गुगल आणि मायक्रोसॉफ्ट नाही तर अश्विनी वैष्णव यांची पसंती ‘झोहो’ला!

झोहोचं वैशिष्ट्य म्हणजे गोपनीयतेवर लक्ष केंद्रित करणे. अनेक टेक दिग्गजांप्रमाणे, ते जाहिरातींवर अवलंबून नाहीत. त्यामुळं वापरकर्त्यांचा डेटा खाजगी राहण्याची खात्री असते.
आयुर्वेद लोकांसाठी आणि ग्रहांसाठी

Ayurveda Day : दरवर्षी धनतेरस या दिवशी हा आयुर्वेद दिवस साजरा केला जायचा. मात्र, चंद्राच्या कलेवर आधारीत असलेल्या कॅलेंडरमध्ये तिथीनुसार बदल होतो. त्यामुळे गॅगरियन कॅलेंडरनुसार एक दिवस निश्चित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यानुसार या वर्षापासून प्रत्येक वर्षी 23 सप्टेंबर या दिवशी हा आयुर्वेद दिन साजरा केला जाणार आहे.
ट्रम्प टॅरिफचा फटका तामिळनाडूमधील बिहारच्या स्थलांतरित कामगारांना!

Migrant workers Tamil Nadu : तामिळनाडूतील तिरुपूर शहर कापड उद्योगासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे बनवलेले कपडे जगभरात, विशेषतः अमेरिकेत निर्यात केले जातात. पण सध्या या शहरावर आणि इथल्या कामगारांवर मोठं संकट उभं राहिलं आहे.
राजकीय पक्षांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करा- मद्रास उच्च न्यायालय

Madras High Court : राजकीय पक्षांच्या रॅली आणि सभांना परवानगी देताना त्यासाठी सर्व पक्षांना समान विशेष मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिलेले आहेत. या मार्गदर्शक तत्वांसह संबंधित पक्षाकडून सार्वजनिक मालमत्तेच्या संभाव्य नुकसानासाठी ठेवी घेण्या संदर्भातही तरतूद करावी असंही स्पष्ट केलं आहे.
तुमच्या करिअरसाठी एक खास मार्गदर्शक: ‘माय करिअर ॲडव्हायझर’ ॲप!

My Career Advisor app: ‘माय करिअर ॲडव्हायझर’ ॲप हे तुमच्या करिअरच्या प्रवासातील एक महत्त्वाचं साधन आहे. हे ॲप वापरून तुम्ही तुमच्या आवडीचा मार्ग शोधू शकता आणि भविष्यात एक यशस्वी करिअर घडवू शकता
लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील कामगार उपाशी

Maharashtra government schemes : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना घोषित केल्यापासून योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची मोठ्या प्रमाणावर तरतूद केली जात आहे. मात्र, याचा परिणाम इतर कल्याणकारी योजनांवर होत असताना आता दिसून येत आहे.
वयाच्या 75 व्या वर्षीही फिट असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुदृढतेचं रहस्य नेमकं काय?

Fitness route of PM Narendra Modi : वयाच्या 75 व्या वर्षी पंतप्रधान आपलं आरोग्य कसं जपतात? याविषयी त्यांनी लेक्स फ्रीडमन यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. तर मग जाणून घेऊयात पंतप्रधानांचा डाएट प्लान काय आणि कसा असतो?
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे 18 जणांचा मृत्यू

Amoebic Meningoencephalitis : केरळमध्ये अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस या आजारामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामध्ये ‘नेग्लरिया फौलेरी’ नावाच्या सूक्ष्म जीव थेट रुग्णांच्या मेंदूवर हल्ला करतात. त्यामुळे त्याला ‘मेंदू खाणारा अमीबा’ असं म्हटलं जातं.
भारतात यापुढे फिजिओथेरपीस्टनां ‘डॉक्टर’ ही उपाधी लावता येणार नाही

Physiotherapist : भारतातील फिजिओथेरेपिस्ट आपल्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावू शकत नाहीत, असा निर्णय आरोग्य सेवा महासंचालनालयाने घेतला आहे.
कर्नाटकमध्ये 7.2 लाख बालकं उच्च रक्तदाबाचे शिकार

High blood Pressure to Kids : कर्नाटकातील 6 आठवड्याचा बालकापासून ते 18 वर्योवर्षांच्या मुलांपर्यंत जवळपास 7.2 लाख बालकं ही उच्च रक्तदाब आजाराला सामोरे जात असल्याचं उघड झालं आहे.
तुम्ही खात असलेले ‘हे’ पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी विषारी ठरू शकतात!

FSSAI : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात काही लोकप्रिय आणि मोठे ब्रँड्सच्या रेस्टॉरंट्सवर अचानक छापे टाकले. FSSAI ने केलेल्या या तपासणीत त्यांनी काही पदार्थ तपासण्यासाठी घेतले. या तपासणीतून लोकप्रिय असणाऱ्या अनेक ब्रँड्सच्या पदार्थामध्ये कृत्रिम रंगांचा, घटकांचा अतिप्रमाणात वापर केल्याचे आढळून आले आहे.
युपीआय नियमांमध्ये आजपासून होणार 10 नवीन बदल

UPI Payments New Rules : फोन पे, जी पे, पेटीएम वरुन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून युपीआय व्यवहारामध्ये मोठे बदल होणार आहेत. 15 सप्टेंबरपासून या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. मात्र, हे नियम सामान्य व्यवहारांना लागू नसून ते व्यापारी, व्यावसायिक, संस्थां, दागिणे खरेदी, परकीय चलनातील व्यवहारांना लागू आहेत.