दूधाच्या पिशव्या पॅकेजिंगला पर्याय मिळेल का?

Milk Packaging : तामीळनाडूमधील आविन दूध सहकारी संघाने दुधाच्या पॅकेजिंगसाठी वेगळ्या पर्यायाचा विचार करावा, असं आवाहन राष्ट्रीय हरित लवादाने केलं आहे. कारण आविन दूध महासंघांच्या अंम्बात्तूर डेअरी यूनिटमध्ये 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेल्या दूध पिशव्यांचा कचरा गोळा झाला आहे. भविष्याच्या दृष्टीने पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा विचार करता दूध पॅकेजिंगच्या अन्य पर्यायाचा विचार करणं अत्यावश्यक आहे.
प्रदुषणा विरोधातलं युद्ध?

Air Pollution : राजधानी दिल्ली ही गेल्या कित्येक वर्षापासून फक्त राजकारणाचीच राजधानी राहिली नसून ती भारताची प्रदुषणाची सुद्धा राजधानी झाली आहे. प्रदुषणाची ही लढाई फक्त दिल्लीच लढतेय असं नाही. जगभरात अनेक प्रमुख शहरांमध्ये प्रदुषणाची समस्या आहे. चीनची राजधानी बिजींगसुद्धा प्रदुषणाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. मात्र, आज बिजींगच्या हवेची गुणवत्ता 26 आहे. त्यामुळे बिजींग हे पूर्णत: प्रदुषणमुक्त झाल्याचं आपण म्हणू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो बायडेन यांना दिलं सर्वात महागडं बक्षिस

India’s gift to biden family : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सन 2023 सालामध्ये सर्वात महागडं बक्षिस हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
2024 मध्ये डिसेंबर महिन्यात GST संकलनात 7.3% ने वाढ

GST : 1 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2024 च्या डिसेंबर महिन्यात भारतातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन 7.3 टक्क्यांनी वाढून 1.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे.
भोपाळ गॅस दुर्घटनेतला कचऱ्याची अखेर साफसफाई

Bhopal Gas Tragedy waste disposal : भोपाळ गॅस दुर्घटनेला तब्बल 40 वर्ष उलटली तरी आजही तिथली जनता या दुर्घटनेचे परिणाम भोगत आहे. या 40 वर्षात एकाही आरोपीवर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, या दुर्घटनेचं भग्न अवशेष 40 वर्ष त्याचठिकाणी ठेवले होते. अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा रासायनिक कचरा त्या कंपनीतून बाहेर काढून नष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
‘भारतरत्न’ पुरस्काराची 71 वर्ष !

Bharatratna Award : भारतातील अतुलनीय व्यक्तिंचा गौरव करणाऱ्या ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात 2 जानेवारी 1954 सालापासून झाली. विविध क्षेत्रामध्ये अत्युच्च कामगिरी करत देशाच्या विकासामध्ये आणि गौरवामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करणारा हा पुरस्कार आहे. दरवर्षी 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाते.
देशातील पहिला काचेचा पूल कन्याकुमारीत

India’s first glass bridge : कन्याकुमारीमध्ये भारतातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आला आहे. या काचेच्या पुलाचा (Glass Bridge) वापर करून लोक आता विवेकानंद स्मारकापासून (Vivekananda Memorial) तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत पोहोचू शकणार आहे.
2025 चा पहिला उल्कावर्षाव ‘क्वाड्रंटिड्स’ भारतातून दिसणार!

2025 Quadrantids : 2025 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला एक खूप सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिसणारा क्वाड्रंटिड्स उल्कावर्षाव यंदा 3 आणि 4 जानेवारी रोजी असेल.
इस्रो PSLV स्पॅडेक्स मोहिमेद्वारे अंतराळात 24 प्रयोग प्रक्षेपित करणार

Spadex mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) एका महत्त्वाच्या मोहिमेत PSLV रॉकेटद्वारे अवकाशात 24 वैज्ञानिक प्रयोग पाठवणार आहे. आणि 30 डिसेंबर 2024, रोजी ISRO ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C60 रॉकेटद्वारे यामधील 2 उपग्रहांचे प्रक्षेपण केलं आहे.
राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पांची नांदी!

National River Linking Project (NRLP) : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त, बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी, देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी केली. जलसंवर्धन, पाणीपुरवठा आणि पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. मात्र, या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय ऱ्हासाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे.
जागतिक पातळीवर रेमिटन्स मिळवण्यात भारत अव्वल !

Remittance flow in India : यावर्षी जगात सगळ्यात जास्त रेमिटन्स हा भारताला मिळाला आहे. 2024 सालामध्ये भारताला 129 अब्ज डॉलर (Billion Dollar) रेमिटन्स मिळाला आहे. 2023 साली मिळालेल्या रेमिटन्स मध्ये तीन टक्क्यांने वाढ झाली आहे.
भारताच्या ऐतिहासिक चर्चमध्ये ख्रिसमसच्या काळात ‘शांतता’!

Forgotten churches of India: भारत आणि जगभरातील चर्चमध्ये ख्रिसमसच्या काळात भव्य सजावट केली जाते, पण भारतातील काही ऐतिहासिक चर्चमध्ये शांततेचं वातावरण असतं. या चर्चची उभारणी ब्रिटिश काळात झाली होती आणि ब्रिटिश भारतातून निघून गेल्यानंतर या चर्चमध्ये येणाऱ्या लोकांची संख्याही कमी झाली.