आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा; अर्थव्यवस्थेत वाढ, रूपयाची स्थिरता, महागाई आटोक्यात आणण्याची जबाबदारी

RBI governor : आयएएस ऑफिसर संजय मल्होत्रा हे बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा पदभार हाती घेणार आहेत. मल्होत्रा हे आरबीआयचे 26वे गव्हर्नर असणार आहेत.
टेलिफोन यूजर्सची बीएसएनएल नेटवर्ककडून जिओ, एअरटेलकडे घरवापसी

BSNL Mobile Network : बीएसएनएल कंपनीकडे ग्राहकांचा वाढता ओघ पाहून सरकारी कंपनीला चांगले दिवस आले असं वाटू लागलं. पण हे चांगले दिवस काही महिन्यांपुरतेच टिकले. कारण बऱ्याच ग्राहकांनी पुन्हा आपल्या जुन्या टेलिफोन सुविधा कंपनीकडे घरवापसी केल्याचं तिमाही अहवालातून समोर येत आहे. तरिही खासगी कंपन्यांच्या वाढत्या दरवाढीमुळए ग्रामीण भागातला ग्राहक मात्र बीएसएनएल कंपनीचीच सुविधा वापरेल अशी शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे.
मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेनने फक्त 25 मिनिटांत!

भारतात लवकरच हायपरलूप ट्रेन सुरु होणार आहे. Indian Railway First Hyperloop Train : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या ट्रेनचा वेग ताशी 1200 किमी पर्यंत असू शकतो.
‘मानवाधिकार’ म्हणजे नेमकं काय?

International Human Right Day : निसर्गाने जन्मत: प्रत्येकाला जगण्यासाठी हक्क बहाल केले आहेत. मात्र वर्चस्ववादाच्या लढाईत अनेकदा दुर्बल घटकांचे हे हक्क हिरावून घेतले जातात. आपल्या नैसर्गिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी जागतिक पातळीवर मानवाधिकार धोरण राबवलं जातं.
भारत आणि चीन दरम्यान होणार ‘विशेष प्रतिनिधी’ बैठक

Special Representatives (SR) : भारत – चीन देशांदरम्यानचे वाद संपुष्टात आणून तोडगा काढण्यासाठी या दोन्ही देशांतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची या महिन्यात बिजींग येथे भेट आयोजित केली आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागार प्रमुखांमध्ये होणाऱ्या या बैठकीला ‘विशेष प्रतिनिधी’ ( Special Representative) बैठक असं संबोधलं जातं.
ISRO ने केलं युरोपियन स्पेस एजन्सीच्या PROBA-3 अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण

Proba-3 Mission : PROBA-3 मोहिमेचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. यासाठी PSLV-C59 रॉकेटचा वापर करण्यात आला आणि या मोहिमेत दोन 550 किलो वजनाचे हे उपग्रह प्रक्षिप्त केले गेले.
स्पॅम कॉलच्या तक्रारीसाठी सरकारचं ‘चक्षू’ पोर्टल

Chakshu Portal : सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि स्पॅम कॉल्स व मेसेजेसद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. सायबर क्रिमिनल्स नवनव्या तंत्रांचा वापर करत लोकांना फसवत आहेत. यासर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या फ्रॉड कॉल्स संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी ‘चक्षू’ पोर्टल लॉन्च केले आहे.
मिशन ट्रायडंट

Operation Trident : 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करत संपूर्ण बंदर उद्धवस्त केलं. या ऑपरेशनला ‘मिशन ट्रायडंट’ असं नाव देण्यात आलं. या विजयी घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 4 डिसेंबरला ‘नौदल दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.
शंभरीचा भारत तरुणांचा की वृद्धांचा ?

Declining Fertility Rate : लोकसंख्येच्या बाबतीत जगाच्या क्रमवारीत अव्वल असणाऱ्या भारतात पुन्हा एकदा अधिकाधिक अपत्यांना जन्म देण्याचं आवाहन केलं जात आहे. याला कारण आहे घटता प्रजनन दर. या कारणामुळे येत्या काही वर्षात देशांमध्ये वृद्धाचं प्रमाण हे सर्वाधिक असण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कुंभमेळ्याचा समावेश

Kumbh Mela 2025 : कुंभमेळा हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पौराणिक परंपरा आहे. दर 12 वर्षांनी चार प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. यापैकी एक आहे प्रयागराज. 2025 मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन होणार आहे.
पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणि मिनरल वॉटर आरोग्यासाठी धोकादायक?

FSSAI : पूर्वी लोक मडक्यातील पाणी प्यायचे, पण आता त्याची जागा प्लास्टिकच्या बाटल्यांनी घेतली आहे. लोकांना असे वाटते की हे पाणी आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पॅकेज वॉटर आणि मिनरल वॉटरही आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
भोपाळचे ‘आफ्टर इफेक्टस्ट्’

Bhopal Gas Tragedy : भोपाळ गॅस दुर्घटना! आजही अंगावर काटा आणणारी घटना. तब्बल 40 वर्षा नंतर आजही भोपाळमध्ये ‘न जन्मलेली मुलं’ या घटनेची शिक्षा भोगत आहेत. पिढ्यानपिढ्या उद्धवस्त करणाऱ्या या दुर्घटनेप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला शिक्षा न झालेलं हे देशातलं एकमेव प्रकरण.