जेन झी पिढी : आर्थिक व्यवहारामध्ये अधिक सतर्क असलेली पिढी

Finance : नव्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सतर्क करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम किंवा महाविद्यालयीन शिक्षणापासूनच आर्थिक साक्षरता, क्रेडिट आणि वैयक्तिक आर्थिक बाबींना शिक्षणाच्या अभ्यासक्रमात स्थान देणं गरजेचं आहे.

सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल: मैत्री, स्वप्न आणि फ्लिपकार्टची सुरूवात!

Friendship day: सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी भारतात ऑनलाईन शॉपिंगची सुरूवात केली. त्यांची ही गोष्ट फक्त एका कंपनीच्या यशाबद्दल नाही, तर दोन मित्रांनी पाहिलेल्या मोठ्या स्वप्नाची, त्यांच्या मेहनतीची आणि त्यांच्या घट्ट मैत्रीची आहे.

भारत-रशिया संबंधावर तिसऱ्या देशाचा प्रभाव पडू शकत नाही!

India-Russia Relations : भारत कोणत्याही देशासोबत त्या-त्या देशाच्या गुणवत्तेवर आधारित संबंध प्रस्थापित करत असतो. त्यामुळे भारताचे ज्या-ज्या देशासोबत संबंध आहेत त्याला तिसऱ्या देशांच्या दृष्टिकोनातून पाहू नये. भारत आणि रशिया या दोन्ही देशांचे संबंध वेळोवेळी कठीण प्रसंगातही स्थिर आणि दृढ राहिले आहेत. 

भारतात आढळला नवीन ‘क्रीब’ रक्तगट !

CRIB Bloodgroup : कर्नाटकमधल्या कोलार जिल्ह्यातील एका 38 वर्षीय महिलेच्या रक्तामध्ये एक नवीन एंटिजन आढळलं आहे. तिच्या कुटुंबातील अन्य कोणत्याच सदस्यामध्ये हे एंटिजन आढळलं नाही. यामुळे एक नवीन रक्तगटाचा शोध लागलेला आहे.

युपीआय पेमेंटच्या नियमांत बदल, जाणून घ्या नविन नियम काय आहेत?

UPI New Rules : युपीआय व्यवहारांमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवीन नियम लागू करणार आहे. यामध्ये बँक बॅलन्स तपासण्यावर मर्यादा, ऑटो पेमेंटसाठी विशिष्ट वेळ राखून ठेवणे अशा बदलांचा समावेश आहे.

चीनकडून भारतात सोया तेलाची विक्रमी आयात!

SoyaOil Import Increase From China : भारताने चीनकडून 150,000 मेट्रिक टन सोया तेलाची खरेदी केली आहे. भारत प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेकडून सोया तेलाची खरेदी करतो. पण चीनकडून सवलतीच्या दरात हे तेल मिळत असल्यामुळे भारतातील अनेक डीलर्सनी मोठ्या प्रमाणावर हे तेल खरेदी केलं आहे. चीनने मात्र, भारताला सवलतीच्या दरात हे तेल का दिलं ते समजून घेऊया. 

कर्करोगापासून काळजी घेताना तोंडाच्या आरोग्याची जास्त काळजी घ्या!

Oral Health : हिरड्यांचा त्रास, दात दुखणे, कीड लागणे अशा काही मौखिक समस्यांमुळे पचनसंस्था किंवा स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोग होण्याची शक्यता आहे. 

भारतातील सर्वाधिक झोपडपट्ट्या पूरग्रस्त भागात

Flood-affected areas : भारतामध्ये 600 दशलक्ष लोकं ही किनारी भागात किंवा पूर येणाऱ्या भागात राहतात. प्रचंड लोकसंख्या, राहण्यासाठी अपूरी जागा, आर्थिक दुर्बलता अशी अनेक कारणं यासाठी कारणीभूत आहेत.

नासा-इस्रोचा संयुक्त निरिक्षण उपग्रह ‘निसार’चे आज प्रक्षेपण

‘निसार’ हा अमेरिका आणि भारत यांनी संयुक्तपणे विकसित केलेला पहिला मोठा ‘पृथ्वी निरीक्षण उपग्रह’ आहे. भूकंप, भूस्खलन आणि ज्वालामुखीचा उद्रेक होण्याआधीच्या जमिनीच्या पृष्ठभागाच्या मंद गतीने होणारी भिन्नता शोधण्यात संशोधकांना निसार उपग्रह मदत करेल. या हालचालींची माहिती मिळाल्यामुळं तळीये, माळीण, जोशीमठ सारख्या जमीन खचण्याच्या नैसर्गिक धोक्यांची पूर्वसूचना मिळेल.

‘अर्थव्यवस्था बंद करावी का?’: भारताच्या रशियन तेल खरेदीचं उच्चायुक्तांकडून जोरदार समर्थन

Oil trade : ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी नुकतंच रशियाकडून भारताच्या तेल खरेदीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं.

चिनी डिव्हाईसमुळे पहलगाम हल्ल्यातल्या मास्टरमाइंटला शोधण्यात यश

Operation Mahadev : सोमवारी दिनांक 28 जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. जम्मू आणि काश्मीरमधील लिडवास या भागात लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ही कारवाई केली.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ