1.4 अब्ज भारतीयांसाठी आरोग्यसुविधा निर्माण करणे हे भारतापुढचं आव्हान

India Healthcare sector : भारतातील लोकसंख्येचा आढावा घेऊन, आरोग्य सेवेतील वेगवेगळे घटक जोडून, सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या व्यवहारिक आणि जागतिक स्तरावरही प्रेरणादायी ठरेल असं आरोग्य सेवेचं एक प्रारूप तयार करणं गरजेचं आहे. यासाठी सुव्यवस्थित गुंतवणूक आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीसह, आपण अशी प्रणाली तयार करू शकतो जी प्रासंगिक किंवा अपवादात्मक नसून सार्वत्रिक, लवचिक आणि शाश्वत असेल. आरोग्य सेवा ही एक विशेषाधिकारापासून प्रत्येक भारतीयाचा हक्क होईल या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे.
अमेरिकेच्या नव्या टेरिफचा भारतीय उद्योगांवर मोठा परिणाम

America tariff : काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताच्या अनेक वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता 27 ऑगस्ट 2025 पासून हे नवे नियम प्रत्यक्ष लागू झाले आहेत. नव्या धोरणानुसार काही भारतीय वस्तूंवर 50% पर्यंत जास्त टेरिफ लागणार आहे. आणि याचा थेट फटका भारतातील लाखो कामगारांना बसणार आहे. कारण अमेरिका ही भारतासाठी एक खूप मोठी बाजारपेठ आहे.
दुचाकी व्यवस्थित चालवली नाहीतर तुमचं लायसन्स होणार रद्द;1 जानेवारी 2026 पासून नवे नियम लागू!

Government new rules for two-wheelers : तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं आता बंधनकारक आहे. ही सिस्टीम 125 सीसी पेक्षा कमी किंवा जास्त इंजिन असलेल्या सर्व दुचाकी वाहनांसाठी आवश्यक आहे.
भारताच्या विकासात महिलांची साथ: महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ!

Women’s employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे. ही फक्त आकडेवारी नाही, तर हे आपल्या महिलांनी मिळवलेल्या यशाचं आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे.
आता CIBIL स्कोअरची चिंता सोडा; फर्स्ट-टाइम कर्जदारांनाही मिळणार सहज कर्ज!

CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर नाही म्हणून कोणत्याही फर्स्ट-टाइम कर्जदाराचा अर्ज नाकारू शकत नाहीत.
भारतीय रेल्वेकडून प्रवासाचे नवे नियम: आता प्रवासाला निघण्याआधी बॅगचं वजन तपासा!

Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण, यापुढे रेल्वे स्टेशनवरही विमानतळासारखी सामानाची तपासणी केली जाणार आहे.
एसबीआयच्या क्रेडीट कार्ड सुविधेत 1 सप्टेंबरपासून होणार बदल

Finance : एसबीआयच्या क्रेडिट कार्ड सुविधामध्ये 1 सप्टेंबरपासून बदल होणार आहेत. डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी आणि सरकारशी संबंधित व्यवहार केल्यावर तुमच्या खात्यात जे रिवॉर्ड पॉइंट्स जमा व्हायचे ते आता काही विशिष्ट कार्डांसाठी बंद केले जाणार आहेत.
कर्नाटकातील काँग्रेस आमदारास सट्टेबाजी प्रकरणात ईडीकडून अटक

कर्नाटकातील चित्रदुर्गमधील काँग्रेस आमदाराला ईडीने सिक्किममधून शुक्रवारी अटक केली. ईडीने या आमदाराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर धाड टाकून 12 कोटी रुपये रोख जप्त केले. यात 1 कोटी रुपये परकीय चलन, 100 अमेरिकन डॉलर्स, 10 व 20 ब्रिटिश पौंड, 500 दिरहम, 100 व 50 युरोच्या चलनी नोटांचे बंडल यांचा समावेश आहे.
अखेर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा ठाव लागला !

Former Vice President Jagdeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा देऊन पदमुक्त झाल्यापासून दररोज योगाभ्यास करतात, टेनिस खेळतात अशी माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी पीटीआयला दिली आहे.
‘भटक्या कुत्र्यांना निर्जंतुकीकरण करून सोडलं जाईल’ सर्वाेच्च न्यायालयाचा नवीन आदेश

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाने या आदेशात बदल केला आहे. ‘भटक्या कुत्र्यांना जंतनाशक आणि लसीकरण करुन आश्रयस्थानातून सोडून द्यावं’, असा नवीन आदेश 22 ऑगस्ट 2025 रोजी दिलेला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्राणीमित्रांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा मिळून 27 विधेयक संमत, संसद अनिश्चित काळासाठी तहकूब

Parliament Session : या पावसाळी अधिवेशनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, ऑपरेशन सिंदूर, बिहारमधील मतदार यादी पडताळणी, 2024 सार्वजनिक निवडणूकीसाठी तयार केल्या गेलेल्या मतदार याद्या अशा सगळ्या विषयावर खंडाजंगी झाली. तरी या गोधळांच्या वातावरणात दोन्ही सभागृहामध्ये 27 विधेयकांना मंजूरी देण्यात आली.
प्लेटमध्ये अन्न बाकी ठेवलं तर पुण्यातलं एक हॉटेल आकारतं चक्क दंड !

Fine On Wastage Food : पुण्यातल्या एका दक्षिण भारतीय हॉटेल मालकांनी जेवण फेकून दिल्यास 20 रुपये दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. ही कल्पना जरी भारी वाटत असली तरी सोशल मीडियावर यावरून वाद निर्माण झाले आहेत.