिंग क्लासवर होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत गुजरात राज्य देशात अव्वल आहे. इथला प्रत्येक विद्यार्थी वर्षाला क्लासवर सरासरी ₹14,545 रुपये खर्च करतो. तसंच, दिल्ली (प्रति मूल सरासरी) ₹ 14,424 आणि महाराष्ट्र (प्रति मूल सरासरी) ₹14,398 या राज्यांचा नंबर देखील गुजरातच्या मागोमाग लागतो
अंदमानमध्ये आढळले नैसर्गिक वायूचे साठे; केंद्रिय मंत्री हरदिप सिंग पूरी यांची माहिती

Natural Gas in Andaman Sea : अंदमान बेटावर नैसर्गिक वायूचे साठे आढळल्याची माहिती केंद्रिय मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी दिली. अंदमान द्वीप समुहाच्या पूर्वीकडे जवळपास 17 किमी अंतरावर श्री विजयपुरम इथे दोन विहिरींमध्ये तेलाचे साठे मिळाले आहेत.
मिग 21 निवृत्त तर तेजसचा करार अजूनही प्रलंबित

Mig – 21 and Tejas : भारताचे मिकोयान-गुरेविच-21 म्हणजेच मिग-21 हे लढाऊ विमाने टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत. शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी या विमानांना निरोप दिला जाणार आहे. गेल्या सहा दशकांपासून ही विमाने भारतीय हवाई दलाच्या सेवेत होती. या लढाई विमानांच्या जागेवर आता वजनाने हलके आणि अत्याधुनिक अशी तेजस विमाने भारतीय हवाई दलाच्या सेवेत येणार आहेत. भारताला या लढाऊ विमानांची नितांत गरज आहे. मात्र, त्यासाठी वेळ लागत आहे. भारत आपल्या स्क्वॉड्रनची ताकद वाढवण्यासाठी काय करत आहे? भारतीय हवाई दलाला अधिक जेट विमाने का समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे?
‘आय लव्ह मोहम्मद’ ट्रेंडवरुन देशभरात वादाच्या ठिणग्या

I Love Mohammed trend controversy : ‘आय लव्ह मोहम्मद’ या ट्रेंडवरून देशभरात जातीय दंगलसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. अचानक या घटना का घडू लागल्या ? हा आय लव्ह मोहम्मद ट्रेंड कोणी कुठे कसा सुरू झाला आणि त्यावरून नेमका वाद का उद्वभवला ? यासोबतच या ट्रेंडला प्रत्यूत्तर म्हणून सुरू झालेल्या आय लव्ह महादेव ट्रेंड कसा आहे हे जाणून घेऊयात.
हिंसाचारात रुपांतर झालेले ‘लडाख आंदोलन’ काय आहे आणि त्याचे नेते सोनम वांगचूक कोण आहेत?

बुधवारी लेहमध्ये झालेल्या संघर्षात 4 जणांचा मृत्यू आणि 70 जण जखमी झाल्यानंतर लडाखमध्ये अस्वस्थ शांतता आहे. सरकारने निदर्शकांना चिथावणी देण्याच्या आरोपावरून या आंदोलनाचे प्रणेते सोनम वांगचुक यांच्या भाषणांना जबाबदार धरले आहे.
अमेरिका टॅरिफचा भारताच्या हिरे- दागिने व्यापाराला धक्का: लाखो कामगारांचे भविष्य धोक्यात

America’s tariff: भारतातील हिरे आणि दागिन्यांचा उद्योग हा केवळ एक व्यापार नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या उद्योगात कोट्यवधी रुपयांचा व्यापार होतो आणि लाखो लोकांना रोजगार मिळतो. विशेषतः, ग्रामीण भागातील आणि शहरांमधील अनेक कुटुंबांची उपजीविका यावर अवलंबून आहे. मात्र अमेरिकेच्या या नव्या व्यापार धोरणामुळे या उद्योगावर मोठं संकट कोसळलं आहे.