हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये निसर्गाचा आक्रोश

floods in Himachal : हिमाचलमधील रावी नदीला पूर आला, तेव्हा नदीच्या पाण्यात लाकडांचे मोठे मोठे ओंडके वाहत होते. हे ओंडके इतके होते की जणू काही नदी स्वतःच आक्रोश करत सांगत होती की, ‘बघा, माझ्या जंगलाचा कसा नाश केलाय!’ हे ओंडके म्हणजे हिमाचलमधील बेकायदेशीर जंगलतोडीचा पुरावाच होते.

भारतीय पासपोर्टची वाढती ताकद: ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025’ मध्ये 76 वा क्रमांक

Henley passport index : ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स’ या संस्थेने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारताने चांगलीच प्रगती केली आहे. आता आपण 76 व्या क्रमांकावर आहोत.

माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षावर उपाय: सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सुरू केली NALSA योजना

NALSA scheme : माणूस आणि प्राणी यांच्यातल्या रोज वाढत्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने एक खास योजना सुरू केली आहे.नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी (NALSA) ने माणूस आणि प्राणी यांच्यातल्या संघर्षावर उपाय शोधण्यासाठी दोन नव्या योजना सुरू केल्या.

पश्चिम रेल्वेची ‘ UTS QR कोड’ तिकीट सेवा बंद होणार?

QR code paperless ticket : रेल्वेकडून 2016 मध्ये यूटीएस ॲप सुरू करण्यात आले. याचबरोबर, प्रवाशांची सोय व्हावी आणि तिकीट काढण्यासाठी होणारी गर्दी कमी व्हावी यासाठी QR कोडची सुविधा सुरू केली होती. हे QR कोड स्कॅन करून मोबाईलवर तिकीट काढता येत होतं. यामुळे तिकीट खिडकीवर रांगेत उभं राहण्याचीही गरज नव्हती. पण काही हुशार प्रवाशांनी याचा गैरवापर सुरू केला.

इंटरमिडीएट फास्टिंगमुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे का?

intermittent fasting : उपवास हा एक सामान्य उपाय म्हणून पाहू नये. सर्वोत्तम दृष्टिकोन म्हणजे तुमचे आरोग्य, जीवनशैली आणि जोखीम लक्षात घेऊन तयार केलेला उपाय. त्यामुळे इंटरमिडीएट डाएटचा नेमका फायदा काय याविषयी जोपर्यंत अधिक पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत, घड्याळाकडे लक्ष न देता, तुमच्या ताटात संतुलित आहाराला पुरक असे अन्नपदार्थ घेऊन खाणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

Leather | शहाळ्याच्या पाण्यापासून चामडे!

World coconut day : नारळ पाण्यापासून चामडं तयार करण्याचं तंत्रज्ञानही विकसित झालंय. कल्पवृक्षाच्या आधुनिक वापराचं दारंही खुलं झालंय. हे चामडं तयार करण्याची प्रक्रिया ऑरगॅनिक असल्यानं  पूर्णपणंं इकोफ्रेण्डली आहे. नारळ प्रक्रिया उद्योगांमधून निघणाऱ्या टाकाऊ गोष्टींवर वाढणाऱ्या सेल्युलोझ जीवाणूपासून हे चामडं कमावण्यात येतं.

भारतीय नौदलाची ताकद वाढणार : 1 लाख कोटी रुपयांच्या पाणबुडी खरेदी करणार

submarine deals : हिंदी महासागरात चीनची जहाजे आणि पाणबुड्या खूप जास्त प्रमाणात दिसू लागल्या आहेत. याचा आपल्या देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, भारत सरकार 2026 च्या मध्यापर्यंत दोन मोठ्या पाणबुडी खरेदी करणार आहे.

1 सप्टेंबरपासून 8 नियमांमध्ये होणार बदल

1 September Rules Changes : 1 सप्टेंबरपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये आयटीआर फाइलिंगच्या तारखेपासून आधारकार्डशी संबंधित बाबींचा समावेश आहे. 

सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांना आरक्षणाची गरज

Women in Supreme court : सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायाधीश आहेत. या संपूर्ण न्यायाधीश बेंचमध्ये  न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. वारंवार समानतेचा पुरस्कार करणाऱ्या न्यायव्यवस्थेलाच समानतेचा विसर पडलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक नोकरीतील नियुक्त्यांप्रमाणेच न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये आरक्षणे आणल्याने प्रक्रियेचे लोकशाहीकरण होऊ शकते. न्यायालयीन स्वातंत्र्याला कमकुवत करण्याऐवजी, अशा चौकटीमुळे कलम 14, 15 आणि 16 मध्ये अंतर्भूत असलेल्या मूलभूत समानता आणि सामाजिक न्यायासाठी संवैधानिक वचनबद्धतेची प्रभावी अंमलबजावणी होईल. 

जेन झी पिढी बचतीपेक्षा अनुभव गाठिशी बांधण्याला महत्त्व देते !

Gen Z Finance : जेन झी ही पिढी वेगळ्या पद्धतीने खर्च करते. त्यामुळे आजच्या व्यवसायिकांना उत्पादनांच्या पलीकडे विचार करण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये वस्तू ऐवजी भावनिक आव्हान करत अनुभव विकण्याची गरज आहे. कारण जेन झी पिढीचा पैशात नाहीतर अनुभवात गुंतवणूक करण्याकडे कल आहे.

नोकरीतील नव्या संधीनुसार शिक्षण घेणं काळाची गरज!

India : भारतात युवा वर्गाची संख्या प्रचंड मोठी आहे. पण हीच तरुणाई नोकरीच्या शोधात हवालदिल होत आहे. शिक्षण असलं तरीही नोकरी का मिळत नाही, हे प्रश्न आज अनेक तरुणांच्या मनात आहेत

ग्राहकांना आता दुकानदारांना मोबाईल क्रमांक देण्याची गरज नाही, काय नवीन डेटा गोपनीयता कायदा?

Data Privacy Act : भारतातील नवीन डेटा सिक्युरिटी अॅक्टनुसार कंपन्यांना ग्राहकांचे फोन नंबरसारखे वैयक्तिक तपशील गोळा करण्यापूर्वी त्यांची संमती घेणे बंधनकारक असल्याचा नवीन कायदा केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ