बिबट्याच्या भितीने लहान मुलं पिंजऱ्यात बंद!

Leopard Attacks : बिबट्याच्या दहशतीमुळे भरतभाई बरैया दररोज संध्याकाळी काळोख होताच आपल्या पाच मुलींना 8 बाय 6 लोखंडी पिंजऱ्यात बंद करतात.
कर्नाटकात देवदासी सर्वेक्षणामध्ये वयोमर्यादेची अट हटवण्याची मागणी

Karnataka Devdasi Survey : देवदासी (समर्पण प्रतिबंधक) कायदा, 1982 अंतर्गत कर्नाटक सरकारकडून देवदासी निर्मूलन करण्यासाठी विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. या तिसऱ्या देवदासी सर्वेक्षणामध्ये कोणत्याही वयोमर्यादेची अट न घालता सर्वेक्षण केलं जावं, अशी मागणी देवदासी समुदायाशी संबंधित असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
2025: भारतीय महिला खेळाडूंसाठी ‘सोन्याचं वर्ष’!

golden year for Indian women athletes : या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत भारतीय महिला खेळाडूंनी जी जबरदस्त कामगिरी केली आहे. ती पाहून फक्त क्रीडाप्रेमीच नाहीत, तर देशातील अनेक मुलींना खेळाडू बनण्याची प्रेरणा मिळत आहे.
डिजिटल इंडियाचा 10 वर्षांचा प्रवास रीलमध्ये मांडा,बक्षीसं मिळवा!

A Decade of Digital India Reel Contest : डिजिटल इंडिया मिशनने गेल्या 10 वर्षात ऑनलाइन शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा, आर्थिक व्यवहार आणि ई-गव्हर्नन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवले आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी 30 दिवसांची सुट्टी मिळणार!

Good news for central govt staff: आता केंद्र सरकारचे कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी वर्षभरात 30 दिवसांची सुट्टी घेऊ शकणार आहेत.
अहमदाबाद विमान अपघातानंतर एयर इंडिया पायलट ‘मास सिक लीव्ह’वर!

नागरी हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत सांगितलं की, “एअरलाईनच्या सर्व फ्लाईट कर्मचाऱ्यांमध्ये आजारपणाच्या वैद्यकीय रजेचं प्रमाण वाढलं आहे.” अहमदाबाद एआय-171 अपघातानंतर, दिनांक 16 जून या एकाच दिवशी एअर इंडियाच्या 112 पायलटनी आजारी असल्याचं सांगत रजा घेतली.
AI-तंत्रज्ञानावर चालणारं MRI स्कॅनर!

AI powered MRI: दिल्लीमध्ये भारताचं पहिलं ‘AI-शक्तीवर चालणारं MRI स्कॅनर’ सुरू झालं आहे. याला ‘एक्सेल 3T’ असं म्हणतात.
आरोग्य विम्याच्या दाव्यासाठी आता 24 तास हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज नाही; अवघ्या दोन तासाच्या उपचारासाठीही लागू होणार आरोग्य विमा!

Health Insurance : सरकारने आणि काही आरोग्यविमा कंपन्यांनी आरोग्य विम्यावरील दाव्यासाठी 24 तासाची अट रद्द केली आहे. त्यामुळे तुम्ही काही ठराविक उपचारांसाठी दोन तास जरी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असाल तरी, तुम्हाला आरोग्य विम्यासाठी दावा करता येणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवशेनाला सुरूवात, जवळपास 17 विधेयकावर होणार चर्चा

Parliament’s Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सीमाभागातील सुरक्षा यासारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वूभूमीवर मणिपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या मुदतवाढीला मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या ठरावावरही चर्चा होणार आहे.
बँक आणि खातेदारांमध्ये दुवा साधणाऱ्या सीआयएफ क्रमांकाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?

Finance : सीआयएफ क्रमांक म्हणजे ग्राहक माहिती फाईल. इंग्रजीमध्ये त्याला कस्टमर इम्फॉर्मेंशन फाईल असं म्हटलं जातं. बँकेकडून प्रत्येक खातेदारांसाठी हा एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो.
बुद्धीबळातील सर्वाधिक वजीर ‘तामिळनाडूत’!

Chennai Chess Hub : ‘नॉर्वे चेस 2025’ च्या स्पर्धेत डी. गुकेश यांच्याकडून पराभव झाल्यानंतर आता जगज्जेता मॅग्नस कार्लसनला आर.प्रज्ञानंद याच्याकडूनही पराभव स्विकारावा लागला आहे. लास वेगास इथे झालेल्या फ्री स्टाईल बुद्धीबळ स्पर्धेतल्या चौथ्या फेरीमध्ये ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. या दोन घटनेवरुन जागतिक पातळीवर भारतच बुद्धीबळ खेळाचा बादशहा असल्याची प्रचिती ठळकपणे दिसून येते.
बेंगळुरूमध्ये छोट्या विक्रेत्यांचे ‘ओन्ली कॅश, नो युपीआय’!

UPI Payment Banned : आयटी हब म्हणून ओळख असलेल्या बेंगळुरूमधले छोटे दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेते मात्र, ‘नो युपीआय, कॅश ओन्ली’ असे फलक लावून आपला माल विकत आहेत. अचानक डिजिटल पेमेंटच्या या गतीला ब्रेक का लागतोय हे समजून घेऊया.