रशियन विद्यार्थ्यांचा हिंदीत रस, रशियन विद्यापिठांमध्ये हिंदी अभ्यासक्रम सुरू करणार!

Hindi Language in Russia : रशियन विद्यार्थांना भारतीय संदर्भ समजण्याकरता पाश्चिमात्य देशांच्या प्रभावाचा अडसर दूर करण्याचा निर्णय रशियन विद्यापिठांनी घेतला आहे. त्यामुळंच हिंदी शिकवणाऱ्या संस्थांना रशियन सरकार प्रोत्साहन देत आहे.
डिजिटल जन्मपत्र : जन्मदाखल्यासाठी डिजिटल सुविधा उपलब्ध

Digital Birth Certificate : डिजिटल इंडिया या मोहिमेचाच एक भाग म्हणून भारत सरकारने सप्टेंबर 2025 पासून डिजिटल जन्म दाखल्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे नागरिक आता घरबसल्या आपला जन्माचा दाखला घरबसल्या अगदी 5 मिनिटात मिळवू शकतात. यासाठी सरकारी कार्यालयामध्ये मोठ्या रांगांमध्ये थांबण्याची गरज आता संपुष्ठात येणार आहे. जाणून घेऊयात कशाप्रकारे या दाखल्यासाठी अर्ज दाखल करायचा आहे.
केरळ सरकारचे ‘वयोमधुरम’: वृद्धांची वाढती संख्या ‘समस्या’ नाही, तर ‘सन्मानाचं जगणं’!

Kerala Government’s Vayomadhuram : भारताचा जन्मदर घटत आहे. एका आकडेवारीनुसार, भारताचा ‘फर्टिलिटी रेट’ 2.1 पेक्षाही खाली आला आहे. याचा अर्थ, प्रत्येक स्त्रीला आता सरासरी दोनपेक्षा कमी मुलं होत आहेत. सद्य परिस्थितीत हे चांगलं आहे, पण याचा मोठा नकारात्मक परिणाम भविष्यात दिसणार आहे. आपल्या देशात म्हाताऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे.
प्राचीन पांडूलिपी ग्रंथांच्या जतनासाठी ‘ज्ञान भारतम्’ पोर्टलचा उदय

Gyan Bharatam portal : भारतातल्या पांडूलिपी साहित्याचं संवर्धन, जतन आणि प्रसार करण्यासाठी भारत सरकारने ‘ज्ञान भारतम्’ या डिजिटल पोर्टलची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजी या पोर्टलचं लोकार्पण करण्यात आलं. या पोर्टलच्या माध्यमातून भारतातले प्राचीन पांडूलिपी साहित्य डिजिटल स्वरुपात जतन केलं जाणार आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी स्पेशल वेबसाईट्स

Potholes in roads : सशक्त भारत घडविण्यासाठी देशात रोज हजारो स्टार्टअप उदयाला येतात. यापैकीच एक स्टार्टअप आहे तो म्हणजे खड्ड्याची समस्या सोडविणारा इंडिया पोटहोल्स स्टार्टअप. इंडिया पोटहोल्स ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या भागातील खड्डेमय रस्त्याची तक्रार संपूर्ण तपशीलासह करु शकता.
कर्णबधिर समुदायाचा भारतीय सांकेतिक भाषेलाच प्राधान्य !

Indian sign language : जर अमेरिकन सांकेतिक भाषेची सक्ती केली तर त्यामुळे भारतीय सांकेतिक भाषा नष्ट होईल. देशात अमेरिकन सांकेतिक भाषा सक्तीची केली तर दशकांपासून चालत आलेले प्रयत्न कमकुवत होतील आणि भारतीय सांकेतिक भाषेचं अवमूल्यन होईल. ज्याप्रमाणे अन्य भारतीय भाषा सांस्कृतिक अभिमानाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे भारतीय सांकेतिक भाषा ही कर्णबधिर भारतीयांच्या भाषिक प्रतिष्ठेचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे ती डावलून अमेरिकन भाषेला महत्त्व देणं हे गैर आहे.
सरकारी वेबसाइट्स आता तुमच्या भाषेत; ‘भाषिणी’मुळे सरकारी कामांमध्ये ‘नो इंग्लिश’ची अडचण संपली!

Bhashini : ‘भाषिणी’ हे भारत सरकारने तयार केलेलं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित भाषांतर प्लॅटफॉर्म आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की, इंटरनेटवरील माहिती भारतातील सर्व 22 अधिकृत भाषांमध्ये उपलब्ध करून देणं.
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना : ताडपत्री अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा?

tarpaulin : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘ताडपत्री अनुदान योजना’ सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करता येणार आहे.
पंजाबमधील पूर परिस्थितीला कोण कारणीभूत?

Punjab flood : धान्याचं कोठार म्हणून विशेष ओळख असलेलं पंजाब राज्य आज संपूर्णत: पूराने वेढलेलं आहे. गेल्या दशकभरातला हा सर्वात मोठा पूर आहे. या पुरामुळे जवळपास चार लाख लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला आहे. 48 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे दोन हजार गावं प्रभावित झाली आहेत आणि अंदाजे 13 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. ही सारी हानी पूर ओसरेपर्यंत आणि परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
एकाहून अधिक क्रेडिट कार्ड असणं क्रेडिट स्कोअरसाठी फायद्याचं आहे की तोट्याचं?

Finance : गेल्या काही वर्षांत, प्रत्येक बँकेने ही ब्रँड-स्पेसिफिक (को-ब्रँडेड कार्ड), बिझनेस ग्रुप-स्पेसिफिक, कॅटेगरी-स्पेसिफिक क्रेडिट कार्ड तयार केले आहेत. या अशा वेगवेगळ्या क्रेडिट कार्डचा उपयोग हा त्या त्या व्यवहारासाठी करता येतो. त्यातून काही विशेष फायदेही मिळतात. पण त्यातून अन्य गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक गरजेसाठी अनेक क्रेडिट कार्ड असणं चांगलं आहे. पण या वेगवेगळ्या क्रेडिट कार्डमुळे आपला क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो हे समजून घेऊया.
गंगोत्री हिमनदीतील बर्फ झपाट्याने वितळत आहे का?

Gangotri Glacier : हिमनदींनी भरलेल्या जलविज्ञान प्रणालींच्या गतिमानतेत बदल झाला आहे. हिमनद्यांच्या रचनेमध्ये बदल घडत आहेत. त्यातून होणाऱ्या पाण्याचा प्रवाहही बदलत आहे. हवामानातील बदलांमुळे वरचेवर ढगफुटी सारख्या घटना घडूही शकतात. हे नाकारता येत नाही. तरी अशा संशोधनात्मक अभ्यासातून स्पष्ट झालेल्या निष्कर्षानुसार हिमनदीने भरलेल्या नदी खोऱ्यांमध्ये जलसंपत्ती व्यवस्थापन धोरणे वाढविण्यासाठी सतत क्षेत्रीय देखरेख आणि प्रारुपांची आखणी करुन उपाययोजना राबवणे ही तातडीची गरज आहे.
डंगरी: देशी फॅशन जी झाली ‘परदेशी’

Dungri Style : ‘कूल’ आणि ‘वेस्टर्न’ वाटणारी डंगरी ही फॅशन मूळची आपल्या भारताची आहे. होय, ‘डंगरी’चा जन्म आपल्याच देशात झाला आहे आणि तिचं आधीच खरं नाव होतं ‘डोंगरी’. एका साध्या कापडाचा ग्लोबल फॅशनपर्यंतचा हा प्रवास आहे.