संसदेत प्रियंका गांधी यांना आसनक्रमांक 517

parliament : सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात, प्रियंका गांधींचं स्थान चौथ्या रांगेत निश्चित करण्यात आलं आहे. प्रियंका गांधी या 517 क्रमांकाच्या आसनावर बसतील. काँग्रेस नेते आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधीं हे 498 क्रमांकाच्या आसनावर बसतील.
शेतकरी पुन्हा दिल्लीत!

Farmers Protest and Delhi March: दिल्लीतील शेतकर्यांचे आंदोलन तीव्र होत असून, आज (2 डिसेंबर) शेतकरी दिल्लीच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेत. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकरी संसद परिसर घेरण्याच्या उद्देशाने दिल्लीत येत आहेत. यामुळे दिल्ली-एनसीआर भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
मोदी सरकारने ब्लॉक केले 28,000 हजार URLs.

URLs Block : केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत सोशल मीडियावरील 28,079 वेबसाईट लिंक्स (URLs) ब्लॉक केल्या आहेत. यामध्ये खलिस्तान समर्थक आणि फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्सचा समावेश आहे. ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69(अ) अंतर्गत करण्यात आली आहे.
भारत 5G आणि GenAI चा वापर करण्यात जगात आघाडीवर

India’s 5G adoption : भारत 5G आणि GenAI तंत्रज्ञानाच्या वापरात जगात आघाडीवर असल्याचं एरिक्सनच्या नव्या अभ्यासात दिसून आलं आहे. 2023 मध्ये 5G वापरकर्त्यांचा 48% दर वाढून 2024 मध्ये तो 57% झाला आहे.
नेहरू-गांधी घराण्यातील भाऊ-बहिणीची दुसरी जोडी संसदेत

Priyanka Gandhi In Parliament : 1951ते 1953 पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची बहिण विजयालक्ष्मी पंडित या भावाबहिणीची जोडगोळी संसदेमध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होते. आज 71 वर्षानंतर लोकसभेत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे भाऊ-बहिण एकत्र काम करणार आहेत.
AI4Bharat ने सादर केला ‘भाषानुवाद’: भारतीय भाषांसाठी सर्वात मोठा भाषिक भाषांतर डेटा

AI4Bharat unveils BhasaAnuvaad: AI4Bharat ने भारतीय भाषांसाठी सर्वात मोठा संभाषण भाषांतर डेटासेट सादर केला आहे. या उपक्रमामुळे भारताच्या प्रचंड मोठ्या भाषिक विविधतेला चांगलाच लाभ होणार आहे. या डेटासेटमध्ये 13 प्रमुख भारतीय भाषांच्या 44,400 तासांच्या ऑडिओचा समावेश आहे.
प्लॅस्टिक प्रदूषणाशी लढा देण्यासाठी विकसनशील देशांना मदत करण्यासाठी भारताकडून विशेष निधीचा प्रस्ताव

plastic pollution : भारताने विकसनशील देशांना प्लास्टिक प्रदूषणाशी लढण्यासाठी मदत म्हणून एक विशेष बहुपक्षीय निधी स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये चालू असलेल्या प्लास्टिक प्रदूषणावरील कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आंतरराष्ट्रीय कराराच्या अंतिम चर्चेदरम्यान सादर करण्यात आला.
भारताच्या आदित्य-L1 मिशनद्वारे सौर वादळांविषयी महत्त्वाची माहिती समोर

Aditya L1: आदित्य-L1 च्या माध्यमातून सौर वादळांविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सौर वादळे म्हणजे Coronal Mass Ejection (CME).
भारतीय महासागरात ड्रग्स तस्करीचा वाढता धोका

biggest drug haul : अंदमान आणि निकोबार बेटांजवळ म्यानमारच्या एका बोटीमधून 6000 किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्स जप्त करण्यात आले. या ड्रग्सची किंमत अंदाजे 36,000 कोटी रुपये आहे.
हवा प्रदुषणामुळे दिल्लीतील मुलांमध्ये श्वसनाच्या विकारात वाढ

Air Pollution in Delhi : दूषित हवेमुळे दिल्ली व आजुबाजूच्या राज्यामध्ये अनेक आजारांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच श्वास घेताना खूप त्रास होत आहे. यासोबतच लहान मुलांमध्ये अस्थमाचा त्रास वाढीला लागला आहे. अस्थमा म्हणजे फुफ्फुसांकडे जाणाऱ्या श्वासनलिकेला सूज येते. त्यामुळे जळजळ होऊन खोकला होतो. याबद्दल अनेक आरोग्य संस्थानी चिंता व्यक्त केली आहे.
भारतीय राज्यघटनेची पंचाहत्तरी आणि संविधान प्रसार चळवळ

Constitution Day 26 November – भारताने राज्यघटना स्वीकारली, या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा दिवस 2015 पासून आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती महोत्सवाचं औचित्य साधून भारत सरकारनं संविधान दिवस साजरा करण्याचे ठरवले.
स्वच्छ गंगा मिशनअंतर्गत ‘डॉल्फिन ॲम्ब्युलन्स’!

Dolphin Ambulance project : स्वच्छ गंगा मिशनच्या अंतर्गत, राष्ट्रीय गंगा मिशन (NMCG) गंगेच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करत आहे. विशेषतः गंगा नदीतील डॉल्फिन प्रजातींचे संरक्षण करण्यावर भर दिला जात आहे.