भारताचा जन्मदर घटत आहे!

India’s fertility rate dropped : पुढील पिढीच्या वाढीसाठी किमान 2.1 टक्के प्रजनन दर असावा लागतो. यापूर्वी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, भारताच्या प्रजनन दरात 2.2 टक्क्यांवरुन 2.1 टक्क्यावर घट झाली होती. मात्र, नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी 2025 चा जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाला’ नुसार भारताचा प्रजनन दर हा 1.9 टक्क्यावर आला आहे. हा ‘तरुण’ भारतासाठी धोक्याचा इशारा आहे.
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 रुपयांचं खास नाणं!

Dr. M. S. Swaminathan : भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधत, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ 100 रुपयांचं एक खास नाणं काढायचं ठरवलं आहे.
डॉ. आकांक्षांच्या दूषित पाण्यावरील प्रक्रियेला यश, ‘शेवाळ’ ठरले उत्पन्नाचे नवे साधन!

microalgae : बऱ्याचदा तलावांमध्ये किंवा नद्यांमध्ये हिरव्या रंगाचं शेवाळं (Algae) वाढलेलं दिसतं. अनेकदा तर ते इतकं वाढतं की, पाण्यातले मासे मरतात आणि ते पाणी वापरायलाही योग्य राहत नाही. आपल्याला वाटतं की हे शेवाळं प्रदूषणाचं एक कारण आहे. पण डॉ. आकांक्षा यांनी याच ‘शेवाळ्या’चा उपयोग करून रासायनिक सांडपाणी पूर्णपणे स्वच्छ करून दाखवलं आहे.
‘एआय चष्मे’ मोबाईलची जागा घेतील का?

AI Glasses : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हाच चष्मा आता ‘स्मार्ट चष्मा’ झाला आहे. आता बाजारात ‘एआय चष्मे’ उपलब्ध आहेत. त्यामुळे मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग म्हणतात, की तुमचा पर्सनल कम्प्युटर आता तुमच्या हातासमोर नाहीतर डोळ्यासमोर आहे.
वाळवंट आणि कुरणांची परिसंस्था लक्षात घेऊन विकासाची गरज

Desert land : वाळवंट हा खूप जुना आणि विविध प्रकारची जीवसृष्टी असणारा सहनशील असणारा भौगोलिक भाग आहे. पृथ्वीच्या जमिनीचा जवळपास एक तृतीयांश भाग वाळवंटाने व्यापलेला आहे. आणि इथे असे खास वनस्पती, प्राणी आणि मानवसमूह राहतात.
टाकाऊ प्लास्टिकपासून घडवले रंगबेरंगी पेव्हर ब्लॉक्स!

Plastic Paver Blocks and Tiles : एसीसी सिमेंट, रोजगार आणि पर्यटनाकरता प्रसिद्ध असणारे कर्नाटकातील वाडी हे आता रिसायकल प्लास्टिकच्या पेव्हर ब्लॉक व टाईल्स वापरासाठी ओळखले जाणार आहे.
भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा अंतराळातील ऐतिहासिक प्रवास!

Shubhanshu Shukla : भारताचे अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) ला भेट देऊन इतिहास रचला आहे आणि आता ते सुखरूप पृथ्वीवर परत आले आहेत.
बिहारमध्ये 35 लाखाहून अधिक मतदारांची नावं मतदार यादीतून वगळणार; निवडणूक आयोगाची माहिती

Bihar Voter List Verification : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पडताळणी केली जात आहे. या पडताळणीनुसार निवडणूक आयोगाने 35 लाखाहून अधिक मतदारांची नावं मतदार यादीतून काढून टाकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत पैशाचा व्यवहार करताना काय खबरदारी घ्यावी?

Finance : जर तुम्हाला माहीत असेल समोरचा व्यक्ती आपल्याला पैसे परत देणार नसेल, त्याला पैसे मागण्याची सवय आहे, किंवा त्याला खरंतर पैशाची गरज चुकीच्या गोष्टीसाठी असेल तर स्पष्टपणे पैसे द्यायला नकार द्या. यामुळे तुमची मैत्री किंवा नात्यात दुरावा येईल पण शेवटी तुमचं पैशाचं नुकसान टळेल आणि चुकीच्या गोष्टीसाठी पैसे न दिल्याचं समाधानही मिळेल.
निवृत्तीच्या तयारीसाठी सेव्हिंग्ज आणि गुंतवणूक अत्यावश्यक

Retirement Preparation : निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी योग्य आणि पुरेशी बचत करुन ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आज आपण काम करण्यासाठी सक्षम आहोत, चांगली नोकरी हातात आहे, म्हणून निवृत्तीचं वय 60 चं असेल असं बरेच जण गृहीत धरतात. त्यामुळे एवढ्या लवकर निवृत्तीच्या तयारीचा विषयच कशाला? असा प्रश्नही तुमच्या मनात डोकावला असेल. पण बदलती परिस्थिती पाहता निवृत्तीचं वय हे 60 वरुन 45 वर कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात जरी 45 व्या वर्षी नोकरीतून आपण निवृत्त होत नसलो तरिही, निवृत्तीची तयारी आतापासून कशी केली पाहिजे.
संपूर्णपणे महिलांकडून चालवलं जाणार गोव्यातलं रिसॉर्ट

Women Lead Resort : गोव्यातलं क्लब महिंद्रा अकाशिया पाम्स हे रिसॉर्ट संपूर्णत: महिलांकडून सांभाळलं जातं. अनेकदा रिसॉर्ट, हॉटेलमध्ये रिसेप्शन डेस्कवर, हाऊसकिपिंग आणि किचनमध्येच काही प्रमाणात महिला कर्मचारी असतात. मात्र, महिंद्रा ग्रुपच्या या रिसॉर्टमध्ये रिसॉर्टच्या गेट पासून ते किचन पर्यंत, मॅनेजर ते टेक्निशियन्सपर्यंत सगळ्या पदावर महिला कर्मचारीच काम करत आहेत.
जॅग्वार लढाऊ विमानाचा अपघात; या लढाऊ विमानांची कार्यक्षमता संपुष्टात येत आहे का?

Jaguar fighter jet : बुधवार दिनांक 9 जुलै रोजी राजस्थानमध्ये जॅग्वार या लढाऊ विमानाचा अपघात झाला. या वर्षभरातला हा तिसरा अपघात आहे. या तीन अपघातामुळे या लढाऊ विमानतील तांत्रिक समस्या, देखभाल, कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत.